Literature

वैशाख शुद्ध चतुर्दशी

परमात्म्यानें भक्तांच्या हितासाठी मत्स्यादि निरनिराळे अवतार घेतले आहेत. ती सर्व उदाहरणे भक्तवात्सल्याचीच. दुष्ट हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद. त्याचे हाल नाहीसे करण्यासाठी परमात्म्याने खांबातून बाहेर पडून विकट रूप धारण केले. नरसिंह अवतार हा भक्त वात्सल्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यावरून परमेश्वराच्या भक्तवात्सल्याची पूर्ण कल्पना येते. शिव व विष्णू यामध्ये भेद नाही. परंतु हिरण्यकश्यपूसारख्या शुद्राने भेद कल्पिला तरी त्यांचे अभेदत्व स्पष्ट करण्यासाठीच नरसिंहावतार धारण केला असे म्हटले तर त्यात वावगे होणार नाही.

परमात्म्याची कृपा श्रेष्ठ असून संसार हा मिथ्या आहे. हे कोणालाही आपोआप समजत नाही. नुसत्या गप्पा मारता येतील पण आचरण मात्र त्यानुरूप होत नाही. जन्माला आलेल्यास मरण चुकत नाही; लक्ष्मी चंचल आहे; इंद्रियवशतेमुळे नाश ओढवतो. ह्या सगळ्या गोष्टी माहित नाहीत असा कोणीही नाही. पण मनातले विचार प्रत्यक्षांत आचरणात आणणारे किती निघतील ?

परमात्म्याच्या कृपेमुळे प्राप्त होणारा आनंद, श्रेष्ठ, अनंत व अद्वितीय असतो. तो कर्मजन्य नाही. कोणत्याही कर्माच्या योगाने तो वाढवता येत नाही व कमीही करता येत नाही. म्हणूनच तो अक्षय व अपार आहे असे श्रुतीमाता सांगते.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img