Literature

विषय विवेचन ५

समर्थांच्या वचनांचा याला पाठिंबा आहे. वर दिलेल्या बृहदारण्यकाच्या वाक्यांतमी ब्रह्म आहेया जाणिवेने तें पहा सर्व काही झाले, असे आले आहे. ___ एष सर्वेश्वर एष सर्वज्ञ एषोऽन्तर्याम्येष योनिः सर्वस्य।‘ (गा. ६) हाच सर्वेश्वर, हाच सर्वज्ञ, हाच अंतर्यामी, हाच सर्वांचे कारण, अशा अर्थाचें मोडुक्योपानिषदातील वाक्य बघितले म्हणजें तस्मात् तत्सर्वमभवत् । हे बृहदारण्यकाचे वाक्य आठवून, ज्याच्या योगाने ब्रह्म सर्व झाले म्हणजे अहंब्रह्मास्मिहे स्फूरणच या सर्वेश्वराचे स्वरूपच असे समजून येईल. ती ही ब्रह्माची अहंब्रह्मास्मिरूप जाणीवच मांडुक्योपनिषदांतील एष सर्वेश्वरः या शब्दाने लक्षित होते असे वाटेल. या ईश्वरापासून पो काही झाले हे खाली दिलेल्या श्रीसमर्थांच्या वाक्यावरून दिसून येईल

परमात्मा परमेश्वरू। सर्वकर्ता तो ईश्वरू । तयापासन विस्तारू । सकळ झाला‘ (दास ८।३।१२) 

त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मळमायाचि आपण । सकळ काही कर्तेपण । तेथेंचि आले‘ (दास ८।३।१४) 

या ईश्वरापासून सर्व काही उत्पन्न झाले याबद्दल श्रुतींतील कांहीं वाक्ये पाहू ! तपसा चीयते ब्रह्म ततोऽन्नमभिजायते । अन्ना प्राणो मनः सत्यं लोका: कर्मसुचामृतम् । (मुंड १।१।८) यस्य ज्ञानमयं तपः‘ (मुंड १-१-९) आपल्या ज्ञानाने म्हणजे अहं ब्रह्मास्मिया जाणिवेने ब्रह्म स्फुरते. पुढे या सर्वांला कारण असणारे अन्न म्हणजे अव्याकृत उत्पन्न होते, पुढे या अव्याकृतापासून प्राण म्हणजे सूत्रात्मा-हिरण्यगर्भ उत्पन्न होतो. नंतर त्याला जगाचा संकल्प होतो. तेंच हिरण्यगर्भापासून उत्पन्न होणारे संकल्पात्मक मन. या समष्टयात्मक मनापासून सत्यं म्हणजे आकाशादि पंचभूतांची उत्पत्ति होते. पुढे यांतून कर्मांचा विभाग होतो व नंतर कर्मफळ. कर्मानंतर फळ मिळत असल्यामुळे, कर्माबरोबर ते नष्ट होत नसल्यामुळे, कर्मफळाला अमृतअसे नांव वगळले आहे. मांडुक्य उपनिषदांतून या अव्यक्तांतच चवथ्या देहाचा अंत भर्भाव केला आहे व चवथी अवस्था म्हणते शुद्ध, बुद्ध आत्मस्वरूपच म्हणून सांगितले आहे. तदैक्षत‘ (छां.)सोऽकामयत बहु स्यां प्रज्ञायेति । स तपोऽतप्यत । सतपस्तप्त्वा । इदसर्वमसृजत । यदिदं किञ्च । तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत्‘ (ते. ब्र. ६) अनेक रूपानी बहु व्हावे असे त्याने इच्छिले. तसेंच संकल्पिले आणि पुढे त्या संकल्पाने हे सर्व काही निर्मून त्यांत त्याने प्रवेश केला. स ईक्षत लोकान्नु सृजा इति स इमॉल्लोकानसृजता। (ऐत. १) इत्यादि श्रुतीहि याला प्रमाणभूत आहेत.

मुण्डक, श्वेताश्वतरादि उपनिषदांत आढळून येणाऱ्या-

द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते। तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्रन्नन्योऽभिचाकशीति ॥ 

(मुंड. ३-१ श्वेता ४-६) 

या वाक्यांतून कर्मफलरूप असणाऱ्या या वृक्षाच्या फलाची गोडी चाखणारा एक व कांही न खातां असणारा दुसरा, असे हे भिन्नरूपाने परस्पर मिळून असणारे दोन पक्षी या संसाररूपी एकाच वृक्षावर आहेत,’ असे सांगितले आहे. हे दोन पक्षी म्हणजे जीव आणि ईश्वर ऊर्ध्वमूलोऽर्वाकशाख एषोऽश्वत्थःसनातनः‘ (काठको २।३।१) या काठकोपनिषदाच्या वाक्यातून व श्रीमद् भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायात असणा-या ऊर्ध्वमूलमधः शाखम्या पहिल्याच श्लोकातून संसाराला वृक्षाची उपमा दिली आहे. वृक्ष याचा अर्थ कुणी देह अथवा बुद्धी असा जरी केला तरीशते पंचाशतया न्यायाने या व्यापक संसार शब्दांत त्या सर्वांचा अंतर्भाव होतो. भ्रमात्मक कार्याला सत्य वस्तूची सत्ताच कारणीभूत असल्याने संसाररूपी वृक्ष ब्रह्म वस्तूनेच आधारला गला आहे. __ तस्मिल्लोकाः श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चनत्या ब्रह्मांत सर्व लोक सांठविले आहेत. पण त्या ब्रह्माला आपल्या पोटांत सांठ विणारे एखादे दुसरे काही नाही.तदेव शुक्र तब्रह्म तदेवामृत मुच्यते। या सर्वाला आपणांत सांठविणारे तेंच स्वच्छ आहे. म्हणजे निष्कलंक आहे. त्याला कशाचा म्हणून संपर्क होत नाही, तेच ब्रह्म, तेच अविनाशी म्हगून म्हटले जाते.अमृतमभयम्।। छांदोग्याच्या वाक्यात आढळून येणारे ब्रह्माचे अमृतहे लक्षण यही पण आढळून येते. शुक्रया शब्दाने ते मायासंगरहित आहे 

हा भावार्थ. दुसरे असेल तर त्याचा कलंक लागावयाचा! या दृष्टीने निष्कलंक म्हणजे अब्दयच. जे अद्वय असते. तेच अभय असते. कारण भयं द्वितीयाभिनिवेशितस्यात् ‘ (भा.)असें अद्वय ब्रह्म या संसाररूप भ्रमकार्याचे विवर्तोपादाज कारण असल्यामळे त्याचीच व्याप्ती या भ्रमकार्यांतून असल्यामुळे या संसारांतून व यांत मोड णाऱ्या जीवेश जगतांतून या ब्रह्माची व्याप्ती अखंड आहे. इतकेच नव्हे तर भ्रम अधिष्ठानमात्रच असतो या न्यायाने हे सर्व काहीच नसून एक ब्रह्मच खरें. ब्रह्माहून हे पृथक्रीतीने स्वतंत्र नसल्यामुळे ब्रह्मच एक अविकारी रूपाने या जगताचे यथार्थ स्वरूप हे स्पष्ट होते. ‘एक परब्रम्ह संचले कदापि नाही विकारलें त्या वेगळे जे भासले तें भ्रमरूप ‘ (दास. १०

ब्रह्मस्वरूपातअहं ब्रह्मम्हणून झालेल्या स्फूर्तीची जाणीव म्हणजेचईश्वरहे आपण बृहदारण्यक, तैत्तिरीय, मांडुक्य इत्यादि उपनिषदांच्या आधारे मागे बघितले पुढे सृष्टिसंक ल्पाने सर्वं कांहीं यानें निर्मिले आणि त्यांत त्याचा प्रवेश झाला

आत्मवेदमग्र आसीत्पुरुषविध: सोऽनुवीक्ष्य नान्यदात्मनोऽपश्य त्सोऽहमस्मीत्यग्रे व्याहरत्ततोऽहं नामाभवत्तस्मादप्येत यामंत्रितोs हमयमित्येवाग्र उक्त्वाऽवान्यनाम प्रबूतें ‘ (बृह. १।४।१) यापूर्वी हे सर्व एक आत्मस्वरूपच होते. या सर्वाद्य पुरुषानेमी कोण ? ‘माझे लक्षण काय?’ असा विचार करून बघितले पण आपल्या हून वेगळे त्याला काही दिसून आले नाही. ‘मी कोण ?’ म्हणून बघत असतानाच इतर काही आढळून येता स्वस्मृति येऊनतोच मीअसें उच्चारलें पुढे तो असाअहंनामाचा झाला. ज्या अर्थी सर्वाद्य पुरुषाच्या ठिकाणीच असे घडले त्या अर्थी त्याच्यापासून झालेल्या मनुष्य मात्रांत आतांहि तीच प्रवृत्ति दिसून येते. ‘तू कोण ? ‘ म्हणुन विचारले असतांमीम्हणून प्रत्येक मनुष्य आपल्या कारण स्वरुपाचा भाव प्रकट करून त्यानंतर त्याच्या देहाला जे काही नांव आईबापाकडून ठेवले गेले ते दुसरे नांव तो सांगतो. या श्रुतीच्या आधाराने या जगांत दिसून येणारेमीहे भान या जगदाद्य स्वरुपाचेच ठरते

यथा सुदीप्तात्पावकाद्विस्फुलिङगाः सहस्त्रशः प्रभवन्ते सरूपाः। तथाऽक्षराद्विविधाः सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र 

वेवापियन्ति (मुं. २।१।१

प्रज्वलित अग्नीपासून तत्स्वरूपी अशा अनेक ठिणग्या ज्या पमाणे उत्पन्न होतात त्याचप्रमाणे त्या अविनाशी जगत्कारण पापासून देहोपाधीने अनेक भासणारे असे हे जीव उत्पन्न होतात आणि उपाधिनाशाने पुन्हा ते त्या अक्षरांत मिळून जातात. ‘ घटे भिन्ने घटाकाश व्योमैव भवति स्वयम् मातीची गाडगी पटली की उपाधिभेदाने भासणारी विविध घटकाशाची भावना एकाच आकाशांत मिळून जाते त्याप्रमाणेच इथेहि समजावें. पाप्रमाणेच या इतर श्रुतीतून देखोल हाच भाव प्रगट हााला आहे. — तस्मादग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात्पर्जन्य ओषधयः पृथिव्याम् पुमान् रेतः सिञ्चति योषितायां बम्हो: प्रजाः पुरुषात संप्रसूताः।‘ (मुं. २।१।५) ___ या श्रुतीत धुलोक, पर्जन्य, औषधीरूप अन्न, पुरुष आणि स्त्री अश्या पंचाग्निद्वाराने उत्पन्न होगारी अनेक प्रजा या अविनाशी | स्वरूपापासूनच उत्पन्न होते, असे सांगितलें आहे

तस्माच्च देवा बहुधाः संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसि ‘ (मुं. २।१७

यापासूनच स्वादिभेदाने अनेक देव निर्माण झाले. सिद्ध, साध्या, मनुष्य, गंधर्व, पशुपक्ष्यादिकहि सर्व यापासूनच निर्माण झाले 

एषोऽन्तपश्चरते बहुधा जायमानः (मुं. २।२।६) रूप रूपं प्रतिरूपो वभूव रूपं रूपं प्रतिरूपी बहिश्च। (कठ २१२१९) पुरुष एवेदसर्वम् (मुं. २।१।१७) —एको देव: सर्व भूतेषु गूढः सर्वव्यापी सर्व भूतान्तरात्मा। (श्वेता. ६।११) ‘एको वशी सर्व भूतान्तरात्मा। एक रूपं बहुधा : करोति‘ (कठ २।२।१२) इत्यादि श्रुतिवरूनहि भिन्न देहोपाधीनी विविध भासणाऱ्या या सर्व जीवांची उत्पत्ति त्या परमपुरुषापासूनच झाली म्हणजे तोच या सर्व जीवरूपाने नटला हे स्पष्ट होईल. या जीवाविषयी अजून थोडासा विचार करूं

एतमेव सोमानं विदर्येतया द्वारा प्रापद्यत तस्यत्रय आवसथास्त्रयः स्वप्नाः ‘ (ऐत.

या वाक्यानी परमेश्वर आपल्या ईक्षणद्वारा हे सर्व कार्य कारण संघात निर्मून त्यांत शिरोभागाने प्रवेश करतो पुढे चक्षु, कंठ आणि हृदय अशा तीन स्थळी होणाऱ्या, थोडा वेळ भासून नष्ट होत असल्यामुळे स्वप्नाप्रमाणेच हरणाऱ्या, जागृत स्वप्नसुषुप्त्यात्मक तीन अवस्था अनुभवितो हे स्पष्ट आहे. हेच 

एव मायापरिमोहितामा शरीरमास्थाय करोति सर्वम स्त्रिन्नपानादिविवित्रभोगै: एव जाग्रत परितृप्लिमेति  

(कैव १२

स्वप्ने तु जीव:: सुखदुःखभोक्ता स्वमायया कल्पित विश्वलोके सुषप्तिकाले सकले विलीने तमोऽभिमतः सुखरूपमेति ‘(कैव. १३

या कैवल्योपनिषदाच्या वाक्यानी सुद्धा सिद्ध होऊन पुनश्च जन्मान्तरकर्मयोगात् एव जीव: स्वपिति प्रबुद्धः पुरत्रये क्रीडति याच जीवस्ततस्तु जातं सकलं विचित्रम् ‘ (कैव. १४

पुरत्र यांत विहरणाऱ्या या जीवाला जन्मजन्मांतरांत कर्म घडून तें अनुभवावयासाठी या तीन अवस्थांच्या चक्रांत सांपडावे लागतें सकल विलीनरूप सुषुप्तीच्या त्या आनंदातून त्याचे जन्मांतराचे कर्म फलोन्मुख होऊन अनुभविण्याकरितां तें अंतःकरणाच्या पदाने जागृत अवस्थेत त्याला ओढून आणते आणि अशाप्रमाणे या पुरत्रयांतून विहरणाराच जीव; हे या वाक्यानीं स्पष्ट होते

तद्यथा तृणजलायुका तृणस्यान्तं गत्वाऽन्यमाक्रममाक्रम्याssत्मानमुपस हरति (बृह.

जीवाच्या पुनर्जन्माविषयीं श्रुतीहि प्रमाण आहे. ज्याप्रमाणे एखादी पर्णाळी (गवता वरील अळी) गवताच्या शेवटच्या टोकाला जाऊन पुढचे पाय दुसऱ्या गवताच्या काडीवर रोवून मग आपल्या अंगसंकोचाने मागचे पाय जशी काढते त्याप्रमाणे पूर्वीचा देह अचेतन करून दुसऱ्या देहाच्या प्रवेशाने मग मागचा देह हा जीव सोडतो असा ।। श्रुतीचा भावार्थ. _ 

तद्यथा पेशस्कारी पेशसो मात्रामपादायान्यन्नवतरं कल्याणतर 

रुपं तनुत एवमेवायमान्मेद शरीरं निहित्याविद्या गमयि त्वान्यन्नवतरं कल्याणतर रूपं कुरुते।। ( बृह. ४।४।४

सोनार दागिना आटवून त्या पूर्वीच्या सोन्यानेच दुसरा जसा एखादा सुबक असा दागिना घडवितो त्याप्रमाणेच मागच्या देहाचें नामरूप नष्ट करून त्या पंचभूतानेच दुसरा एखादा नवीन सुंदर देह आपल्या वासनेप्रमाणे निर्माण करतो. कर्माप्रमाणे संस्कार, संस्काराप्रमाणे वासना, वासनेप्रमाणे कर्म आणि कर्माचे फळ म्हणजे देहपरिग्रह. प्राप्त झालेला देह कोणचा का असेना, त्या वासनेमुळे त्याला तो उत्तम वाटू लागतो. देव, मनुष्य वा तो अतिहीन असा डुकराचा देह येवो, तो देह प्राप्त झाला की तोच त्याला उत्तम वाटू लागतो. काय त्या वासनेचा विलास !! जे जे प्राणी मरोनि जातीं। वायोमध्ये वासना फिरती गती आणि अवगती कर्मानुसार ‘ (. . ६।२२)आत्मान रथिनं विद्धि शरीर रथमेव तु बुद्धि तु सारथि विद्धि मन: प्रग्रहमेवच ।। इन्द्रियाणि हयानाहुर्वीषयास्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणा॥ (कठ. १।३।३ ) ‘कर्मवशानुगःम्हणून म्हटला जाणारा हा जीव, आपल्या कर्माप्रमाणे संसार यात्रेकरतां अथवा त्याच्या अत्यंत निवृत्तिरुप तद्भासयते सूर्यो शशाड्.को पावकः यद्गत्वा निवर्तन्ते‘ (. गी. १५।६) अशा या परमात्मपदाच्या परंधामाकरितां आपल्या वासनांनुरूप प्राप्त झालेल्या देहरथांतून निघाला आहे. याला बुद्धि हाच सारथि. या रथाला जोडलेल्या इंद्रियरुपी घोड्यांना स्ववश ठेवण्याकरितां मनरूपी लगाम ह्या बुद्धिरूपी सारथ्याच्या हातांत दिला गेला आहे. ह्या इंद्रियरूपी घोड्यांना पुढे गोचर होणारा मार्ग म्हणजे शब्दस्पर्शादि हे विषय. रथात बसणारा मनुष्य स्थिरच असतो. त्यांचे पथक्रमण, रथ आणि त्याला जुंपलेल्या घोड्यामुळेच असते. रथाची हालचाल हातांत लगाम बाळगणाऱ्या सारथ्याकडेच असते. कर्तृत्व सारें याचंच. मात्र याच्या दुर्लक्ष्यामुळे जर कां कांही अपघात झाला तर तो फुकटच्या फाकट या साऱ्यांच्या उपाधीमुळे रथांत बसलेल्याला भोगावा लागतो. ‘अमक्याचा रथम्हणून विना कारण सारथ्याच्या दोषाचा आरोप होतो. अभिमानामुळे यालाच ते निस्तरावे लागते. या दृष्टीने बुद्धि, मन, इंद्रियांच्या योगानेंच जीवालाभोक्तृत्व‘, असा श्रुतींचा अभिप्राय. दुसऱ्या दृष्टीने म्हणजेसुखमस्यात्मनोरूपम् तेव्हां सुखाचें भोक्तृत्व सुखाला असू शकत नाही. भोग अन्य म्हणून भासणाऱ्या पदार्थाचाच घडा वयाचा, तो अन्य उपकरणानींच. अन्यत्वाचा भास आत्म प्रकाशांत या बुद्धिमनइंद्रियामुळेच. तेव्हां यांच्या उपाधीमुळेच आत्मस्वरुपाच्या ठिकाणी भोक्तृत्व येते असे म्हणता येईल. शरीरांत प्रवेश झाल्यानंतरचे ईश्वराचे स्वरुप रथिकाच्या यारूपकानें ही काठक श्रुति सांगते, हे स्पष्ट आहे. अपुनरावृत्त्यात्मक मोक्ष अथवा जीवाला जन्ममरणात्मक बंध होणे हे सारे याच्या बुद्धि सारथ्यावरच अवलंबून आहे. हे या खाली दिलेल्या त्याच श्रुतीच्या वाक्याने दिसून येईल. यस्तु विज्ञानवान्भवति समनस्क: सदा शुचि: तु तत्पद वाप्नोति यस्मात्म यो जायते ‘ ( कठ. १।३।८ ) विज्ञान सारथिर्यस्तु मन: प्रग्रहवानर : सोऽध्वन: पारमाप्नोति तद्विष्णो: परमं पदम् ‘ (कठ. १।३।९) ‘यस्त्वविज्ञानवान्भवत्यमनस्क: सदाऽशुचिः तत्पदमाप्नोति सारं चाधिगच्छति (कठ. ) इंद्रियरूप घोड्यांना मनोरूपी लगामाने आपल्या कहयांत राखून अपवित्र देहसुखाचा संग लावून घेता, पवित्र अंतःकर णाने सद्वस्तूंचे ध्येय रोखून व्यवस्थितपणे देहरुपी रथ हांकण्याची हातोटी ज्याला पक्की साधली आहे असा हा बुद्धिरूपी सारथी ज्याला लाधला तो, ज्या पदाला पोहोंचल्यानंतर पुन्हा पुनरावृत्ति नसते त्या पदाला पोहोचतो. या संसाराचा मार्ग ओलांडून गेल्यानंतर लाभणारे तें श्रेष्ठ असें विष्णुपद त्यालाच लाभते की, ज्याचा सारथी मनोरूपी लगाम घट्ट धरून आपल्या कलाने घोडे चालवीत हा देहरथ हांकतो. या विरुद्ध असणाऱ्या सारथ्याने जो युक्त असतो तो त्या पदाला पारखा होऊन या जन्ममरणाच्या फेऱ्यांत सांपडतो

आत्मेश्वर: जीव: अनात्मनां देहादीनामात्मत्वेनाभिमन्यते सोऽभिमान आत्मनो बन्धः तन्निवृत्तिर्मोक्षः। ‘ ( सर्वसारो. ) अनात्मरुप देहादिकांच्या ठिकाणी या जीवास असणारा आत्म त्वाचा अभिमानचबंध त्याची संपूर्ण निवृत्तीचमोक्षअसें सर्वसारोपनिषदांत सुद्धा सांगितले आहे

इह चेदशकद्बोधं प्राक्शरीरस्य विस्रसः ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते ‘ (कठ २।३।४)  

इथें शरीर पडण्यापूर्वीच ब्रह्म जाणले तर ठीक, नाही तर ज्या लोकांतून प्राण्याचा जन्म होतो अशा या अनेक लोकांतून या जीवाला जन्म घ्यावा लागतो. ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने जन्म येतो ब्रह्मज्ञानाने निरंकुश सुखाचा तत्काळचि लाभ होतो। प्राणी संसारी सुटतो। संशय अवघाची, तुटतो। जन्ममरणाचा ” (दास. ६।९।२८)हे यथार्थचि आहे बोलणें विवेके शीघ्रचि मुक्त होणें असोनि कांहींच नसणे जनामध्ये ‘ (दास ६।९।३१) पापपुण्य यमयातना हे निर्गुणी तो असेना आपण तोचि तरी जन्ममरणा ठाव कैचा ‘ (दास. ६।२।३५) जाणिजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावें ज्ञान त्या वेगळे तें अज्ञान सर्वकाही (दास. १९) ‘शोधितां आपलें मूलस्थान। सहजचि उडे अज्ञान  

या नांव जाणिजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक ‘ (दास. १९) येथे दृश्य प्रकृति सरे। पंचभूतिक वोसरें। समूळ द्वैत निवारे। या नांव ज्ञान ‘ (दास. ) जयास वाटे सीण व्हावा तेणे विषयों चितीत जावा। विषयो मिळता जीवा। तगभग सुटे ‘ (दास. १०६१) ‘जेथे वासना झोंबोन पड़ें। तेणेंचि अपाय दूःख जडे। म्हणोनी विषयवासना मोडे। तो एक सुखी ‘ (दास. १०६४) ‘येक दिव्यान्ने भक्षिती। येक विष्टा साव डिती। आषण वर्तत्यत्वा घेती। साभिमान ‘ (दास. ) ‘ सार सेविज श्रेष्ठीं। असार घेईजे वृथा पृष्ठीं। सार असाराच्या गोष्टी सज्ञान जाणती॥ (दास. १०) देव अनुकूल नव्हे जया। स्वयें पापी तो प्राणिया। भवाब्धी तरवे तया। आत्म हत्यारा बोलिजें।‘ (दास. २४) पुवान्भवाब्धि तत् आत्महा। (भाग ११ स्कंध) ‘ असूर्या नाम ते लोका: अन्धेन तमसाऽवृता। ता  स्ते प्रेत्याभिगच्छन्ति येके चात्महनो जनाः (ईशा )

home-last-sec-img