Literature

वेदांचा विश्वास उपदेश

वेदांचा कसा उपदेश आहे, वेदांचें कसें शिक्षण आहे, वेदांचे आश्वासन कसें आहे हे या पुढील मंत्रावरून जाणतां येईल. सहृदयं सांमनस्यमविद्वेषं कृणोमिवः । अन्योऽन्यमभिनवतवत्संजातमिवाध्न्या | 

( अथर्व. पैप्पलादशाखा ५-१९; संज्ञानसूक्त)

-परस्परांबद्दल असणारा तुमचा द्वेष व असुया नाहींशी करून मी तुमच्या सर्वांच्या ठिकाणीं सहृदयता, सौमनस्य निर्माण करतों. गाय जशी आपल्या वासरांवर प्रीति करते, त्याच्या प्रीतीनें ती जशी आकर्षित होते त्या प्रमाणेच तुम्हीं परस्परांवर प्रीति ठेवली पाहिजे. सर्वांनी अन्योन्यप्रेमानें आकर्षित झाले पाहिजे.

अनुवतः पितुः पुत्रो मात्रा भवति संयतः । जायापत्ये मधुमतीं वाचं वदतु शांतिवाम् ॥ २ ॥ (अ. वे. पि. शा. ५/१९)

—मुलगा संयमशील असून मातापित्यांची आज्ञा परिपालन करणारा असला पाहिजे. सतीपतींनी पातिव्रत्य आणि एकपत्नी-व्रत यांचे पालन करून परस्परांशी प्रेमानें वागावें व मंजुळ शांतिदायक भाषण करावें.

मा भ्राता भ्रातरं द्विक्षन मा स्वसारभुत स्वसा । सम्यवः सव्रता भूत्वा वाचं वदत भद्रया ॥ ३ ॥

-बंधुबंधूंच्या ठिकाणी परस्परांत द्वेष नसावा. बहिणीबहिणींच्या ठिकाणीहि परस्परांत द्वेष नसावा. तुम्ही सर्वांनी एकमनानें, एकमताने राहून एकजुटीनें ब्रह्मचर्यादि सहतांचे पालन केले पाहिजे. प्रेमळपणानें वागलें पाहिजे. • पावित्र्यानें राहिले पाहिजे. सर्वांच्या हिताची इच्छा ठेवून सर्वांच्या कल्याणा करितां गोड मंगलकारक असे सत्य भाषण केले पाहिजे.

येन देवा न वियन्ति नो च विद्विषते मिथः । तत्कृण्मो ब्रह्म वो गृहे संज्ञानं पुरुषेभ्यः ।। ४ ।।

–ज्या ब्रह्मज्ञानानें देवता परस्परांशी अति प्रीतीचा व्यवहार ठेऊन वागतात; केव्हांहि परस्परांचा द्वेष करीत नाहीत, भेद ठेवीत नाहीत, त्याप्रमाणे तुम्हीं सर्वानी व्हावें. तुमच्यांत एकमत असावें, समत्व बाणा यें, आत्मीय भावनेनें तुमचा निर्दुष्ट व्यवहार चालावा, उन्नत नीति व उत्तम आचारविचार राहावा, स्वधर्मोचित कमें सर्वहि शांतिसमाधानानें चालावीत. म्हणून मी त स्वरूपाचा तुम्हांला उपदेश करतों व ती दिव्य ब्राह्मीस्थिति मी तुमच्यांतून निर्माण करतो.

ज्यायस्वन्तश्चित्ति नो मा वियौष्ट । संराधयन्तः सधुराश्चरन्तः ॥ 

अन्योन्यस्मै वल्गु वदन्तो यात । समग्रास्थ सध्दीचीनान् ॥ ५॥ (अन्यो अन्यस्मै वल्गु वदन्त एत सध्दीचीनान् वः। संयमनस्कृणोमि ॥)

—तत्त्वज्ञान झाले तरी व्यवहारांतला श्रेष्ठ-ज्येष्ठ-कनिष्ठपणा पाळून त्या त्या नियमानुसार वर्ता व इहपर सुखाचे उन्नत लक्ष्य पुढे ठेवून, आपआपला कार्यभाग यथोक्त चालवा. परस्परांना साहाय्यक व्हा. भिन्न भिन्न अभिप्रायाचे होऊं नका. एक होऊन सामाजिक, धार्मिक, राजकीय, तशीं पारमार्थिक कार्य करा. त्यांत परस्परांशी अमृतमय भाषणाचें व प्रीतीचे वर्तन ठेवा. प्रगतिपर जीवनांत अग्रेसर व्हा. पारमार्थिक दिव्य जीवन चालवा. परमात्मैक्याच्या दिव्य ज्ञानानें मी तुम्हांला पवित्र मनाचे करीन, संयमी करीन व नित्यतृप्त करीन.

समानी प्रपा सहयोऽन्नभागः । समाने योक्त्रे सह वो युनज्मि । 

सम्यङ्चीऽग्निं सपर्यतारा । नाभिमिवाभृताः ॥ ६॥

– एका कुटुंबांत, समाजांत, एका संस्थेत, सार्वजनिक कार्यांत देवादिकांच्या उत्सवांत, एका पाणपोईंत, एका छत्रांत यथास्थान असें प्रेमानें पाणी प्या व भोजन करा. वाढण्यांत कोणताहि उच्चनीच भेद धरूं नका. सारखें वाढा. एकच अन्न असूं दे. अन्नपाण्याचा वांटा समान व्हावा. एकच एक आत्मप्रेमाच्या पाशानें तुम्हांला मी जखडून सर्वांनाच एकत्र करतो. तुम्हांतून एकवाक्यता निर्माण करतो. आत्मोद्वाराच्या दृष्टीनें जीवननिर्वाह चालवा. व्यावहारिक कार्यक्षेत्रांत वर्णाश्रम धर्मांनी वागा. पारमार्थिक क्षेत्रांत एकात्म असा. एकात्मनिश्रयाने तुमच्या व्यावहारिक व पारमार्थिक जीवनांचा प्रीतिसंगम व्हावा. अग्नि इत्यादि देवतांची वेदोक्त उपासना चालत्रा; परंतु सर्व उपासनेताहि एकात्मनिश्चयच ठेवा. चक्राच्या अन्याप्रमाणे एकाच अंतिम ध्येयांत, एकाच आदशीत, एकाच परमेश्वरांत तुम्हीं संलग्न व्हा, सुप्रतिष्ठित व्हा. तुमच्या तुमच्या वर्णाश्रमधर्माच्या अनुष्ठानानें त्या अद्वितीय परमात्म्याची आराधना चालवा. भेद हा व्यवहारोपयोगी व अभेद हा परमार्थोपयोगी आहे. जीवनांत दोन्हींची सांगड झाली पाहिजे. पिंडब्रह्मांडांत भेद आणि विविधत्व कितीहि असले तरी एका चैतन्यानेंच त्यांत एकसूत्रीपणा आला आहे हें ध्यानांत धरावें.

 

सध्द्रीचीनान् वः संमनसः कृणोम्येक श्रुष्टीन संवननेन सहृदः । देवा इवेदमृतं रक्षमाणाः सायंप्रातः सुसमितिर्वो अस्तु ॥ ७ ॥

— सर्वांनाहि समानरूप असलेली मोक्षरूप परमगति प्राप्त करून घेणाऱ्या तुम्हांला एकामताचे मी बनवितों, मनोजयी करतों. एका परमात्म्याच्या छत्राखाली जितके तुम्हीं सर्वहि याल असे करतो. पुढाऱ्यांशी प्रेमानें वागून सहकारी व्हाल असे करतो. स्वर्गातील अमृताच्या रक्षणार्थ देव जसे एकमतानें गोळा होतात त्याचप्रमाणे तुम्हीं सर्वहि धर्माचें, राष्ट्राचें, संस्कृतीचें, मानव आदर्शाचे रक्षण करण्यास एकमतानें गोळा झाले पाहिजे. अखिल ऐकमत्याच्या स्वपरउन्नत्यर्थ रात्रंदिवस तुमच्या सभा भरत असल्या पाहिजेत व त्यांत शास्त्र दृष्टि ठेवून, सर्वतोपरि जनहिताचीच दृष्टि बाळगून, निःस्वार्यतेनें व निःपक्ष पातानें अनेक विषयांवर चर्चा होत असली पाहिजे. चर्चा करणारे सर्वतोपर उच्च संस्काराचे साक्षात्कारी विद्वान असावेत. वेदांची शिकवण

वेद मनूच्याचार्योऽन्तेवासिनमनुशास्ति । (तै. शि. ११-१)

– वेद शिकवून पूर्ण झाल्यानंतर घरी पाठविण्याच्या वेळी आचार्य, गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्याची इच्छा असणाऱ्या त्या शिष्याला वात्सल्या जवळ बसवून, पुढच्या जीवनाच्या मार्गदर्शनाकरितां असा हा हार्दिक उपदेश करीत, हे यामुळे कळून येते. या दृष्टीनें याचे महत्त्व फार आहे. वेदाध्ययन केल्यानंतर घरी परततांना धर्मचर्चा करण्याची ही पद्धति युक्तच होती. स्वाभाविक प्रवृत्तीचेंच हें द्योतक आहे. ब्रह्मचर्याश्रमांत धर्मकर्माचें ज्ञान करून घेऊन, गृहस्थाश्रमांत त्याचें अनुष्ठान होतें.

सत्यं वद । धर्म चर । स्वाध्यायान्मा प्रमदः । आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातंतुं मा व्यवच्छेत्सीः । सत्यान्नप्रमदितव्यम् । धर्मान्त प्रमदितव्यम् । कुशलान्न प्रमदितव्यम् । भूत्यै न प्रमदितव्यम् । स्वाध्याय प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् ॥ ( तै. शि. ११-१)

बाळा ! सदा सत्य बोल. (असेल तसे सांगणेच सत्य होय. ) धर्माचें, कर्तव्यकर्माचे पालन कर. वर्णाश्रमोचित असा वाग. गुरुना प्रिय असणारी दाक्षिणा देऊन त्यांची संतुष्टि व आशीर्वाद तूं आतां संपादिला आहेस. आमच्या अनुज्ञेनें घरी जाऊन कुल, शील परीक्षून, स्ववणीय वधूशी गोत्रादिकांचा विचार करून विवाह कर. सगोत्र विवाह निषिद्ध आहे. संततीस तसाच कांहीं प्रतिबंध असल्यास पुत्रकामेष्टि आदिकांच्या अनुष्ठानानें पुत्रप्राप्ति करून घे. कोणत्याहि प्रकारें संततिविच्छेद होऊं नये. सुपुत्रवान हो. संसारांत गुरफटून सत्याचें विस्मरण होऊं देऊं नये. दोरीवरच्या सर्पभावनेंत दोरींच एक सत्य असल्याप्रमाणे संसारांत परमात्म्याचेच एक स्वरूप सत्य मानावें. प्रपंचाकडे दुर्लक्ष करूं नको व चुकून सुद्धां प्रपंच सत्य मानूं नकोस व कर्तव्यकर्मे विसरूं नकोस. व्यावहारिक व पारमार्थिक यथार्थ भाषण सोडू नकोस. मोक्षधर्माच्या वर्णाश्रमधर्माच्या व तशाच इतर लौकिकधर्माच्या अनुष्ठानास चुकूं नकोस. वैयक्तिक, पारमार्थिक आणि सामाजिक, धमि उल्लंघन करूं नकोस. कुलधर्म, कुलाचार सोडूं नकोस. त्या त्या व्यक्तींशी त्या त्या धर्माप्रमाणे वाग. कुटुंबाच्या पोषणाकरितां, देवपितृकार्याच्या अनुष्टाना करितां, अतिथींच्या सेवेकरितां, गोरगरिबांच्या साहाय्याकरितां न चुकतां न्यायानें धन संपादन कर. दानधर्म सोडूं नकोस. आत्महितापासून वंचित होऊं नकोस. ऐहिक, पारलौकिक आत्महित साध. ज्यामुळे कल्याण आणि कुशल लाभेल असें तुझें आचरण व अनुष्ठान असावें. ऐश्वर्यमापक सत्कार्यात औदासिन्य बाळगूं नकोस. प्रापंचिकांना ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही वैभवांची आवश्यकता असते. वेदाच्या अध्ययन अध्यापनाच्या काम दुर्लक्ष करूं नकोस. सद्ग्रंथांचा अभ्यास सोडूं नकोस.

देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । मातृदेवो भव । पितृदेवो भव । आचार्यदेवो भव । अतिथिदेवो भव । यान्यनवद्यानि कर्माणि सेवितव्यानि । नो इतराणि । यान्यस्माक, सुचरितानि तानि त्वयो पास्यानि । नो इतराणि । (तै. शि. ११-२)

यज्ञ होमादि देवकार्यात व श्राद्धपक्षतर्पणादि पितृकार्यात कोणताहि प्रमाद होऊं देऊं नकोस. आईच्या ठिकाणी देवताबुद्धि ठेव. पित्याच्या ठिकाणीं देवताबुद्धि ठेव. आचार्यांच्या ठिकाणी देवताबुद्धि ठेव. अतिथीच्या ठिकाणी देवताबुद्धि ठेव. या सर्वांची देवतेप्रमाणे सेवा कर. शास्त्रोक्त कर्मे सोडूं नकोस, निषिद्ध कर्मे करूं नकोस. अजाणपणाने आमच्या हातून चुकीचे आचरण घडलं असल्यास त्याचे तूं अनुकरण करूं नकोस. आमच्या हातून घडलेल्या सत्कर्माचच मात्र अनुकरण कर. आमच्यांत कांहीं दुर्गुण तुला आढळल्यास ते सोडून तूं सद्गुणच तेवढे घे. मोठ्यांचेहि सदोष आचरण ग्राह्य ठरत नाहीं. त्यांचा निषेधच केला पाहिजे. केवळ कोणत्याहि अकार्याचें ब अकर्मआचरणाचें तूं अनुकरण करूं नकोस.

एकेचास्मच्छ्रेया सो ब्राह्मणाः । तेषां त्वयाऽऽसनेन प्रश्वासितव्यम् ॥ ( तै. शि. क्षा. ११-३)

–केवळ सद्गुरूच्या ठिकाणींच तेवढी श्रद्धा ठेवून तत्सम इतरांच्या विषयीं अनादरानें वागूं नये. आम्हांप्रमाणेच गुरुस्थानीय असणाऱ्या इतर विद्वान अशा सत्पात्र व श्रेष्ठ ब्राह्मणांचा तूं उत्थानानें व आसनपाद्यादिकांनी सत्कार करीत जा. पादसेवनादिकांनी त्यांची सेवा करीत जा. त्यांनी केलेल्या सदुपदेशाचें श्रद्धेनें श्रवण करून तो आचरणांत उतरविण्याचा कसोशीनें प्रयत्न कर. एककल्ली, हेकाड व एकलकोंडा होऊं नकोस. चांगलें तें कोठूनहि घेऊन आंगवळणी पाडावें. वाईट, मग तें कुठेहि दिसून येवो तें सर्वथैव त्याज्यच मान.

श्रद्धया देयम् । अश्रद्धया देयम् । श्रिया देयम् । ह्रिया देयम् । भिया देयम् । संविदा देयम् । अथ यदि ते कर्मविचिकित्सा वा वृत्तविचि कित्सा वा स्यात् । ये तत्र ब्राह्मणाः संमर्शिनः । युक्ता आयुक्ताः । अलूक्षा धर्मकामाः स्युः । यथा ते तत्र वर्तेरन् । तथा तत्र वर्तेथाः अथाभ्याख्या तेषु । ये तत्र ब्राह्मणाः संमर्शिनः । युक्ता आयुक्ताः अक्षा धर्मकामा: स्युः । यथा ते तेषु वर्तेरन् तथा तेषु वर्तेथाः । (तै. शि. क्षा ११-४)

अशा या वचनांच्या अनुसंधानानें अथवा महात्म्यांच्या सांगण्याप्रमाणें केल्यास कदाचित त्यांच्या शापानें संपत्तिहि नष्ट होईल या भीतीनें तरी दान करावें, इत्यादि असा अर्थ “ भिया देयम्।” या वचनांतून निघतो. ही सर्व संपत्ति परमात्म्याचीच आहे. मी त्याचा वृथा अभिमान बाळगतों. आपले धन म्हणून म्हटल्यानें भगवंताच्या धनाचा अपहार केल्यासारखा होतो त्यामुळे त्या लक्ष्मीपतीच्या द्रोहास पात्र व्हावे लागते. अशा तऱ्हेच्या विचाराने तरी दान द्यावे. व्ययशील असणारी संपत्ति कशीहि राहात नाही. चांगल्या मार्गांत तिचा व्यय केला नाही तर ती पापाची वृत्ति उत्पन्न करून व्यसनादि मार्गांनी तरी खर्च होणारच, किंवा इरेस पाइनहि कोर्टकचेरी-दाव्यां तू तरी ती खर्च होतेच. अशामुळे खर्च झाली नाहीं तर वैद्यक डॉक्टराकडे तरी ती जातेच. व्यर्थ अथवा वाईट मार्गाने तिचा विनियोग घडून अरत्रपरत्रहि गमाविण्यापेक्षां तिचा सद्विनियोगांत व्यय करून दोन्ही लोक कां साधू नयेत ? श्रेयोभागी कां होऊं नये ? या विचाराने तरी दान करावे. मागच्या जन्मीं दान दिल्यामुळे या जन्मीं अशी ही संपत्ति लाभली आहे; या जन्मीं दान दिल्यास पुढच्या जन्मींहि लाभेल, या विचाराने तरी दान द्यावे. काम्य कर्माची व पुनर्जन्माची इच्छा नसल्यास निष्काम दानानें परमात्मकृपा होते, या विचाराने तरी दान द्यावें. श्रीसद्गुरुसेवेनें मोक्ष मिळतो, या विचारानें तरी दान द्यावे. हे इतकेंहि पटत नसल्यास देवसद्गुरु कार्यों खर्च झालेला पैसा दुपटीतिपटीनें व त्यांना वाटल्यास अनंत पटीनेहि परत आपल्याला मिळतो, या विचाराने तरी दान करावें. शेवटी दान देणें हा गृहस्थांचा धर्म आहे या जाणीवेनें तरी दान द्यावें. हेंहि पटलें नाहीं तर दान मेकं कलौ युगे । कलियुगांत दानालाच प्राशस्त्य दिलें आहे या विचाराने तरी दान द्यावें, इत्यादि असा हा “ संविदा देयं । ” या वचनावरून बोध होतो. आचार, व्यवहार, शिक्षा, दीक्षा, श्रौतस्मार्त कर्मे, जीवनवृत्ति यासंबंधी व त्या त्या लोकांशी अथवा त्या त्या व्यक्तीशी त्या त्या वेळी वागण्यासंबंधी “तुला संदेह निर्माण झाल्यास ब्रह्मनिष्ट, विचारी, वादविवादकुशल, श्रुतिशाखा नुसार निर्णय देण्यांत दक्ष, सदाचारसंपन्न, दयादानधर्मशील, स्वधर्मनिरत, रागद्वेपरहित, शास्त्र सोडून दुसऱ्याच्या बुद्धीनें न चालणारे, सौम्य स्वभावी, निर्विकारी, सन्मान्य असे ब्राह्मण त्या बाबतीत जें मत देतात, त्या त्या प्रसंगी जसे आचरतात, त्या त्या व्यक्तीशी अथवा समाजाशीं त्या वेळी जसे बागतात तसा ठंहि बाग. ग्राह्याग्राह्य, स्पृश्यास्पृश्यादि विचारांत पूर्वोक्त जबाबदार विद्वान् आचार्य बिचारानें जे परिपाठ घालून देतील त्याप्रमाणे वाग, जें सांग तील तें ऐक व त्यांच्या शुद्धाचाराचे अनुकरण कर.

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत । असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥

दान करावयाचे झाल्यास देश, काल, पात्र पाहून श्रद्धेने करावें. अश्रद्धेने ते कधी करूं नये. अश्रद्धेने केलेल्या कोणत्याहि कर्माला फळ नाहीं. या गीतेच्या श्लोकाचे वाचकांना इथे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. अश्रद्धेनें अर्पण केलेली आहुति, दिलेलं दान केलेले तप आणि अनुष्ठ केलेले कोणतेहि कमे ‘असत्’ अयोग्य म्हणवून घेऊन, इथल्या तशाच परलोका च्या सुखाला त्याचा कांहीं उपयोग नाही, असे श्रीभगवंताचे दिव्य वाक्य आहे. आपल्या ऐश्वर्यानुरूप दान करावे. देव, गोब्राह्मण, अतिथि यांची सेवा करावी गोरगरिबांना साह्य करावे. दानादिकांच्या वेळी पैशाचा मोह आडवा आलाच तर लोक काय म्हणतील, या लोकलाजेनें तरी आपल्या ऐश्वर्याप्रमाणें दान द्यावें. देवानें मला इतकें देऊन देखील मी योग्य दानधर्म केला नाहीं तर देब काय म्हणेल ? रागावून दरिद्री केलें तर ? या भीतीनें अथवा अदत्त्वा दानाच्च भवेद्दरिद्री -योग्यप्रकारें दान न दिल्यास दरिद्री होतो, या भीतीने कां होईना दान द्यावें. दान, भोग आणि नाश अशा या तीन गति संपत्तीच्या असतात. जो स्वतःकरितां उपयोग करीत नाही व इतरांनाहि देत नाही त्याच्या संपतची तिसरी गति होते, म्हणजे नाश होतो. धर्म, अग्नि, नृप व तस्कर असे चार संपत्तीचे अधिकारी असतात. त्यांपैकीं धर्मच ज्येष्ठ होय. धर्मा करितां संपत्तीचा विनियोग झाला नाही तर बलात्कारानें अग्न व नृप त्या संपत्तीचे विभागी होतात. घर जळून जातें, अथवा दंडादिकांनी सरकाराकडे जाते. त्यांतूनहि ती जर संपत्ति राहिलीच तर ती चोर, दरोडेखोर लुटून नेतात. या अर्थाचे दोन श्लोक आहेत, ते असे :

दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य । यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति ।।

चत्वारो वित्तदायादा धर्माग्निनृपतस्कराः । ज्येष्ठपुत्रावमानेन त्रयः कुप्यन्ति सोदराः ॥

एष आदेशः । एष उपदेशः । एषा वेदोपनिषत् । एतदनुशासनम् । एवमुपासितव्यम् । एवमु चैतदुपास्यम् ॥ (तै. उ.) —असेंच श्रुतीचे विधान आहे. हाच श्रुतीचा उपदेश आहे. हेच वेदोप निषदांचे रहस्य आहे. हीच ईश्वराज्ञा आहे. तेंच आम्ही तुला कळविलें. थोडक्यांत हा एक जीवनाचा ध्रुवताराच आहे, असे समज.

सनातन वैदिक धर्माची संस्कृति समजून घेण्याकरिता, आचरणांत आणण्याकरितां, त्याप्रमाणे कुटुंब समाजांतून तिचा प्रचार करण्याकरितां विश्वमान्य असणाऱ्या या आर्य संस्कृतीच्या रक्षणाकरितां आतांपर्यंतचे हे सूत्रात्मक विवेचन बुद्धिमानांना मार्गदर्शक होऊं शकेल.

home-last-sec-img