Literature

वैशाख वद्य पंचमी

परमेश्वर आहेच कोठे?हे सर्व थोतांड आहे. सृष्टी आपोआपच निर्माण झाली; तिचा क्रम आपोआपच चालू आहे व तिचा आपोआपच लय होईल. या सर्वांसाठी निराळ्या शक्तीची आवश्यकता नाही असे म्हणणारे जे नास्तिक आहेत त्यांच्या म्हणण्याचा जरा विचार करू या!

जगाच्या उत्पत्तीपूर्वी काही नव्हते. सुषुप्तीप्रमाणे सर्व शुन्य होते. सुषुप्तीपासून जशी जागृतावस्था येते त्याप्रमाणे शुन्यातून आपोआपच जग उत्पन्न झाले असे त्याचे म्हणणे आहे ते खरे नाही. असत् पासून सत् कसे उत्पन्न होणार? हे योग्य नव्हे. कारण असत् पासून सत् कधीही उत्पन्न होणार नाही व तसे उत्पन्न होते म्हणणे अनुभव व युक्ती- प्रतियुक्तीसही विरोधी असेच आहे. जग शुन्यापासून निर्माण झाले नसून सत्यापासून निर्माण झाले आहे असे श्रुतीमाता निश्चितपणे म्हणते.

जग शुन्यापासून उत्पन्न झाले असे म्हणावयाचे असल्यास आई – बापाशिवाय संतती निर्माण झाली असेच म्हणावे लागेल व असे म्हणणे शक्य कोटीतील नाही. शून्य अशा आकाशात वस्तू निर्माण झाल्या असे म्हटल्यास आकाश शिल्लक राहणारच नाही. इतक्या वस्तू निर्माण झालेल्या दिसतात. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे असल्याने इतर दुसऱ्या कोणत्यातरी कारणाने, व्यवस्थेमुळे ही सृष्टी निर्माण झाली असली पाहिजे.

श्री प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधरस्वामी

home-last-sec-img