Literature

वेदशास्त्राध्ययनाचे महत्त्व

वेदविद्विजहस्तेन सेवां संगृह्यते यदि । न तस्य वर्धते धर्मः श्रीरायुः क्षीयते ध्रुवम् ॥ (लघु अश्वलायन:स्मृ. २२।१७) वेदज्ञ ब्राह्मणाच्या हातून जर कोणी सेवा घेईल तर. धर्माचरणाने मिळविलेले पुण्य नष्ट होतें, धर्मबुद्धि खुंटते, आयुष्य आणि संपत्ति निश्चयानें क्षीण होते. यस्य कस्य नरो यस्तु व्रते निष्ठुरभाषणम् । द्विजस्येह विशेषं च स च गच्छेदधोगति ॥ १८ ॥ कोणीहि आपले व्रत पाळतांना विशेषतः व्रतस्य ब्राह्मणाला जो

निष्ठुर बोलतो तो अधोगतीला जातो. कुरुते योऽपमानं च ब्राह्मणस्य विशेषतः । तस्याऽऽयुः क्षीयते नूनमायुलक्ष्मीश्च संततिः ||१९|| अपमान हा कोणाचाहि करूं नये. त्यांतून ब्राह्मणांचा अपमान तर फारच जांचतो. अपमान करणाऱ्याचे आयुष्य, संपत्ति आणि संतति नष्ट होते. ब्राह्मणहि स्वधर्मानें राहावयाला पाहिजेत, कर्मनिष्ट पाहिजेत, यश्च कर्मपरित्यागी पराधीनस्तथैव च । अधीतोऽपि द्विजश्चैव स च शूद्रसमो भवेत् ॥ २२ ॥ – जो आपले धर्मकर्म सोडून नोकरी इत्यादिकांनी पराधीन होतो, जरी त्यानें वेदाध्ययन केलें असले तरी त्या सेवाधर्मानें, (सेवा शूद्रांना सांगितली असल्यामुळे ) तो शूद्रवत् होतो. अनधीत्य द्विजो वेदानन्यत्र कुरुते श्रमम् । स जीवन्नेव शूद्रत्वमाशु गच्छति सान्वयः ॥ २३ ॥ स्नान करून वेदांचा अभ्यास न करतां आतां होतें त्याप्रमाणे ‘ CAT कॅट’ म्हणून पाठ करूं लागला किंवा चांगल्या वैद्य काचा अभ्यास करतो म्हणून तो माणसांची हाडें गोळा करून बसला किंवा रसायनादि दुसऱ्या कोणत्याहि आंग्ल विद्यांच्या अभ्यासाला लागला म्हणजे तो शूद्राप्रमाणे होतो. आचार विचार कांहीं राहात नाही. आणि आतां झालेली स्थिति होते. प्रत्यूषे च प्रदोषे च यदधीयेत ब्राह्मणः । तेन राष्ट्रं च राज्यं च वर्धते ब्रह्मवर्चसा ॥ (शंखलिखित स्मृति २१) प्रातःकाली व प्रदोष कालीं ब्राह्मण अध्ययन करील तर त्यामुळे ब्रह्मवर्चस्त्रानें तें राष्ट्र व तें राज्य वृद्धिंगत होतें. अग्रं वृक्षस्य राजानो मूलं वृक्षस्य ब्राह्मणाः । तस्मान्मूलं न हिंसीयान्मूलाग्रं प्ररोहति ||२२|| राष्ट्रवृक्षाचे मूळ ब्राह्मशक्ति व क्षात्रशक्ति हा शेंडा आहे. मूळ उपटू नये. मूळ असल्यामुळेच शेंड्याचा विस्तार होतो. फलं वृक्षस्य राजानः पुष्पं वृक्षस्य ब्राह्मणाः । तस्मात्पुष्पं न हिंसीयात्पुष्पात्संजा यते फलम् ||२३|| – या राष्ट्रतरूचें फळरूप राजशासन आहे व पुष्परूप ब्राह्मशक्ति आहे. पुष्प नासेल असे करूं नये, पुष्पामुळेच फळ होतें.गावो भूमिः कलत्रं च ब्रह्मस्वहरणं तथा । यस्तु न त्रायते राजा तमाहुर्ब्रह्मघातकम् ||२४|| -जो राज्यकर्ता ब्राह्मणांच्या गाईंचे, जमिनीचे, मुलाबाळांचे, संपत्तीचें रक्षण करीत नाही त्याला ब्रह्महत्त्या लागते. अलीकडे वेदविद्येनें चरितार्थ चालत नाही म्हणून वैदिक शास्त्री मंडळी इंग्लिश शिकावयाला घालतात आणि मग धर्माच्या दृष्टीने मुलगा हातचा गेला म्हणून चरफडतात. शेंडीला चाट मिळते. सलत असलेलें जानवें फेंकून देण्यांत येतें. क्रॉपचा पगढा डोक्यावर बसतो. सरळ ‘ आंग्ल संस्कृतीला मी आतां डोक्यावरच धारण केले आहे म्हणून प्रत्यक्ष तो दाखवितो. आपल्या आईबापांना वेड्यांत काढतो. ते परदेशी शब्द तोडांत बसले म्हणजे वेदाध्ययन तोंडाला लागत नाही. वृत्ति निराळी बनते. वैदिकांचा अयशायांचा मुलगा म्हणून कोणी परिचय करून दिल्यामुळे ओळखू येतो, अशी त्यांची चिन्हें. ते ब्रह्मवर्चस्व पुढे त्यांच्या तोंडावर दिसूनच येत नाही. याला अपवादाची मुले फार थोडी. ब्राह्मणांनी शेंडी का ठेवावी, जानवें कां घालावे याच्याबद्दल आपण थोडा पुढे विचार करणारच आहोत.

प्रस्तुत परकीय विद्या शिकली तरी ती ऐहिक जीवनापुरतीच असते. मरणोत्तर त्या विवेचा कांही उपयोग होत नाही. धर्म हा ऐहिक पारलौकिक सुखाकरिता आहे. धर्माचरणाच्या मनुष्याला परमात्म्याचे साहाय्य लाभते. धर्म हा परमाणात आहे. धर्माप्रमाणे वागणे म्हणचे परमात्म्याच्याच अज्ञा पाळणे होय. धर्मत्यागाने मनुष्य देवद्रोही बनतो. धर्माचे नियम पाळले नाहीत म्हणजे धर्मत्याग घडतो. हा वैदिकधर्म ईशप्रणीत आहे हे जरी एखाया वेळी पटले नाही तरी या धर्माविषयी उद्धृत केलेल्या परकीयांच्या उतान्यांनी तरी यांचे महत्त्व समजून येऊन त्यांच्या त्यागाने आपला विश्वमान्य धर्मच अजाणपणाने त्यागला जातो हे कळून येऊन आपल्या धर्माची चिन्हें तेजस्वितेने तरुण वर्ग जर बाळगील तर ते त्यांच्या आर्यकुलोत्पन्नतेला साजेलसे होईल हा इवें सांगण्याचा अभिप्राय आहे. आज वेदविद्येला मान्यता नाही म्हणण्यापेक्षा फार कमी आहे असे म्हणता येईल. चरितार्याचा प्रश्न हा कोणापुढेहिं उमा राहिल्याशिवाय राहात नाही. तेव्हां आईबापांनी आंग्ल किडे घातले तरी मुलांचातली धर्मश्रद्धा नाहींशी व्हावी म्हणून घातलेले नसते. या दृष्टीने चरितार्याकरिता अथवा ज्ञानाकरितां परकीय विज्ञानशाखांचा अभ्यास केला तरी आपली विश्रेष्ट संस्कृति विसरूं नये की सोडूं नये. मनु मुनी हे त्रिकालत होते. पुढे परकीयांच्या स्वार्याला बळी पडून भारतीय लोक थेट आर्य संस्कृति घालवून बसतील, परकी भाषेनेंच परकीय संस्कार नाही म्हटले तरी शिरतात; सर्व शाखांच्या अध्ययनापूर्वी भाषेचेच अध्यनन व्हावयास लागते, दुसरी भाषाच शिकूं नये म्हणून नियम घालून दिल्यास, परदेशांतच जाऊं नये म्हणून नियम घालून दिल्यास दुसऱ्या संस्कृतीचा पगडा आर्यावर बसून वैदिक संस्कृति नष्ट होणार नाही म्हणूनच केवळ त्यांना निषिद्ध म्हणून मनुमुनीनी ‘टरविले असावे, हे आतांच्या परिस्थितीवरून ताडता येते. त्या ऋषिमुनींच्या त्रिकालज्ञतेविषयी धन्यवाद यावेसे वाटतात. मेकॉलेनें १८५७ सालच्या

बंडाची कारणे शोधून हिंदूंना आपल्या धर्माचा अभिमान अधिक आहे आणि तो घालविल्याशिवाय आपले राज्य स्थिर होणार नाही हे जाणले. नौकरीच्या आशेनें आपल्या भाषेचा अभ्यास ते अधिक करतील, आपल्या शाखांचा अभ्यास करतील व त्या अभ्यासांत त्यांना धर्मकर्म आचरण्यास वेळ मिळणार नाहीं, ते सुटून इकडचाच अभ्यास झाला म्हणजे त्यांची धर्मश्रद्धा मलीन होत होत अभ्यासाने हेच गोड वाटू लागेल व ती हातची जाईल, असा घाट घालून याच अर्थाचे व्हिक्टोरिया राणीला पाठविलेले पत्र उपलब्ध होऊन बरेच दिवस झाले.

यामुळे आमच्या ऋषिमुनींनी केलेला प्रयत्न व मेकॉलेनें केलेला प्रयत्न दोन्हीहि डोळ्यापुढे उभे राहातात. त्यापूर्वी मुसलमानांच्या पातशाहीतहि असेच झाले. राजसत्तेला तोंड देऊन वागण्याचे धैर्य सर्वांनाच नसतें व प्रत्यक्ष राजसत्तेपुढे जीवनाच्या दृष्टीनेंहि सर्वसामान्यांना मान वांकवावीच लागते. राजसत्तेच्या माणसांनी आपल्या धर्माची, आपल्या मताची दीक्षा द्यावी असे स्वाभाविकच असते. या दृष्टीनें राजसत्तेचा सर्वसामान्यांवर परिणाम होतो. चांगले असो अगर वाईट असो एकदां सुटलें म्हणजे सुटले. आणि या धार्मिक नियमांचे व संस्कारांचे अगदी असे आहे. एकदां प्रातःस्नान सोडलें म्हणजे पुन्हां करूं नयेसेंच वाटते. प्रथम प्रथम आपण संध्या करावयाची सोडली हे बरे केले नाही म्हणून मनांत येतें. केली असती पण अभ्यास राहातो, वेळ मिळत नाहीं ना म्हणून तात्पुरत्या समाधानाच्या वृत्ति उठतात. इकडचे असे संस्कार मलीन होत होत मावळतात व तिकडच्या संस्काराची रोज नवीन पुढे चढतात व शेवटी ‘आमचे पूर्वज मूर्ख होते, मागासलेल्या माणसांची आर्य संस्कृति आहे, भोळ्याभाबड्या लोकांच्या केवळ भावना म्हणजेच त्यांतले आचारविचार, वर्ण-आश्रम इत्यादिक म्हणजे संकुचित बुद्धि आहे, सोवळे ओवळे म्हणजे भाबड्या आजीनें आचरावयाचे नियम होत,’ असे म्हणण्यापर्यंत पाळी येते. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः । हें गीतेचे वाक्य विसरून गेल्याला बरीच वर्षे लोटलेली असतात. योहि मोहाद्विषं पीत्वा नावगच्छति दुर्मतिः । स तस्य परिणामान्ते जानीते कर्मणः फलम् । (वा. रा. उ. कां. स. १५-२०) पाश्चात्य राष्ट्र जीवनाच्या इतिकर्तव्यतेच्या व नितांत शांतीच्या, खऱ्या सुखाच्या शोधांत आणि प्रयोगांत आहेत. तर भारत में राष्ट्र त्याच्या निश्चयाने त्याच्या अचूक साधनांत व्याप्त आहे हे मात्र पक्के सर्वांनी लक्षांत ठेवावे.

वेदशास्त्राध्ययनाच्या महत्त्वाचे कांही लोक खाली देतो. वेदशास्त्रार्थ तत्त्वज्ञो यत्र तत्राश्रमे वसन् । इहेव लोके तिष्ठन्स ब्रह्मभूयाय कल्पते ॥ (मनु. १२-१०२) अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा प्रांथभ्यो धारिणो वराः धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥१०३॥ वेदशास्त्रात कुठेहि कोणच्या आश्रमांत असला तरी याच जन्मीं इथेच ब्रह्मरूप होतो. वेदा ध्ययन न केलेल्यापेक्षां अध्ययन केलेला श्रेष्ठ, नुसतें तोंडपाठ केलेल्यापेक्षां अर्याच्या अनुसंधानानें त्या धारणेत आणि त्या आचरणांत असलेले श्रेष्ट व त्यांच्यापेक्षांहि तीं तत्त्वें अंगी मुरवून असलेले आत्मसाक्षात्कारी ज्ञानी श्रेष्ठ असा हा ब्राह्मणाच्यहि योग्यतेचा तरतमभाव आहे. तपो विद्या च विप्रस्य निः यसकरं परम् ।। तपसा किल्विषं हन्ति विद्ययाऽमृतमश्नुते ॥— ब्राह्मण धर्माचे पालनच एक तप आहे. आश्रमविहित कर्म आणि आत्मज्ञान ही दोन्ही ब्राह्मणांची मोक्षसाधने होत. या ठिकाणी ईशावास्याच्या विद्यां चांविद्यां च यस्तद्वेदोभय सह । अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते । या मंत्राची आठवण होतें. वेदस्वीकरणं पूर्व विचारोऽभ्यसनं जपः । तद्दानं चैव शिष्येभ्यो वेदाभ्यासो हि पंचधा ( दक्ष. स्मृ. २-३४) –वेदाध्ययनाचे, ब्रह्मचर्याचे नियम पाळून, गुरुसेवेत राहून गुरुमुख प्रथम वेदपठण करणे, त्यांच्या निगूढ प्रमेयांचर खोल विचार करणे, ती अनुभवांत उतरण्याकरितां त्यांचा मन लावून अभ्यास करणे, त्यांचा सारखा निदिध्यास ठेवणे आणि वेद विसरूं नयेत म्हणून पुनः पुनः त्यांचे आवर्तन करणें, तत्त्वज्ञानाच्या सिडिकरितां इष्टदेवतेचा जप करणें, शिष्यांना सरहस्य वेद शिकविणें असा हा मुख्य पांच प्रकारचा वेदाभ्यास आहे. लक्षं तु वेदाश्चत्वारो लक्षं भारतमेव च । उपलब्ध ऋग्यज्जुसामथर्व या चार वेदां च्या ऋचांची एकलक्ष संख्या आहे. बिभर्ति सर्वभूतानि वेदशास्त्रं सनात । नम् । तस्मादेतत्परं मन्ये यज्जन्तोरस्य साधनम् ॥ (मनु. १२-२९ ) वेदशात्रें ही सर्व भूतांना धारण करणारी व इहपर जीवनांत अचूक मार्गदर्शन करणारी असल्यामुळे यांचा अभ्यास नेमून दिलेल्या ब्राह्मणांना तर हीं त्यांच्या अभ्युदय-निःश्रेयसाचीं एकमेव साधनें होत असें निश्चित मत आहे म्हणून मनूनें कळविलें आहे. सुखाभ्युदयिकं चैव नैःश्रेयसिकमेव च । प्रवृत्तं च निवृत्तं च द्विविधं कर्म वैदिकम् ॥ ( मनु. १२) संसारसाधक प्रवृत्तीचे व मोक्षसाधक निवृत्तीचें असें द्विविध वैदिक कर्म आहे. वेद हा ऐहिक तशी आत्मीय सुखाची साधनें सांगतो. त्यामुळे याहून इहपर साधनांकरितां अन्य विद्यांचा आश्रय करावा लागत नाही. त्यांतून तो परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेला आहे. असे झाले तर मग कांहीं बोलण्याचीच आवश्यकता नाही. त्यांच्या अध्ययन अध्यापनादि साधनांत ब्राह्मणांनी राहाण्याचाच निश्चय केला तर “ योगक्षेमं वहाम्यहम् ” या वचनाप्रमाणे ब्राह्मणाला काही कमी पडणार नाहीं हें तितकेंच खरें. स्वकं कर्म परित्यज्य यदन्यत्कुरुते द्विजः । अज्ञाना दथवा लोभात्स तेन पतितो भवेत् ।। (दक्षस्मृति २।३) – आपले कर्म सोडून जें म्हणून दुसरे कांहीं अज्ञानानें अथवा मोहाने करतो त्यामुळेच तो ब्राह्मण पतित होतो. आतांच्या काळची हीच परिस्थिति दिसून येते. सुधारकांचेहि ब्राह्मणच पुढारी आहेत. पण अशा स्थितीत त्यांना तें ब्राह्मणत्वच जड जाते व ब्राह्मण म्हणवून घेण्याचाहि तिटकारा वाटतो. पातित्याने ते इतक्या थराला पोहोचतात.

home-last-sec-img