Literature

वेदादि धर्मग्रंथांविषयीं पाश्चात्यांचे मत

सनातन धर्माचे आधारग्रंथ म्हणजे वेद, उपनिषदें आणि गीता. जगाच्याच वाङ्मयांत यांना विशेष प्राधान्य आहे. यांत सनातन आर्य धर्माचे सर्वस्त्र सांठविलें आहे. यांचा कुलंकष विचार करून पाश्चात्य पंडितांनीहि याची महती गाइली आणि यांना हृदयांत सांठविलें. यांच्याविषयीं त्यांच्या ठिकाणी असलेला आदर व्यक्त करण्यास, निवडक अशा कांहीं पंडितांची शेलकीं अशीं कांहीं वचनें, प्रसंगोपात्त इथे थोडीं उद्धृत करूं. यामुळे त्यांच्या हृदयांत घर करून असलेल्या, आर्य धर्माच्या वैदिक वाङ्मयाच्या महत्त्वाचे संदर्शन सर्वांनाच होईल. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या ‘ बिक्सर कझन ‘ नांवाच्या एका फ्रेंच विद्वान तत्त्वज्ञानें, एका मोठ्या सभेपुढे वैदिक वाङ्मयाविषयीं जें घंटाघोषानें सांगितलें, तें येथें उद्धृत करतों.

“When we read with attention in Poetical Philosophical monuments of the East, above all, those of India which are beginning to spread in Europe, we discover many a truth of truths so profound and which we make such a contrast with the meanness of the results at which European genius has sometimes stopped, that we are constrained to kneel before the philosophy of the East and to see in the cradle of the human race the native land of the highest Philosophy.” “

– युरोपांत अलीकडे झपाट्यानें प्रसृत होण्यास आरंभिलेल्या पौर्वात्य तत्त्व ज्ञानाचे, त्यांतहि मुख्यत्वेकरून भारतांतील उदात्त व अतिरसमय तत्त्वज्ञानाच्या अतिशय रहस्यपूर्ण,बहु महत्त्वाच्या वैदिक ग्रंथभांडाराचें, जेव्हां आम्ही सूक्ष्मरीतीने अवलोकन करतों, तेव्हां वेदवेदांतांनी सुशोभित झालेल्या तात्विक रत्नसागरांत पाश्चात्य पंडितांच्या भेदक दृष्टीलाहि दिपवून टाकणारी व निसर्गरमणीय असणारी अमोलिक अशी अपार सिद्धांतरत्ने आढळतात. त्याचा विचार केला. असतां आम्हां युरोपियनांची बुद्धि अतिमुग्ध व स्तब्ध होते. कांहीं तत्त्वज्ञान्यांच्या प्रमेयांचा विचार करतांना,या पूर्वीहि कांहीं प्रसंगीं युरोपियनांची बुद्धि स्तब्ध होण्या सारखे कांहीं प्रसंग आले होते. त्यांपेक्षांहि हीं भारतीय प्रमेयें आणखी अधिक गहन व महत्त्वपूर्ण आहेत. विश्वाचें मार्गदर्शन करणाऱ्या, विश्वभाग्योदयाच्या या अपौरुषेय वैदिक वाङ्मयाच्या पुढे, याच्या त्या दिव्य भव्यतेपुढे किती नाहीं म्हटलें तरी, भावावेशानें शेवटीं गुढघे टेकून, आम्हां सर्वांनाच मस्तक लव विणे भाग पडतें. असा कांहीं त्याचा विलक्षण दैवी प्रभाव आहे. आपण कोण हें समजाऊन देऊन, सर्वांना मूलस्वरूपाची अचूक ओळख पटवून देणाऱ्या, आत्मसाक्षात्कार करून देऊन सर्वांचा उद्वार करणाऱ्या, अशा या मूलप्राही सर्वोन्नत तत्त्वज्ञानाचें जन्मस्थानच हा भारतवर्ष असल्यामुळे, अखिल मानवाच्या शुद्ध धर्माची ही केवळ मायभूमी आहे. ‘जकोलीयट’ नामक एका पाश्चात्य पंडिताकडून विरचित झालेल्या, ‘The Bible in India’ नांवाच्या एका ग्रंथांत सृष्टीच्या उत्पत्तीविषयीं अनेक मतमतांतरांचा उल्लेख करून, वैदिक मताचा उल्लेख करतांना त्यानें खालीलप्रमाणे लिहिलेलें आहे.

“Astonishing fact! The Hindu revelation (Veda) is of all revelations, the only one whose ideas are in perfect harmony with modern science as it proclaims the slow and gradual formation of the world.” .”

— सर्व धर्माचे लोकहि आपापला धर्मग्रंथ ईश्वरदत्त आहे असें म्हणतात. त्या सर्व ईश्वरदत्त धर्मग्रंथांत, अपौरुषेय वेदच एक असा ईश्वरदत्त धर्मग्रंथ आहे कीं, ज्याचे विचार, यांत सावकाशपर्णे क्रमसृष्टीचा उपदेश असल्यामुळे, आधुनिक विज्ञानाशी जुळतात, आम्हांला समंजस वाटतात आणि पटतात. थक्क करून टाकणारें सोलीव सत्य या एका वेदग्रंथांतून मात्र आढळतें. अमेरिकेच्या ‘व्हिलर विल्लॉक्स’ नामक एका विदूषीनेंहि अशाच तऱ्हेनें आपलें मत प्रकट केलें आहे.

“We have all heard and read about the ancient religion of India. It is the land of the great Vedas, the most remarkable works, containing not only religious ideas on a perfect life, but also facts which all the science has since proved true. Electricity, Radium, Electronics, Air-Ships all seem to have been known to the Seers who found the Vedas.”

– भारताच्या अतिप्राचीन वैदिक धर्माविषयी आम्हीं संपूर्ण ऐकले आहे आणि वाचलें आहे. भारत हें त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि श्रेष्ठ अशा वेदांचे जन्मस्थान आहे की ज्यांत संपूर्ण दिव्य जीवनाच्या धार्मिक तत्त्वांचेच एक केवळ विवेचन नसून, आजपर्यंतच्या अखिल विज्ञान शाखांनी सिद्ध करून प्रचारांत आणलेल्या व सत्य म्हणून विश्वासून असणाऱ्या आखिल वैज्ञानिक सिद्धांतांचेहि पण विवेचन आहे. ( विद्युत् ) इलेक्ट्रिसिटी, रेडिअम्, इलेक्ट्रॉन्स आणि विमानें इत्यादिकांचें ज्ञानहि, तपोबलानें वेदांचा शोध लाविलेल्या त्या वेदद्रष्टया ऋषींना होतें, असे आढळून येते. आधुनिक विज्ञान-शास्त्र म्हणजे वेदांतील अबाधित सिद्धांतांचें केवळ अनुकरणच होय. ‘ सर्वे वेदाप्रसिध्यति ‘ या मनूक्त वचनाची हें विधान वाचून पुन्हा एकदां इथे आठवण होते.

कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजचे प्राध्यापक सत्यव्रत यांनी वेदासंबंधीच्या खोल संशोधनाचे फारच परिश्रम सोसले होते. वैदिक साहित्य शिकविण्याचाच यांचा विषय होता. पौर्वात्य आणि पाश्चात्य विद्वानांमध्ये हे एक गण्य विद्वान होते. यांचे त्रयीचतुष्टय, त्रयीपरिचय, निरुक्तालोचन, ऐतरेयालोचन इत्यादि ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यांनी आपल्या त्रयीचतुष्टय नामक संग्रहग्रंथांत वेदांसंबंधी खालीलप्रमाणे आपले मत दिले आहे. “When the Trayee Sangrah’ was being compiled the impression grew upon me that the real meaning of many Mantras did not come out in Sayana’s Commentary and the desire became strong in me to publish the interpretation of Yaska and other old expositors of the Veda. At a time when photography, phonography, gaslight, telegraph, telephone, railway and balloons had not been introduced into the country, how could our people under stand any verses referring to these things? Our opinion is that, in Vedic times, our country had made extraordinary progress. In those days the sciences of Geology, Astronomy and Chemistry were called ‘Adhidaivika Vidya’ and those of Physiology, Psycho logy and Theology, ‘Adhyatma Vidya.’

“Though the works embodying the scientific knowledge of those times are entirely lost, there are sufficient indications in Vedic works of those sciences having been widely known in those days.” -Acharya Satyavratji

—’त्रयीसंग्रह’ नामक ग्रंथलेखनाच्या संग्रहार्थ परिशीलन करीत असता, सायण ‘ भाष्यांत कितीतरी मंत्रांचा यथार्थ भाव प्रगट होत नाही असे माझ्या नजरेस आले. यामुळे यास्कादि अन्य प्राचीन भाष्यकारांचा भावार्य प्रसिद्ध करावा, अशी मला तीव्र इच्छा उत्पन्न झाली. वैदिक कालांत, फोटोग्राफी, फोनोग्राफी, गॅसलाइट, टेलिग्राफी, टेलिफोन, रेल्वे, बलून्स इत्यादिकांचा प्रचार जर नव्हता, तर त्यांच्या त्यांच्या संकेतांनी युक्त असे, त्या त्या मंत्रांचे रहस्य वेदभाष्यकारांनी कसें जाणले वैदिककालीं आमच्या भारतवर्षाची भौतिक शाखांतहि असाधारण प्रगति झाली होती असे आमचे मत आहे. त्या काली भूगर्भ, ज्योतिष आणि रासायनिक शास्त्र यांना ‘अधिदैविक विद्या’ म्हणून म्हटले जात असे. आणि शारीरशास्त्र, मनोविज्ञान, ब्रह्मविज्ञान या शास्त्रांना ‘अध्यात्मविद्या’ म्हणून म्हटले जात असे. वैदिक कालचे वैज्ञानिक ग्रंथ जरी आज प्रगट नसले तरी वेदांमध्ये वैज्ञानिक शोधांचे वाटेल तितके निर्देश दिसून येतात. वैदिककाली वैज्ञानिक प्रचारहि भरपूर होता असे यामुळे स्पष्ट होर्ते.

शोपेनहार नांवाच्या जर्मन तत्त्ववेत्यानें वैदिक वाङ्मयाविषयों में आपले मत व जो आपला अनुभव प्रगट केला आहे, त्याचाहि विचार करूं. विदेशीय पंडितांनी मनमुराद गाइलेल्या वेदांच्या गोडव्याचे अवलोकन करून तरी, आधुनिक आंग्लविद्याविभूषितांच्या बुद्धीवर प्रकाश पडेल; ब त्यांची वेदश्रद्वा यामुळे दुप्पट तिप्पट वाढेल. इतकेच नव्हे तर भारतांतल्या विदेशीय व भारतीय खिस्त-धर्म प्रचारकांनाहि यामुळे, त्यांच्या सन्मान्य पंडितांनीं प्रगटविलेल्या मतांची ओळख पटून, वैदिक वाङ्मयाविषयों व वैदिक धर्माविषयीं आदर आणि पूज्यत्व उत्पन्न होईल. या उद्देशानें हीं अवतरणें इतक्या, विस्तारांनी इथे दिली आहेत. पाश्चात्य पंडितांवरच भिस्त ठेऊन असणाऱ्या, आधुनिक विद्वान-शास्त्री-पुढाऱ्यांनाहि वेदाचे व वेदधर्माचें महत्त्व या योगानें कळून यायें; हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एरवीं हातच्या कांकणाला आरसा कशाला हवा ? वेदांविषयीं आतांपर्यंत बघितले. आतां उपनिषदांसंबंधी उदाहरणादाखल, कांहीं पाश्चात्य पंडितांची मतें येथें उद्धृत करूं या.

उपनिषदे

“In the whole world there is no study so beneficent and so elevating as that of the Upanishads. It has been the solace of my life and it will be solace of my death.” -Schopenhauer —मनुष्याच्या मनोभूमिकेस पराकाष्ठेच्या उन्नतीस पोहोंचवून,मानवजातीवर मोठा उपकार करणाऱ्या या उपनिषदांच्या अभ्यासाखेरीज

सर्व जगांत इतका लाभकारक व उन्नतिकारक, असा दुसरा कोणताहि श्रेष्ठ अभ्यास नाहीं. उपनिषदेच माझ्या आयुष्याचे समाधान. याच्या आश्रयानेच मी नितांत सुखासमाधानाचें दिव्य जीवन अनुभवीत आहे. याच्या छत्राखालींच शेवटी निरतिशय सुखशांतीने मी देहत्याग करीन.प्रोफेसर मॅक्समुल्लर यानेंहि शोपेनहारच्या या वरील विधानावर आपल्या संमतीची सही केली आहे. आपल्या अनुभवाचीहि याला पुष्टि दिली आहे. या वैदिक तत्त्वांचाच त्यानें अधिक पुरस्कार केला आहे.

“If those words of Schopenhauer required any endorsement, 1 should willingly give it as the result of my own experience during the long life devoted to the study of many philosophies and religions. If Philosophy is meant to be a preparation for death, I know of no better preparation for it than the Vedic Philosophy.”

 —“ शोपेनहारने केलेल्या विधानाच्या दृढतेकरितां माझीहि सही जर कोणी अपेक्षील, तर ती मी, माझ्या सकळ धर्माच्या व तत्त्वज्ञानाच्या दीर्घ परिश्रमाचा अंतिम निर्णय म्हणून, केव्हांहि मोठ्या आनंदानें देण्यास, हा एका पायावर तयार आहे. आत्मतृप्तीने सकाली मरणाचे स्वागत करण्यास अवश्य असलेल्या सिद्धतेला तत्त्वज्ञानाचा अभ्यासच कारण होतो. असे झाल्यास एका वैदिक तत्त्वज्ञानाखेरीज दुसरे असे कोणतेंहि श्रेष्ठ तत्त्वज्ञान संबंध जगांतच मला कुठे आढळत नाही; आणि आहेसे वाटतहि पण नाही. “

ज्यांना वैदिक वाङ्मयाचे महत्त्व वाटत नाही, ज्यांचा वैदिक वाङ्मयावर विश्वास नाहीं, त्यांच्या मनःचक्षूंना या पाश्चात्य पंडितांची स्वानुभवाने ओथंबलेली ही सारभूत बाक्यें अंजनाप्रमाणे परिणामकारक होवोत. परधर्मीय आणि परदेशीय म्हणविणारे लोकसुद्धां वेदांचे प्रामाण्य इतकें शिरसावंद्य मानतात; तर मग एतद्धर्मीय आणि एतद्देशीय लोकांनी ते किती अधिक मानावयास पाहिजे व तें आतां किती प्रमाणांत मानण्यांत येते याचा आढावा काढून त्या वर प्रत्येकानेंच विचार करावा. पाश्चात्य पंडितांनी जें असें वेदांचें यश गाइलें त्यांच्या कीर्तीचा डंका बाजविला, तो अनुभव आल्याशिवायच का ?

भगवद्गीता

वेद आणि उपनिषदें यांविषयीं पाश्चात्य पंडितांच्या उद्गारांचे निरक्षिण आपण केलें.आतां भगवद्गीतेविषयी असणाऱ्या त्यांच्या अनुभवाकडे आपण बळू.

“The most beautiful, perhaps properly the only true philosophical song that exists in any known tongue.” श्रीमद्भगवद्गीतेबद्दलचें हें हंबोल्सचे बाक्य आहे. ‘सर्वच अतिशय सुंदर, किंबहुना जगांतील सर्व भाषांतल्या साऱ्या गीतांतच, खऱ्या तत्त्वज्ञानाचा, सर्वतोपरी खरोखर योग्य, असा एकच एक अचूक ग्रंथ; ‘ म्हणजे भगवद्गीता. “There is in it a sublimity of conception, reasoning and diction almost unequalled.” .” -Warren Hastings

.’ गांभीर्यपूर्ण विचारसरणी, मनाला पटण्यासारखे सयुक्तिक विवेचन आणि लयबद्ध छंद, इत्यादिकांनी ‘गीता’ हा ग्रंथ जगांतच बिनतोड आहे. ‘

आचार्यादिकांचे उदाहरण घेऊन अथवा त्यांची वचनें उद्धृत करून गीतेचे महत्त्व पटाविण्याचा प्रयत्न केल्यास, पाश्चात्य विद्यांनी सुसंस्कृत झालेल्या वा पाश्चात्य संस्कृतीनें भारलेल्या आधुनिक पंडितांना व पुढाऱ्यांना वाटावयाचे की, आपल्या प्रमाणग्रंथाची आचार्य टिमकी वाजवितात व त्याची ‘श्रीधर स्वामी री ओढतात. या सदराखाली जाऊन गीतेचे महत्त्व कोणाला तितकेंसें पटणारहि नाहीं; व ते परिणामकारक होणार नाही. म्हणून त्यांना त्यांना संमत असलेल्या प्रमाणवाक्यांनी तें पटवून दिलें म्हणजे ते अनायासें चटकन् पटते. म्हणून ( या न्यायानें ) पाश्चात्यांचींच गीतेविषयीं कांही वाक्य बघितली. पाश्चात्य पंडितांच्या मताचा छडा लाविला. त्यांचे गुणग्राहकत्व दिसून आले व त्यामुळे वैदिक वाक्मयाची थोरवीहि इतर जनांना पटली. वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासानें पाश्चात्यांनी आपली भूमिका कितीतरी बाढवून घेतली होती, हें उदाहरणार्थ उद्धृत केलेल्या शोपेनहार व मॅक्समुहर यांच्या आनुभविक विधानांवरून स्पष्टपणे व्यक्त होण्यासारखे आहे. पाश्चात्यांच्या मनोभूमिकेतून गीतेविषयी विचार करीत असतां, आपोआपच ओघानें एका घटनेचे स्मरण झालें. विधर्मीय नी विजातीय म्हणविणाऱ्या पाश्चात्यांनासुद्धां गीतेच्या अभ्यासानेंच केवळ, केवढी उच्च भूमिका प्राप्त करून घेतां येते हें या घटनेनें व्यक्त होईल. या ‘थोरो ‘च्या उदाहरणानें भारतीयांच्या डोक्यांत प्रकाश पडेल. ‘अतिपरिचयादवज्ञा’ या न्यायाने बागल्याबद्दल पुरेसा पश्चात्ताप होईल.

प्रसिद्ध जर्मन कवि इमर्सन हा सहज बोरोच्या दर्शनाला एकदां गेला तेंव्हा थोरो हा एका वृक्षाखाली जुन्या जीर्ण खाटेवर बसला होता व त्याच्या त्या खाटेखाली इकडे तिकडे लहान मोठे सर्प बाबरतांना दिसत होते. जितकी धोरोची निर्भय स्थिति होती तितकीच सपचीहि निर्भय स्थिति होती. तिथे कोणांतहि भयाचा मागमूसहि दिसून येत नव्हता. आनंदाने व प्रसन्नतेने जसा थोरो खाटेवर बसला होता, तसेच ते सर्पहि आनंदाने व प्रसन्नतेने, इकडे तिकडे स्वच्छंदाने विहरत होते. हे दृश्य पाहून इमर्सन आश्चर्यचकित झाला. याचे रहस्य जाणण्याविषयी त्याच्या मनांत आले. कोणत्या तात्विक ग्रंथाच्या अभ्यासानें अशी ही याची स्थिति झाली तें समजून घ्यावे असे त्याला वाटले. विनयान्वित होऊन इमसेन विचारतो, “ महाराज, आपल्याला या सर्वांची भीति कशी वाटत नाही ! ” थोरोचें यावरील उत्तर फार मननीय आहे. याने गीतेचे महत्त्व व्यक्त होते. आर्यांच्या तत्त्वज्ञानाची थोरवी मनांत बिंबते. ” Where is fear when Mother Gita is there to protect : धोरोच्या या उत्तराचा वाचकांनी विचार करावा. भारतातल्या प्रत्येक सुधारकानें सयः परिस्थितींतली आपली भूमिका याच्याशी ताडून पाहाची गीतेविषयी असणारी आपली भक्ति, श्रद्धा, याच्या कसाला लावून बघावी. “ गीतामाताच इथे प्रत्यक्ष रक्षण करण्याकरितां निकट असतांना भीति बुडून शिल्लक राहाणार !” हा थोरोच्या ह्या वाक्याचा अर्थ. आपल्या उशाशी असणारी ती गीता चटकन काढून, ” या तात्विक ग्रंथाच्या अभ्यासाने माझी ही अशी स्थिति झाली, ” म्हणून तो गीता ग्रंथ थोरोनें इमर्सनच्या हातांत ठेवला. त्यावेळी कृतज्ञतेच्या प्रेमानी थोरांचे डोळे भरून आले. आनंदाश्रूंच्या धारा लागल्या. सर्वांग आनंदानें पुलकित झाले. विलक्षण सुखशांतीची दिव्य छटा त्यांच्या तोंडावर झळकू लागली. नव्या विचाराच्या वातावरणांत वावरणान्यांना यापासून काही धडा मिळत असल्यास त्यांनी तो अवश्य घ्यावा.

एषा वेदोपनिषत् । या तैत्तिरीय शिक्षोपनिषदाच्या वाक्यावरून वेदांचा आणि उपनिषदांचा संबंध लागल्याप्रमाणे, ” इति श्रीमद्भगवद्गीतासूप निषत्सु ” या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येणाऱ्या पालुपदावरून या उप निषदांचा आणि गीतेचा संबंध लागतो. 

न जायते म्रियते वा विपश्चिन्नायं कुतचिन्न बभूव कश्चित् । 

अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे । ( १८ कठ अ. १ व २)

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः । 

अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥(२० भ. गीता. अ. २)

इन्ता चेन्मन्यते हन्तुं हतश्चेन्मन्यते इतम् ।

उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति व इन्यते।। (१९ कठ. १. २ )

य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् । 

उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते।। (१९ भ.गीता२० अ.२)

उर्ध्व मूलोऽवाशाख एषोऽश्वत्थः सनातनः ।( १ कठ अ. २ व. ६)

उर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । ( १ भ. गीता अ. १५)

इत्यादि बाक्यांचे अतीव साम्य आहे; तत्व तर एकच. उपनिषदे आणि गीता, या दोन्हींचा वेदांतच अंतर्भाव होतो व या

सर्वग्रंथांचा अंतर्भाव वैदिक अथवा आर्य धमत, आर्य संस्कृतीत होतो.

home-last-sec-img