Literature

वैदिक आर्य संस्कृति

सनातन आर्य धर्म आणि आर्य संस्कृति हीं विश्वांतील सर्व पंडितांना इतकीं जीं आवडलीं आहेत, तीं ह्यांना मूलभूत असणाऱ्या एक वेदामुळेच. नेहमीं त्या त्या धर्माला त्या त्या धर्मग्रंथामुळेच महत्त्व येते. या धर्मग्रंथाच्या महत्त्वावरच त्या धर्माचे महत्त्व अवलंबून असते. सनातन आर्य धर्माचा मुख्य ग्रंथ वेद होय. त्यामुळेच याला वैदिक धर्म म्हणतात. वेदाच्या निरतिशयत्वाने वैदिक धर्मसुद्धां सर्वातिशय झाला व वैदिक संस्कृति सर्वश्रेष्ठ झाली. या वैदिक वाङ्मयाची जोपासना व वैदिक संस्कृतीची बाढ आज भारतांत सर्वाधिक प्रमाणांत व्हावयाला पाहिजे. ‘पिकतें तिथे विकत नाही’ या म्हणीप्रमाणेच झाले, तर बुध्धा आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे होईल. जेथें लाखों बाहेरचे लोक येऊन पोट भरतात, आपले घर सोडून, एखाद्या आडदांड तरुणानें जसें जेमतेम आपले जीवन चालविणाऱ्याचा आश्रय करून, मुद्दाम आपली उपासमार करून घ्यावी, त्याप्रमाणेच अन्य संस्कृतीच्या अनुकरणाने भारतीयांचे होणार आहे. आपल्याला जर ज्ञान नसेल तर दुसऱ्यांनी गाइलेल्या कीर्तनें तरी शाहाणे होऊन सर्वश्रेष्ठ आपल्या वैभवानें भारत सुखाने नांदू लागला म्हणजे पुरे.

home-last-sec-img