Literature

वैशाख शुद्ध तृतीया

‘ वर्णानाम् ब्राह्मणो गुरू: | ‘ हे वाक्य ऐकल्याबरोबर काहींच्या कानाला ताम्ररस ओतल्यासारखें वाटतें. पण जे खरे ब्राह्मण आहेत त्यांना सहजगत्या श्रेष्ठता प्राप्त होत असते. शासकीय अधिका-यांतहि श्रेष्ठ-कनिष्ठता असते. तद्वत ब्राह्मण श्रेष्ठ ठल्यास त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचें कारण नाही उलट श्रेष्ठ मनुष्यास पाहिल्यावर आनंदच वाटला पाहिजे. ह्या जगांत कमी- जास्त, श्रेष्ठ कनिष्ठ हें अपरिहार्य आहे. जें अपरिहार्य आहे. त्याचा परिहार अशक्यच. जगांतील श्रेष्ठ तपस्वी म्हणजेच ब्राह्मण. सर्वांच्या उन्नतीसाठी ब्राह्मण हा वर्ण आहे. चांगुलपणा हा काही वेळा भांडणास कारणीभूत होत असतो. पण विषयसुखाचा त्याग करण्याबद्दल द्वेष करण्याचें कारण नाही. विषसुखत्याग हे ब्राह्मणाचें लक्षण होय. ह्या जगांतील सर्व कामें एकालाच करतां येणें शक्य नाहीं. ब्राम्हण-जन्म हा इहसुखासाठी नाही.

वर्णाश्रमधर्म हा श्रमविभाग-तत्वावर आधारित आहे. हा सामाजिक विभाग झाला. आश्रमधर्म हा आयुष्याच्या विभागणीसाठी आहे.

बुध्दिमान, व्यवहारकुशल मनुष्यास योग्य अनुरूप असें काम दिले पाहिजे. वादकुशल मनुष्यास वकीलीचें काम दिले पाहिजे तर एखाद्या जड निर्बुध्द मनुष्यास जनावरे सांभाळण्याचेच काम योग्य ठरेल.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img