Literature

वैशाख शुद्ध एकादशी

हल्ली सहशिक्षणाची म्हणजे मुलामुलींनी एकत्र शिकण्याची पध्दत सर्वत्र झाली आहे. त्यामुळेच नीतिभ्रष्टतेशिवाय दुसरे काय होणार ? हल्ली विद्याभ्यासासाठी यथायोग्य असे वाड•मयही नसते. तसेच गुरूशिष्यांत पवित्र भावनाही नाहीत. ब्रह्मचर्यपालन नीटपणे न झाल्याने सर्वच धर्म शिथिल झाल्याचे आढळते. हल्ली बडबडणेच जास्त असून त्याप्रमाणे कृति मात्र नाही. त्याच्या उलट असण्याची आज आवश्यकता आहे. बोलण्याप्रमाणे चालणारी माणसे आज हवी आहेत. नुसतें बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे केवळ तोंडाने वर्णन केल्याने पोट भरेल काय ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवल्यानेच पाेट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेंच योग्य होय.

ब्रह्मचर्याश्रमानंतर सर्व विषयांत वैराग्य उत्पन्न होऊन परमात्म साक्षात्कारासाठी अत्युकृष्ट आसक्ती निर्माण झाल्यास त्वरीतच संन्यासाश्रम स्वीकारून सर्व मानवजात परमात्मप्राप्तीसाठी कशी प्रयत्नशील होईल ह्याकडे लक्ष देणें आवश्यक आहे. पण हे सर्वांना जमणे शक्य नाही. विषयेच्छेमुळे परमात्म साक्षात्कारासाठी सर्वस्व अर्पण करणे असाध्य झाल्यास गृहस्थाश्रम स्वीकारणे योग्य ठरेल. भोगादीनीं विषयवासनेची तीव्रता कमी करीत करीत शक्यतो लवकर गृहस्थाश्रम संपवून गृहस्थाश्रमांतील भोगसंस्कार घालविण्यासाठी वनात गेले पाहिजे व तपाने विषयवासना घालवून मोक्षप्राप्तीसाठी संन्यास ग्रहण केला पाहिजे.

श्री प.प. भगवान श्री सद्गुरू श्रीधर स्वामी

home-last-sec-img