Literature

विषय विवेचन ८

निर्विषयं मुक्त्तये भवति।निर्विषय मनच निजनिरतिशय सुखप्राप्तिरूप मोक्षास कारण होते. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः मनच मनुष्याच्या बंधमोक्षास कारणीभूत वीट आणणाया घाणेरड्या देहानेच भोगले जाणारे, अनुभवाच्या दुसऱ्या क्षणीच वेगळे पाडणारे, शेवटी दुःखशोकासच कारण होणारें, स्त्रीपुत्रांच्या कोमलमृदु मोहपाशांत अडकविणारे, कर्मक्लेशानी लाभणारे, आपल्या भोगानें इंद्रियांची शक्ति कमी करून देहाच्या क्षीणतेला कारण होऊन, बुद्धीची शक्ति घालवून, देहेंद्रियांची शक्ति कमी झाली असता विषयभोगाविषयींच्या त्याच्या अक्षय अवस्थेत भोगाची इच्छा आपल्या स्वभावाने दुणावून मनांत अति हळहळ उत्पन्न करणारे, आपल्या अनुभवाने तीव्र इच्छेच्या अतिरेकाने बुद्धि भ्रंशास तसेंच क्षयमहारोगादिकासहि कारण होणार, परइच्छेच्या कारागृहांत वासनेच्या खड्या पहाऱ्यातून पारतन्त्र्यं शृंखला कायमची पायांत खिळवून आपल्या इच्छेप्रमाणे रोववून  अतिशय छळणारे असे हे हितशत्रुविषयसुख, थोडेसुद्धा सुखाला कारण होतां 

वेडे उगीच भरी भरले असत्याचे॥· अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः (. गी५।१५) कोवळे कोवळे शब्द मुंजळ मर्यादा लज्जा मुख कमळ वक्त्रलोकने केवळ ग्रामज्यांचे मैदावे ३।२|४३

तुम्ही माझिया जिवातील जीव म्हणौनि अत्यंत लाघव दाअभ्यन्तरीऊनियां चित्त सर्व हिरोनि घेतले॥‘ (दास. ३।२।४६)

मैंद सोयरीक काढिती। फांसे घालून प्राण घेती।तैसें आयुष्य गेलियां अंती। प्राणियांस होये ॥४७॥ परीति कामिनीसी लागली जरी तयेसी कोणी रागेजली।तरी परम क्षिती वाटली। मानसी गुप्तरूपे ॥४८॥  वेवसाय करितां बाहेरी। मन लागलेसे घरों। क्षणक्षणा अभ्यांतरी। स्मरण होये कामिनीचें (दास. ४५)  

जरी देखे क्षण येक डोळां जरी जीव होय उताविळा। प्रीतीपात्र अंतर्कळा घेऊन गेला (दास. ४२) ‘पाहाता शरीराचें मूळ ऐसें नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामधे जन्म यासी  

(दास. ११।)) ‘अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचाचि पुतळा । तेथे निर्मळ पणाचा सोहळा केवी घडे ॥१२॥ रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोनी जाला गाळ त्या गाळाचेच केवळ शरीर हे ॥१३॥वरिवरि दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नाचे जैसें झाकण चर्मकुंडाचें। उघडितांच नये ॥१४॥अस्थिपंजर उभविला | सीरानाडी गुंडाळिला। मेदमांसे सराविला सांदोसांदी भरूनी ॥१६॥नर्काचे कोठार भरले। आंतबाहेरी लिडिविडिले | मूत्र पोतडे जमले। दुर्गधीचे ॥१८॥ 

जंत किडे आणी आंतडी। नाना दुर्गंधीची पोतडी। अमुप लवथवती कातडी। कंटाळवाणी ॥१९॥सर्वांगास सीर प्रमाण तेथे वळसे वाहे प्राण | उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी नेघवे ॥२०॥ 

डोळा निघती चिपडें नाकी दाटती मेकडे प्रातःकाळी घाणी पडे मळासारिखी ॥२१॥लाळ थुंका आणि मळ पीत श्लेष्मा प्रबळ तयास म्हणती मुखकमळ चंद्रासारिखे ॥२२॥  

अकायो निर्गुणों ह्यात्मा। आत्मस्वरूप अशरीर आणि निर्गुण आहे. देह आणि गुणांनी रहित अशा आम्हाला आम्ही पवित्र देहचमीम्हणून मानणे या सत्व, रज आणि तमोगुणानी घेऊन यापैकी जो ज्यावेळी प्रमुखपणे भासेल, मनांत ज्या कल्पना येतील त्याप्रमाणेच आपण बनणे, आपल्या यथार्थ नित्य अशा अद्वितीय निर्गुण सुखरूपतेची म्हणजे आपल्या निर्विकल्प स्वरूपाची आठवणही बाळगणे याला काय म्हणावे ? ‘अज्ञान वास्यहि मूलकारणम्।याला कारण म्हणणे आपले अज्ञानच झाले  दुसरे काय ? मीम्हणजे देहच असे प्रत्येकाला जन्मा पानच वाटत असते असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही मी देहही कल्पना इतकी दृढमूल झाली आहे की, ‘बाबा! तूं ; नव्हेस.’ असे जर कोणा एका महात्म्याने सांगितले तर तें ।।। याबरोबर, तसे असू शकेल असे देखील वाटणारनाही.’ 

देहया भावनेचे बाळकडू लहानपणीच पाजविले गेले असते धुळाक्षरापासुन हाच पाठ प्रत्येकाकडून गिरवून घेतला जातो.’ habit is Second nature ते आतां सुटतां सुटत नाही. देहोहमिति पक्षानं तदेवाज्ञानमुच्यते (ते.) अज्ञान म्हणून जर काही असेल तर ते हेंच. सारे जणच वेड्यांचे इस्पितळ. सरकारदरबारातून अथवा प्रत्येकाच्या खाजगी व्यवहारातून पहा ! जिकडे तिकडे मोठ्यापासून तो सामान्यापर्यंत साऱ्यांची योग्यता एकच.न्यायमंदिरांत न्याय देणारा आणि घेणारा दोन्हीहि एकाच कोटीची  माणसे

मी कोण ऐसें नेणिजे तया नांव बोलिजें। अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म तें (दास. ७।२।२२

‘मी कोण ऐसा हेत। धरून पाहातां देहातींत। अवलोकिता नेमस्त स्वरूपचि होये (दास. ५।६।२१) 

जो या देहाचा पांगिला। आणि देहबुद्धीचा आंखिला। तो बापुडाचेवला रामापासूनि (एकवीस समासी १०।३१

मी कोण हे जाणावें मी पण त्याहून अनन्य व्हावें । मग समाधान तें स्वभावें अंगी बाणे॥(दास. ६।८|५०) ‘आपले मूळ बरें शोधितां |आपली तो मायिक वार्ता पुढे वस्तूच तत्त्वतां समाधान (दास. ६।१०।१३)आपण म्हणजे मी पण मीपण म्हणजे जीवपण । जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला (दास. ७।२।२०)सोडिता तया संगासी ऐक्य होये निःसंगासी। कल्पनें विणा प्राप्तीसी अधिकार ऐसा (दास. ७।२।२१) स्वरूपों सावधपण हेचि ज्ञानाचे लक्षण ब्रह्मी पडे विस्मरण हे अज्ञान दशा॥‘ (पंचसमासी २।४)

ब्रह्मांत जे आद्य कार्य झाले तेअहंब्रह्मस्फूरणात्मकच ! ‘ब्रह्म असतां निराकार तेथें स्फूतिरूप अहकार।अहंब्रह्मअथवादेहोऽहंयांतअहंहे सामान्यत्वे एकच. यांत ब्रह्मभाव भासणे म्हणजे यथार्थं स्वरूपाची जाणीव होणे हेच ज्ञान आणि अतिकुश्चल असा देहभाव भासणे म्हणजे यथार्थस्वरूपाची जाणीव होणे हेच अज्ञांन. ज्ञान म्हणजे स्वरूपाची जाणीव. अज्ञान म्हणजे स्वरूपाची नेणीव. ब्रह्मात प्रथम जाणीवच उत्पन्न होते हे श्रुतीच्या श्रीमदासबोधाच्या आधाराने मागेच सिद्ध करून दाखविले आहे. तस्मात्रत्सर्वम भवत् अहं ब्रह्म स्फूरणापासूनच सर्व काही झाले. यात जें मायेमुळे अहंब्रह्मस्फुरण झाले ते ब्रह्माच्या स्मृतिरूपाने ब्रह्मांकडेंच आपले मूळ म्हणून बोट दाखवीत असल्या मुळे माया ब्रह्मविरहित जडत्त्व असल्यामुळेअहं ब्रह्मास्मि स्फुरणांत दिसून येणारे ज्ञान मायेचे नसून, त्याचा संबंध ब्रह्माकडेच जातो हे स्पष्ट कळविण्याकरितां ब्रह्मच सर्व झालेअसे सांगितले इतकेच. ‘ब्रह्म झालेम्हणजे ब्रह्म विकार पावले असे होईल. विकारी पदार्थाला विकाराचे ज्ञान नसते. हे जड. तेव्हां ब्रह्म कधी काही होणे शक्य नाही. केवळब्रह्मातहि मायेविरहित‘ ‘अहंम्हणून उत्पन्न होणे शक्य नसल्यामुळे यालाब्रह्म आणि मायादोन्ही कारणीभूत आहेत हे स्पष्ट आहे. याच दृष्टीने मायेच्या उपाधीने मुक्त असणारे ब्रह्म म्हणजेअहं ब्रह्म स्फुरण‘. यालाचमायोपाधिक ईश्वरअसे म्हणतात. हाच आपल्या संकल्पाने सर्व कांही निर्मून त्यांत प्रवेश करतो वगैरे मागेच आले आहे. प्रसंगोपात्त पुढेहि येईलच. येथेमी देहही नेणीव जी झाली ती कोणापासून याचा विचार करावयाचा आहे. ही स्वतःच झाली म्हणावें तर हिला प्रथम स्फूर्तीत भासणाऱ्या अहं याचाच आधार आहे. आधार हा पूर्वीच असतो. नंतरच हे; यामुळे अस्तित्वात असणारेआधेयपूर्वी असणारेच कारण असते आणि या कारणा मुळेच वा यापासून उत्पन्न झालेले सर्व जगते. अर्थात आधेयापासून आधाराची, कार्यापासून कारणाची उत्पत्ति संभवत नसल्यामुळेअहं ब्रह्मास्मिया कारणरुप जाणीवेपासूनचदेहोऽहंही नेणीव उत्पन्न झाली असली पाहिजे. ‘अहं ब्रह्मास्मिस्फू रणरूप जाणीवच ईश्वर, असे सिद्ध झाले की याच्यापासूनच देहाभिमानाने लक्षित होणारीअहं देहोऽस्मिही स्फूरणरूप जाणीव म्हणजे जीवा भावाची उत्पत्ति मानावी लागते. ज्या अर्थी जीवापासून ईश्वराची उत्पत्ति होणे शक्य नाही त्या अर्थी ईश्वरापासूनच जीवाची उत्पत्ति हे स्पष्ट आहे. अनेन जीवेनात्मनानुप्रविश्य ही छांदोग्याची श्रुति याचे सत्यत्व पटविते. ब्रह्माच्या ठिकाणी अहं अशी स्फूर्ति होऊन ईश्वरभावाची मायेमुळे जरी उत्पत्ति झाली तरी ब्रह्म जसेच्या तसेंच असल्याप्रमाणे या ईश्वराच्या ठिकाणी 

अशी जीवाभावाची उत्पत्ति त्याच्या विविध होण्याच्या झाली असली तरी जशाच्या तसाच आहे. स्वप्नस्थ पुरुष जसा आपणच सर्व काही होऊन त्याहून निराळा असतो त्याप्रमाणेच येथे समजावें. आपली जणू काय भावना आणून देण्याकरितां स्वप्नावस्था असल्याच भिन्न शक्त्याश्रित स्वरूपभूत अशा जीवांत ठेवली आहे असे वाटते. शक्ति कोणची वगैरे विवरण चौदाव्या आर्ये+च्या विवरणातून येईल.

मीपणाच्या जाणीवेमुळेच ही सर्व वासना. जीवाच्या ठिकाणी असणारी ही मीपणाची जाणीवअहंया योगाने आपला संबंध मूळअहं ब्रह्मया ब्रह्मातील आद्यकार्यरूप स्फूर्तीतील जीवांत दिसून येणारा मीपणाचा धागा हातांत धरून त्याच्या उत्पत्तिस्थळाचा शोध करीत निघालो म्हणजे ब्रह्मस्फूरणात्मक मूळमायेंत सर्वकारणरूपाने याचे मूळ आढळून येते. स्त्रीपुरुषात्मक देह म्हणजे कांही यामीचे स्वरूप प्रत्येकाचा देह म्हणजे कोथळा आहे, मल, मूत्र, मांस, रक्त, रेत, घाम, लाळ, कफ, वात, पित्त, नख, केश, स्नायु, अस्थि, आतडी, पित्तशयादि अनेक अशा अन्न विकाराचाच पुतळा. मोरीचे पाणी वाहून जाण्याची सोय जिथे नसते तिथे सांचलेल्या घाणेरड्या पाण्यांतून किड्यांची उत्पत्ति झाल्याप्रमाणव या देहांत अनेक कृमीकीटकांची उत्पत्ति झालेली असते.

कुंड धुतां शुद्ध होतें| त्यास प्रत्यई धुई जेते| तरी दुर्गंधी देहातें | शुद्धता ये (३।१।१५)

पोटीं नसतां मळ मूत्र ओक |मरोन जाती सकळ लोक ||झाला राव अथवा रंक |पोटी विष्टा चुकेना (दास. २६)

निर्मळपणे काढू जातां । तरी देह पडेल तत्त्वता । एवं देहाची व्यवस्था । ऐसी असे ॥ (दास ३-१-२७ ) अशा या सर्व घाणेरड्या द्रव्यांनी बनलेल्या आणि म्हणून त्यानींच भरलेल्या अशा या देहाला ‘मी’ मानणे किती किळसवाणे ? यांत असणाऱ्या कोणच्याहि द्रव्याला ‘मी’ म्हणून मानणे जसे अयोग्य तसेच त्या सर्वाच्या एकत्रित स्वरूपाच्या देहालाहि ‘मी’ म्हणणे अयोग्यच.

पोटी घालितां दिव्यान्न । कांहीं विष्टा कांहीं वमन । भागिरथीचें घेतां जीवन| त्याची होय लघुशंका ||

“आत घातलेल्या अन्नपाण्याचे सप्तधातु व अवांतर मलमूत्रादि विकार बनविणारे सजीव चालते बोलतें एक यंत्र म्हणजेच देह. मलादिकांना व त्यांच्या या आपोआप चालणान्या देहरूपी यंत्राला ‘मी’ म्हणणे रास्त होणार नाही. या देहाचा विचार केला म्हणजे शौचकूपाला ‘मी’ म्हणणाऱ्यांची कोटीहि त्याच्या या देहा जास्त असणाऱ्या स्वच्छतेमुळे थोडीशी वरच्या प्रतीचीच ठरेल. वस्तु असल्याप्रमाणेच ओळखणे उत्तम.

येथें देहाचे थोरपण । तेंचि उदास नागवण । देहाचेनि लोभ खुण । चुके परमार्थाची ॥ (ए.स. ७-४१) ‘देहासि थोरपण आणिता । सीणचि उरे तत्त्वता । रासभाचे अश्व होतां । परम संकट || ( ए. स. ७।४२ ) ‘देहमात्र तितुका निंद्य । येके मानिला परभवंद्य | तरी तो वंदिताचि खेद | पावेल तेणें ॥ (ए. स. ८-४३) ‘ देह विटाळाचा पुतळा | देह अशुद्धाचा गोळा | देहनाना अनर्गळा | दुर्गंधीचा ओतला ॥ (ए.स. ७-४४)

‘ऐसीया मोधळ्याचा अभिमान । माथा वाहती मूढजन |वस्त्री भूषणीं शृंगारुन । मी थोर म्हणती ॥ (ए. स. ७-४९ )

चर्चिती नाना सुगंध | तरी ते कार्य नव्हें शुद्ध | अवचिता उठे दुर्गंध । उपंदर पडे ॥ (ए. स. ७-५०)

*देहाच्या यथार्थ लक्षणा । कळावया बोलिलो जाणा । का त्या आत्मयाच्या खुणा । दृढ व्हाव्या म्हणोनी ।’ (स्वकृत )

आमच्या सर्वाच्या आयुष्यातून ही एक मोठी घोडचूक झाली आहे. विचार करून बघितलें म्हणजे आम्हां सर्वत्रांचे हे देहभिमानाचे आचरण किती हास्यास्पद आहे ? मलाप्रमाणे कातडे सुद्धां वीट आणणारे असतांना यांत सौंदर्याची भावना करणे म्हणजे याला काय म्हणावे ? या देहांत असणारें कांहीच दिसून न येता डोळ्याला दिसणाऱ्या तेवढया मलरुप कातडीच्या गिलाव्याला ‘मी’ म्हणून मानणे अथवा एवढ्याशा भागाला बघून दुसरा म्हणून मनांत आणणे हैं किती भ्रामक आहे ? देह म्हणून जरी स्वतःला अथवा दुसऱ्याला मानावयाचे ठरल्यास ते संबंध ओळखून तरी मानावें. पहिल्या जाणाऱ्या एका अत्यल्प भागावरून संबंधच देह मानणे म्हणजे किती भ्रामक ? मी अथवा दुसरा म्हणून जेव्हां कल्पना येते त्या वेळेला देहांत जितके म्हणून आहे तितकें सारें बधून, ओळखून, त्याचें यथार्थस्वरूप लक्षांत घेऊन ‘मी’ म्हणून स्वतःला अथवा ‘हा’ म्हणून दुसऱ्याला मानणे तरी शक्य आहे का? देह हा अनेक विकारांचा आहे. सर्वांचे पृथकरण करून, ती सारी द्रव्ये वेगळी वेगळी पुढे मांडून यापैकी ‘तू’ कोण ? म्हणून विचारले असतां कोणच्याला तो ‘मी’ म्हणेल ? यापैकी एकहि जर तूं नव्हेस तर या सर्वांचे एकीकरणरूप हे शरीर तरी तूं होशील कां म्हणून त्याला विचारले तर तो काय उत्तर देईल? देहांतील त्या द्रव्यांपैकी कोणचेहि ‘मी’ म्हणून म्हणणार नाही. त्या सर्व द्रव्यांच्या एकी करणाने यातून ‘मी’ हे स्फुरण भासेल म्हणून बघितले तरी निष्फळच, बरोबरच आहे. या देहांला अथवा देहांत असणाऱ्या त्वगाद्वी द्रव्याला जे कारण त्या अन्नांत जर ‘मी’ म्हणून भासत नाही तर ते यांतून कसें भासणार ? आईबापांच्या देहांतून स्त्रव लेल्या रज-रेताला ‘मी’ म्हणून मानणारा जर कोणी हरीचा लाल या जगांत दिसेल तर तो त्यांपासून झालेल्या देहालासुद्धा ‘मी’ म्हणाल, अन्नातून व ते अन्न खाल्ल्यानंतर त्याच्या त्या झालेल्या रस-रक्तादि विकारांतून या सर्वांनी युक्त असणाऱ्या देहांतून ज्ञान जर आढळून येत नाही तर ज्ञानात्मक असणारे ‘मी’ हे ‘भान या स्वरूपाचे म्हणून कसें मानावे ? देहाला ज्ञान नसल्यामुळे ‘मी’ म्हणून असणाऱ्या या सामान्य भानांतून दिसून येणारे देहसंबंधी स्त्री-पुरुष भाव हे खोटेच झाले. अन्नातून व त्याच्या मलमूत्रादि विकारांतून जर मी ‘स्त्री’ अथवा ‘पुरुष’ म्हणून दर्शविलें गेले असते तर त्यापासून झालेल्या या देहाकरवींहि ‘ मी अमूक म्हणून दर्शविले जाते असे मानावयास हरकत नाही. देह हां ‘मी स्त्री अथवा ‘पुरुष’ म्हणून सांगतो असें म्हणावें तर तसें शव का बोलून दाखवित नाही ? तात्पर्य देहाला मी म्हणून भाव होणे कांही शक्य नाही असें ठरले तर स्त्री-पुरुषादि देहांतून सामान्यपणे दिसून येणारे ‘मी’ हे आपले भान असणाऱ्या स्त्रीपुरुषादि देहाचे नव्हें. मनासह कोणच्याहि इंद्रियाला या देहांत असणाऱ्या सर्व द्रव्याला बघून जर किळस आल्याशिवाय रहात नाही तर या देहाच्याच सुखाकरितां यांतून दिसून येणारी प्रवृत्ति किती भ्रामक म्हणून सांगावी. देहहि आपल्या यथार्थ स्वरूपानें दाखवून घेत नाही. यांतून ‘मी’ म्हणून दिसून येणारी प्रवृत्तिहि भ्रामकच. किळसवाण्या देहाचा मन-इंद्रियाला वीट येणे हाच जर त्याचा निसर्ग झाला तर त्यामधून दिसून येणाऱ्या सौंदर्यादि भावना, कामादि वृत्तीनी उत्पन्न होणाऱ्या देहोपभोगात्मक सुखाच्या कल्पना बघितल्या म्हणजे या मनइंद्रियांची प्रवृत्तीहि यथार्थ जाणीव देणारे नव्हे. सारीच फसवणूक! ‘आंधळे पाऊली ओळखावें’ या न्यायाने या सर्वांची उत्पत्ति अज्ञानापासूनच जाणावी. अज्ञानापासून झालेले अज्ञान असणार! सुखाची किळस किंवा वीट येणे शक्य नसल्यामुळे या सर्वांच माहेरघर असणाऱ्या देहातून ते मिळणे शक्य नाही. म्हणून मन इंद्रियातून असणारी दैहिक सुखाची कल्पना काढून टाकून, हा भ्रम या मनइंद्रिया करवींच’ होत असल्यामुळे यांच्या निष्प्रयोजक दृष्टीने यांना मालवून यांतून दिसून येणाच्या खुळचट संस्काराला अज्ञानाशिवाय काही कारण नसल्यामुळे मन-ज्ञानेंद्रियादिवृत्तींनी युक्त असणाऱ्या लिंगदेहाला, त्यातून दिसून येणाऱ्या देहसुखाच्या वासनेला, या वासनेमुळे भासणाऱ्या देहाला, या देहाकडून भोग्यदृष्टीने बघितल्या जाणाऱ्या या सर्वं जगाला, या जगांतून घडणाऱ्या सर्व भ्रामक क्रियेला व यापासून खरे सुख न समजून येता त्यामुळे पडत असलेल्या पांघरूणाला, या पांघरुणामुळे होणाऱ्या साऱ्या अनर्याला अज्ञात कारण जाणून सुखाच्या भावनेतून हे व यापासून उत्पन्न होणारे सूक्ष्म, स्थूळ देह या दोहींना भोग्य म्हणून वाटणारे सारे दृश्य काढून टाकून, सुख कोणचे म्हणून बघू गेले असता तेथे हा स्थूल किंवा सूक्ष्म देह उरत नहीं. या संघाताला भिन्नत्वाचे भान ज्याच्यामुळे होते ते अज्ञानहि पण तेथे भासत नाही, तेथे भिन्नत्व नष्ट झाल्यानंतर उरणारे केवळ अद्वय सुख आत्मीय भावनेने प्रकाशू लागते. हेंच आपल्या अद्वितीय सुखरूपतेचें मनोवृत्तिरहित असणारे चिन्मय असे अतिसूक्ष्म भान म्हणजेच ‘अहं ब्रह्मास्मि’ स्फुरण. हेच तें ब्रह्म

स्वरूपांत झालेले मूळ स्फूरणात्मक सर्व कारणस्वरूप या स्फुरणाची उत्पत्ति जिच्यामुळे झाली तीच मूळमाया. यांत आपण श्रीसमर्थांच्या ओवीप्रमाणे जीवेशाचा विचार केला अजून आपल्याला जीवेशा विषयी बराच विचार करावयाचा आहे. मागें ‘अहं ब्रह्मास्मि’ स्फुरणालाच ‘माया म्हणून सिद्ध करून आतां जिच्यामुळे या शब्दाने या स्फुरणाचे कारण ‘माया’ म्हणून म्हटले यांत खरें कोणचे ? मायेची व्यक्तता ब्रह्मांत या स्फुरणानेच झाली असल्या मुळे ‘व्यवक्तताच जन्म’ यादृष्टीने या स्फुरणाला माया म्हटलें. ब्रह्माच्या केवळ ज्ञानमात्र स्थितीत असंभवनीय असणारे हे स्फुरण व्हावयास कांहीतरी कारण पाहिजे तेंव्हा अद्वितीय ब्रह्माच्या दृष्टीने दुसरें कांही कारण दिसत नसताना ब्रह्मांत याचा आरोप होत असल्यामुळे याच्या उत्पत्तीला ब्रह्माच्याच योगानें अस्तित्त्वात असणारी, ब्रह्माचा अद्वितीयपणा जिच्यामुळे नष्ट होत नाही अशी कोणीची तरी एक शक्ति मानून तिच्या ब्रह्म दृष्टीने ठरणाच्या मिथ्यत्वामुळे तिला ‘माया’ असे अत्वर्थक नाव दिले.

home-last-sec-img