‘परीक्ष्य लोकान्कर्मचितान्ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृत: कृतेन।‘ (मुंड. १।२।१२) कर्मफलरूप असणारी अनेक लोकांची प्राप्ति कर्माप्रमाणेच अनित्य आहे; असें जाणून शाश्वत सुखाभिलाषी ब्रह्मजिज्ञासूंनी कोणाच्याहि सुखाची आशा न बाळगतां विरक्त व्हावें, शाश्वत आनंद अशाश्वत कर्माचे फळ होणार नाही म्हणून कर्मजन्य अशा
अशाश्वत सुखाची कल्पना सोडून शाश्वत अशा आत्मीय आनंदा करितां प्रयत्न करावा. – ‘यो वा एतदक्षरं गार्ग्यविदित्वाऽस्मिल्लोके जुहोति यजते तपस्तप्यते बहूनि वर्षसहस्राण्यन्तदेवास्य तद्भवति॥‘ (बृह. ३।८।१०) अविनाशी आत्मीयसुख न जाणतां या लोकी कितीहि होम हवनें केली, कितीहि तीव्र तप केले, हजारों वर्षे जरी अशी कष्टतर साधने झाली तरी ती निरर्थक म्हणजे यांच्यापासून तें शाश्वतसुख कधीहि मिळणार नाही. याच्यापासून अशाश्वत सुखाचीच प्राप्ति होणार ॥ ‘न जाणतां कोटीवरी । साधने केली परोपरी। तरी मोक्षास अधिकारी । होणार नाहीं॥‘ (दास.९।४।२८) ‘जे जे काही साकार दिसे। तें तें कल्पांती नासे। स्वरूप तें असतचि असे । सर्वकाळ ॥‘ (दास. ९।२।१) ‘सांडुन अक्षई सुख । सामर्थ्य इच्छितो ते मूखी । कामनेसारिखे दु:ख । आणीक नाहीं॥‘ (दास. ९।२।४०) ‘वैराग्यें करावा त्याग । तरीच परमार्थ योग। प्रपंचत्यागें सर्वसांग। परमार्थ घडे ॥‘ (दास. १२१७।९) ‘विषय त्यागेवीण तो काहीं। परलोक तो प्राप्त नाहीं। ऐसें बोलणे ठायी ठायीं। बरें पहा॥‘ (दास. १२१७१४) ‘महाद्वार ओलांडावें । मग देवदर्शन ध्याने। तैसें दृश्य हे सांडावें। जाणोनीया॥‘ (दा. ८।४५८) ‘ज्ञानविरहित जे जे केलें। तें तें जन्मासि मूळ झालें। म्हणौनि सद्गुरुची पाऊलें । सदृढ धरावी।।‘ (दास.५१२१२२) ‘उपोषणे निष्ठानेम । परम सायाती केले कर्म। फळचि पावती वर्म। चुकले प्राणी ॥‘ (दास. ५।२।३१) ‘यज्ञादिकें कर्मे केली। हृदयीं फळाशा कल्पिली।आपलें इच्छेने घेतली । सूति जन्माचि ॥‘ (दास. ५।२।३२) ‘ब्रह्मज्ञानेवीण । जे जे साधन तो तो शीण। नाना दोषांचे क्षाळण । होईल कैसें ॥‘ (दास. १०।१०।५८)
इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यत्छ्रेयो यो वेदयन्ते प्रमुढा:। नाकस्य पृष्ठे ते सुकृते ऽनुभूत्वेमं लोकं हीनतरं वा विशान्ति ॥‘(मुंड. १।२।१७).
‘तप:श्रद्धे ये हयुपवसन्त्यरण्ये शांता विद्वांसौ भैक्षचर्यां चरन्तः । सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयास्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ॥‘ (मुंड. १।२।११)
‘ते य एवमेतद्विदुर्ये चामी अरण्ये श्रद्धा सत्यमुपासते तेsर्चिरभिसम्भवन्ति – — — ब्रह्मलोकान्गमयति ते तेषु ब्रह्मलोकेषु परा:परावतो वसन्ति तेषां न पुनरावृत्तिः ।‘ (छां. ६।२।१५) ये चेमेऽरण्ये श्रद्धा तप इत्युपासते तेsर्चिषमभिसंभावन्ति।‘ (छांदो. ५।१०।१) ‘अथाकामयमानो यो कामो निष्काम आप्तकाम आप्तकामो न तस्य प्राणा उत्क्रामान्ति ब्रह्मैव सब्रह्माप्येति ॥‘ (बृह. ४।४।६) यत्रायं पुरुषो म्रियत उदस्मात्प्राणा: क्रामन्त्याहो इनेति नेति होवाच याज्ञवल्क्योऽत्रैव समवनीयन्ते ॥‘ (बृह. ३।२।११) ‘य एवं वेद सोऽकामो निष्काम आप्तकामआप्तकामो न तस्य प्राणा उत्क्रामन्त्यत्रैवसमवलीयन्ते ॥ (न, उ.)
या सर्व श्रुतिवाक्यांच्या आधाराने जीवाला तीन गति आहेत हे दिसून येईल. एक पुनरावृत्त्यात्मक, दुसरी व अपुनरावृत्यात्मक तिसरी कोठेहि अन्य ठिकाणी न जातां येथेच ब्रह्मरूप होण्याची. या गती कोणाला लाभतात व कोणत्या साधनानें लाभतात या विषयी थोडासा विचार करूं. इष्टापूर्त कर्मच श्रेष्ठ. ही कर्मे आचरून स्वर्ग पितृलोकांत असणारे दिव्य भोग अनुभवावेत. ‘नान्यद स्तीति ।‘ याहून दुसरें कोणचेंहि श्रेयस्कर नाही असे मानणाऱ्याला ही जन्ममरणात्मक गती प्राप्त होते. या अशा जीवांना श्रुतीने अतिमूढ म्हणुन गौरविले आहे. असे हे जीव कर्मफलरूप आणि भोगप्रधान अशा या स्वर्गादि लोकांना धूम मार्गाने जातात. तेथे ‘सुकृत आहे तो भोगिती ।‘ (दास ५।१०।२६) सुकृत खर्च होईपर्यंत त्या लोकी राहून पुढे ‘क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशिन्त ।‘ पुण्य क्षीण झाल्यानंतर या मृत्युलोकी अथवा याहून हीन अशा दुसऱ्या एखाद्या लोकीं संचित कर्माप्रमाणे ते जन्म घेतात. या धूम मार्गालाच ‘दक्षिणमार्ग‘ ‘कृष्णगति‘ अथवा ‘पितृयान‘ असें म्हणतात. ‘इष्ट‘ म्हणजे श्रौतकर्म. अग्निहोत्र, तप, सत्य, वेदांचें परिपालन, आतिथ्य, वैश्वदेव इत्यादिकांचा अंतर्भाव यात होतो. ‘पूर्त‘ म्हणजे स्मार्तकर्म. तळी, विहिरी, देऊळे, घाट, धर्मशाळादि लोकोपयोगार्थ बांधविणे अथवा पाणपोई, अन्नछत्र वगैरे ठेवणे इत्यादिकांचा अंतर्भाव यांतच म्हणजे पूर्त नांवाच्या कर्मांत होतो. ‘ अग्निहोत्रं तपः सत्यं वेदानाञ्चानुपालनम् । आतिथ्यं वैश्वदेवश्च इष्टमित्यभिधीयते ॥‘ ‘वापी कूप तडागादि देवतायतनानि च । अन्नप्रदान मारामः पूर्तमित्यभिधीयते ॥‘ ‘एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥‘
हे असे कामविमूढ जीव जन्ममरणात्मक यातायातीच्या फेऱ्यात सांपडतात. ही झाली भोगाशेनें काम्यकर्म करणाऱ्या गृहस्थांची स्थिति. दुसरी गति म्हणजे कामनारहित अशा जीवांना मिळणारी. जे कोणी नैष्ठिक ब्रह्मचारी, वानप्रस्थ अथवा संन्यासी अरण्यादि एकांतस्थळी राहून निर्विषय सुखाच्या प्राप्तीकरितां निष्काम होवून हिरण्यगर्भादिकांची उपासना स्वाश्रमोक्त अति खडतर नियमांच्या पालनानें करितात, अंतःकरणातील विषय वासनेची खळबळ नाहीशी झाल्यामुळे जे शांत झालेले असतात म्हणजे ज्यांनी दारेषणा, वित्तेषणा, पुत्रेषणा इत्यादिकांचा त्याग गेलेला असतो, ज्यांनी वेदरहस्य जाणलेले असते, जे प्राणधारणार्थ भिक्षावृत्तीने रहातात ते असे वैराग्यशील, देह सोडण्याच्या पूर्वीच जर यांना ब्रह्मात्मैक्यरूप अपरोक्षज्ञान झाले नाही तर हे परोक्षज्ञानी पानी विषयभोगाशेने रहित असे सूर्यद्वाराने म्हणजे अर्चिरादि मार्गाने ब्रह्मलोकांना जातात. ही गति अपुनरावृत्त्यात्मक असते ‘जे या लोकी गेलेल्या माणसांना विषयवासनेच्या योगाने लाभ णारा जन्म, यांच्या ठिकाणी विषयवासना नसल्यामुळे पुन्हा प्राप्त होत नाही. त्या लोकांच्या लयकालापर्यंत तेथे राहून पुढे ते सर्व स्वउपासनेसह ब्रह्मरूपी मिळतात. कार्यात्यये तदध्यक्षेण सहातः परमभिधानात् ।‘ ‘ब्रह्मलोकेषु‘ ।हा अनेकवचनी प्रयोग वैकुंठ कैलासांदिकांचा अंतर्भाव आपल्यांत करणारा आहे. या मार्गालाच ‘देवयान‘, ‘उत्तरायण‘ अथवा ‘शुक्लगति’
ति‘ असेंहि म्हणतात.’शुक्लकृष्णे गति ह्येते. जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ।। (भ. गी. ८।२६)
देवःपरशीयायतेऽनेन मार्गेणेति देवयानः।‘ उपासक आपल्या उपास्याला ब्रह्मभावनेनेच समजत असल्यामुळे ती उपासना सगुण होते. भावनेप्रमाणे ज्या सत्यलोकादिकांतून त्यांची उपास्य देवता असते त्या लोकी ते निष्काम उपासक जातात. हे अपरब्रह्म,, कार्यब्रह्म ,शबलब्रह्म अथवा सगुण ब्रह्मच अमृत, अव्यय या विशेषणानी युक्त असलेले ‘यथामृत पुरुषोह्मव्ययात्मा।‘ या वाक्यांतून दिसून येते. हा झाला क्रममुक्तीचा प्रकार. ‘सर्वलोकात्मक: कस्मादनुतिष्ठामि किंकथम् ।‘ तुषारांतून समुद्राची व्याप्ति असल्याप्रमाणे ज्याला स्वरुपभूत अशा सुखाची व्याप्ती सर्व लोकांतून वाटते, तो हा स्वब्रह्मात्मैक्य जाणून सुखमहोदधीच झालेला ब्रह्मनिष्ठ ज्ञानी कोठेच जात नाही. तो ब्रह्मच असतो. त्याच्या स्वरुपावर हे मुळी दोरीवर भासलेल्या साभासाप्रमाणे सारेच भ्रामक किंबहूना न झालेलेच. या कशाच्या प्राप्तीविषयीं तो कर्म करील ? कोणच्या लोकाची त्याला इच्छा होईल? तो कुठे नाही? तोच ओतप्रोत अशा चोहीकडे असतांना कुठे जाणार? सर्वांचे सत्यस्वरुप झालेल्या अशा या ज्ञान्यांत याचे प्राण याच्या देहावसानसमयी समरसून जातात. ‘गताः कलाः पञ्यदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रति देवतासु। कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परेगव्यय सर्वं एकी भवन्ति ॥‘ (मुंड. ३।२।७) हीच ती तिसरी गति. हिलाच ‘ सद्योमुक्ति‘ असे म्हणतात या ज्ञात्याविषयी श्रीसमर्थ काय म्हणतात ते पाहू. ‘जो जन्मला नाही ठायीचा । त्यास मृत्यू येईल कैचा।। विवेकबळे जन्ममृत्याचा। घोट भरिला जेणे॥ (दास. ७।१०।२८)
‘तोजीत असतांचि मेला । मरणास मारून ज्याला । जन्ममृत्य न स्मरे त्याला । विवेक बळें।‘
(दास ७।१०।३४)
उत्तरायण ते उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेही वसे भ्रम । साधु तो निःसंदेह ॥‘ (दास. ७।१०।१३)
जसा एखादा निद्रिस्त मनुष्य आपल्या वासनेप्रमाणे स्वप्न असतो व स्वप्नांत वेगळा देह धारण करून देशांतर गमनादि क्रीया अनुभवतो त्याचप्रमाणे अन्य देहाची प्राप्ति, लोकोत्तरगमन आणि लोकांतला अनुभव. मृत्युरत्यन्त विस्मृतिः । ‘ मरण म्हणजे मुर्छा अथवा सुषुप्ति प्रमाणेच एक गाढ विस्मृत्यात्मक अवस्था
आहे. सावध आहे तो स्मरण । विकल होतांचि विस्मरण । विस्मरण पडतां मरण पावतो प्राणी।‘ (दास ९।७।२५)
ही मरणावस्था नित्यांतली नव्हे, नैमित्तिक एवढाच काय तो फरक. सुषुप्तींत प्रारब्ध शिल्लक असल्यामुळे प्राण हा देह भोगा करतां उरवतो व मरणांत प्रारब्ध शिल्लक नसल्यामुळे हा देह संबंध सोडून अन्य देहाच्या तयारीला लागतो. तसेच लोकांतर गमन. जन्मांतर, देहांतर व तेथला अनुभवहि या देहांत राहून अनुभविले जाणारे नित्य स्वप्न नव्हे तर नैमित्तिक, एवढाच काय जो मधला फरक. दृश्य पदार्थाच्या भोगाची जोपर्यंत वासना असते तोपर्यंत दृश्य पदार्थाच्या भोगाकरितां या भोगायतन स्थूळ देहाची आवश्यकता असल्यामुळे स्थूळ देह प्राप्तिरूपजन्म कधीं चुकावयाचा नाही
‘नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि ।‘ काम्य कर्म भोगानेच नष्ट होते. ‘प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः ।‘ काम्य कर्म फलोन्मुख असेपर्यंत त्याच्या भोगाकरितां त्या त्या देहाची प्राप्ति लाभणारा तो तो लोक आणि कर्माप्रमाणे मिळणारी ती ती योनी अपरिहार्य आहे. ज्याला ज्याची इच्छा नाही त्याच्या प्राप्तीकरतां तो काही कर्म करणार नाही. अभावरूप कर्मापासून भावरूप कर्मफलाची उत्पत्ति संभवनीय नसल्यामुळे ज्याला दृश्यांतल्या कोणच्याच नामरूपाच्या भोगाची इच्छा नाही तो त्याच्या प्राप्तीकरतां केलेल्या कर्माच्या भोगप्रधान फलाचा भागी दार होणार नाही व दृश्य पदार्थांच्या भोगाकरतांच आवश्यक असणारा हा देहहि पण त्याला येणार नाही. कोणच्याहि लोकांचे सुख देहानीच अनुभववायचे. देहरहित अशा स्थितीत दृश्याचा अनुभव होणे शक्य नाही. ज्याला दृश्य भोग नको त्याला देहहि पण नको. भिन्न सुखाची वासना म्हणजेच जन्म . जन्मलेला प्राणी भिन्नरूप सुखाकरतांच धडपडतो. हेच याचे जीवन आणि सार सर्वस्व. नको म्हटले तरी चुकत नाही. याचे कारण मागच्या जन्मीच्या कर्माचे असे हे फळ बलात्कार करते. ज्याला सुख दुसरे उरवून, अरूप असणारे सुख नामरूपात्मक दृश्यपदार्थांतून मिळविणे भ्रामक वाटतें तो मुळासगट म्हणजे याला कारण असणाऱ्या अज्ञानासह ही भिन्नसुखाची वासना विवेकरूपी कुदळीने समूळ काढतो. त्याला, भिन्न सुखाची वासना नष्ट होऊन स्वमात्र सुखच शिल्लक रहातो. त्या ठिकाणी भिन्नत्व नसल्यामुळे व सुखाला सुखाची इच्छा होत नसल्यामुळे, भिन्न सुखाच्या इच्छेने लाभणारा जन्म कधी याला पुन्हां लाभणार नाही. याचे लोकांतरगमन खुंटले. श्रीसमर्थानी पंचप्रलयाचे वर्णन केले आहे ते येथे थोडेसे बचूं। ‘ऐका प्रळयाचे लक्षण । पिंडी दोनी प्रळय जाण । एक निद्रा एक मरण । देहांत काळ ॥ (दास. १०।५।१) दोनी पिडी दोनी ब्रह्मांडी। च्यारी प्रळय नवखंडीं । पांचवा प्रळय उदंडीं। जाणिजे विवेकाचा ॥४॥
। या नांव निद्रा प्रळय । जागृतीचा होये लय| आतां ऐका देहांत समय । म्हणजे मृत्युप्रळया ||७||‘तिकडे गेला मन पवनु । इकडे राहिली नुसती तनु| दुसरा प्रळय अनुमानु । असेंचिना ॥९॥ ‘तिसरा ब्रह्मा निजेला । तो हा मृत्युलोको माला अवघा व्यापार खुंटला । प्राणिमात्रांचा ||१०||‘ तेव्हां प्राणियांचे सूक्ष्मांश । वायोचक्रीं करिती वास । कित्येक काळ जातां ब्रम्ह्यास । जागृती घडे ।। ११||,
पुन्हाँ मागुती सृष्टी रची। विसंचले जीव मागुतें संची। सीमा होता आयुष्याची । ब्रह्म प्रळय मांडें ॥१२|| तेथे जाणीव राहिली। आणि जगज्जोती निमाली|शुध्दसारांश उरली। स्वरूपस्थिती ।। २६ ।। जितुकों काही नामाभिधानें । तये प्रकृतिचेनि गुणें|प्रकृति नसतां बोलणें । कैसें बोलावें ॥२७॥ ‘प्रकृति असतां विवेक कीजे । त्यास विवेक प्रळयें बोलिजे| पाचहि प्रळय तुज वोजे । निरोपिले ।। २८ ।।
स्वप्नांतलें गमनागमन, भोग–भोग्या, त्यात वावरणारा तो देह ‘ एवं आपली कल्पना । स्वप्नी येती पदार्थ नाना परी ते चालतींना ‘|| चित्र दृष्या प्रमाणे एका ठिकाणी खिळलेले स्तब्ध जसे असते त्याच प्रमाणे पुनर्जन्म लोकांतर तिथला भोग सारिक्रिया साऱ्या वेदना मनाच्या भिंतीवर वासनेच्या रंगाने रंगविलेले हे सारे दृश्य किती तरी चंचल वाटले तरी ते निश्चळच आहे .ते सर्व थैव क्रिया शून्यच आहे सारा खेळ भावनेचा लोकोत्तर गमन म्हणजे स्वप्नातील देशांतर गमन. स्वप्नात काशीला गेलेल्या मनुष्याचा विचार म्हणजे सर्वच भास !भास जाणीवरुपच. जाणीव म्हणजे ज्ञान. ज्ञान सर्वावभासक, तेंव्हा ते अद्वितीयच. त्यांत कसलेहि रूपांतर होत नाही. या अशा निश्चळ ज्ञानमात्र स्थितीत देहाचें नामरुप, गमनागमन, सारे भोग्यजात त्यांचा भोग, सारी क्रिया, सर्व हा भास खोटाच. किंबहुना शुद्ध विचारदृष्टीने पाहूं गेले तर हे नाहीच असें मनाला पटून जे स्वमात्र आणि निश्चळ असें ज्ञान आपल्यांत कोणचेहि द्वंद्व दाखवून घेत नाही, कोणचीहि त्रिपुटी उरवून घेत नाही, तें अद्वितीया स्वयंप्रकाश केवलानंदरूप आपणच हे निश्चित वाटते.
‘बीज भाजलें उगवेना। वस्त्र जळाले उकलेना। ओघ निवडितां निवडेना । गंगेमध्ये ॥ (दास. ९–३–३५)
अशा विवेक–परिशुद्ध झालेल्याला कोठचा जन्म? ‘सिद्धस्वरूपी नाही देहो । तेथे कैचा संदेहो। या कारणे सिद्ध पहा हो । निःसंदेही ।।‘ (दास. ५–१०–४१) ‘बीज अग्नीने भाजलें । त्याचे वाढणे खुटलें। ज्ञात्यास तैसे जालें । वासना बीज ।। ‘ (दास. १६–१०–२८)
वासनाच नसल्यानंतर ‘ग्रामो नास्ति कुतः सीमा ? ‘ साधूस जन्म थोतांड ।‘
‘पाहे निश्चळाचा विवेक । ऐसा लक्षामध्ये एक। निश्चला ऐसा निश्चयात्मक । निश्चलचि तो ।। (दास. ११।२।२)
जन्ममरणाविषयीं श्रीमद्भगवद्गीतेचे मत घेऊ. ज्ञानांवाचून जन्ममरणपरंपरा सुटत नाही. जन्ममरणराहित्यच मोक्ष व हैं। योग, भक्ति व ज्ञान यांच्यामुळे लाभणारे पराकाष्ठेचे शेवटचे फळ हे खाली दिलेल्या श्लोकावरून स्पष्ट कळून येऊन ज्ञानाशिवाय अज्ञानाला या जन्ममरणाचे रहाटगाडगे कधी सुटत नाही, लक्षात येईल.
जरामरणमोक्षाय मामाश्रित्ययतन्ति ये। ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्म कर्मचाखिलम् ॥ ७।२९ ।।
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । दयामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते‘ ॥ १०॥१०॥
‘निर्मानमोहा जितसङगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः । द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः परमव्ययं तत्‘ ।।१५।५।।
‘न तद्भासयते सूर्यो न शशाङको न पावकः ।यद्ग्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।। १५६ ॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥ ८॥१५॥
गुणानेत्ता नतीत्य त्रीन्देहि देहसमुद्भवान् । जन्ममृत्युज रादुःखै विमुक्तोऽमृतमभुते ।। १४२० ॥
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥२।५१ ।। ।
जन्म कर्म च दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्मनैति मामेति सोऽर्जुन ॥ ४।९।। । वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता भद्भावमागताः ॥ ४।१०। तबुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गछन्त्यपुनरावृत्तिज्ञाननिर्धुतकल्मषाः ।।५।१७।। अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमा गतिम्। यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।८२१ ॥ । ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्याय न्त उपासते ॥ १२॥६॥
‘तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात। भवामि नचिरात्पार्थं मय्यावेशितचेतसाम् ॥ १२।७ ॥
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः । शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥६॥१५॥
‘यथा दिपो निवातस्थो नेड.गते सोपमा स्मृता । योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ ६॥१९॥ ‘सुखमात्यन्तिकं यत्तबुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् । वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ।। ६।२१ ॥
‘अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप । अप्राप्य मां निवर्तन्ते मुत्यसंसारवर्मनि ।।९।३।।
‘कामात्मन: स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुला भोगैश्वर्यगति प्रति ।। २।४३ ।।
‘त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्टवा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।। ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नान्तिदिव्यान्दिविदेवभोगान्‘ ।।९।२० ॥
‘ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोक विशन्ति।। एवंत्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतंकामकामालभन्ते ॥ ९॥२१॥
‘अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः । प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६॥१६॥
‘तानहं द्विषतःक्रूरान्संसारेषु नराधमान् । क्षिपाम्यजस्त्रमशु भानासुरीष्वेव योनिषु ॥१६।१९ ।।
‘आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि । मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ १६॥२०॥
‘ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थामध्ये तिष्ठन्ति राजसाः । जधन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥१४।१८||
‘पोहणे सिकला तो तरेल । पोहणे नेणें तो बुडेल। येथेंहि अनुमान करील । ऐसा कवणु ॥ (दास. ९–७–३५)
तैसें जयास ज्ञान जालें। ते ते तितुकेच तरले। ज्याचें बंधनचि तुटले। तोचि मुक्त (दास. ९–७–३५) ‘ज्ञाने चुके जन्ममरण । सगट बोलणे अप्रमाण । वेदशास्त्र आणि पुराण । मग कासयासी ॥‘ (दास. ९–७–४०)
आतां तुटला अनुमान । ज्ञानियासी कळे ज्ञान । अज्ञानास जन्ममरण चुकेचिना ॥‘ (दास. ९–३–४३)
। जन्मी जी सुखदुःखें अनुभविली जातात त्या सर्वांची कारणे या जन्मीच शोधू लागलों तर सांपडणार नाहीत. अपराधाशिवाय शिक्षा होणे प्रयत्नाशिवाय फळ आयतें चालून येणे वगैरे बघितले ।म्हणजे याला मागच्या जन्माचाच संबंध लावावा लागतो. अर्था अर्थी संबंध नसलेल्या माणसाची जर कोणी भर करीत असेल तर तो त्याच्या मागच्या जन्मींचा ‘ऋणकरी‘ आहेअसे ।“म्हणतात . ‘त्याचे आमचे नातेगोते काही नाही. ऋणानुबंध !’या वाक्यात ऋणानबंध याचा अर्थ मागच्या जन्मीचा संबंध असा होतो . ‘या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मो‘ मी जन्मांतरीचे पातक भोगत आहे‘ वगैरे सहज ऐकिवात येणा–या वाक्यांतून पुनर्जन्मा ची कल्पना जीवाच्या ठिकाणी किती दृढमल आहे हे लक्षात येईल. केलेल्या कर्माचे फळ न मिळतां प्रयत्न व्यर्थ होणे व या जन्मी प्रयत्न ल करतां अकस्मात ।।‘ लाभणे यालाच ‘कृतप्रणाश‘ व ‘अकृताभाग्यम् असे म्हणतात यावरून पुनर्जन्म गृहीत धरला जातो. एकाच आईबापाच्या या आवळ्याजावळया मुलांत एक मुलगा एक मलगी
असणे शिक्षण वगैरे समान असून त्यांच्यात विविध विषमता |दिसून येणे , जगात एकाप्रमाणे एक नसणे, एकाच जगांत अनेक वैचित्र्य दिसून येणे, या सर्वांचे कारण काय ? या विचाराचें कोडे पडू नये म्हणून भगवंतानीच ‘यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कोन्तेय सदा सद्भावभावित:। (भ. गी. ८\१६) असे अर्जुनाला पुढे करून सर्व जीवाना कळविले आहे. ‘अन्ते मतिः सा गतिः ।‘ हे वाक्य बहुतेक सर्वमुखी असते. यावरून अंतकाळी जो भाव उमटतो, ज्या भावनेचे चिंतन घडते त्या भावनेचे रूपच त्या जीवाला प्राप्त होते हे स्पष्ट जाहे. ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही॥ भ. गो. २॥२२॥ किंमत देऊन जसे एखादें नवीन वस्त्र विकत घ्यावे त्याप्रमाण कर्म करून त्याचा मोबदला म्हणजे वासनेप्रमाणे शरीर धारण करावे. त्या दुकानदाराप्रमाणे योग्य किंमत घेऊन वस्त्र देणारा येथे परमेश्वर आहे. हा अविनाशी आणि अजन्मा. ‘न जजान न मरिष्यति ॥ ___‘सविषयं मनोबन्धाय । ‘ (मं. ब्रा.) विषयव्यामोहानी युक्त असणारे मनच बंध–बंध हा नेहमी दुःखरूपच असतो. ‘यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते । अतो निर्विषयं नियं मन कार्य मुमुषणा॥‘ (ब्र. वि.) ज्या अर्थी मनाच्या निर्विषयतेनें मुक्ति लाभते, त्या अर्थी मुक्ति इच्छिणाऱ्यानी मन हे सदोदित निर्विषय असें करीत असावें.