Literature

वैशाख शुद्ध द्वादशी

सर्व विषयोपभोग वमनासारखे असह्य झाले आहे असें वैराग्य ज्याला प्राप्त झाले आहे असाच मनुष्य संन्यासश्रमास अधिकारी होतो. ह्या जगतांतील माया- मोहास बळी न पडतां मी कसा पार होईन आणि लवकरांत लवकर परमात्म्याचें सानिध्य कसें प्राप्त होईल, अशी उत्कट इच्छा ज्यावेळी उत्पन्न होईल, प्राप्त होईल त्यावेळींच तो संन्यासश्रमास योग्य ठरतो. कर्मानें चारीही आश्रम स्वीकारले पाहिजेतच असा कांही नियम नाही. ब्रम्हचर्याश्रमातून संन्यासश्रम स्वीकारणे शक्य आहे. ध्येय परमात्मसाक्षात्कारासाठी जपतपादि , योगसाधना इत्यादी अनेक उपाय आहेत. ज्या पाश्चात्यांना यांचे महत्त्व पटले आहें तेहि हिंदूधर्मप्रमाणेच साधना करताना आढळतात.

माझ्या माहितीप्रमाणें त्यांची संख्या ३ ते ४ लाखापेक्षा जास्त असावी. परधर्मातील लोकांना हिंदूधर्माचे इतकें आकर्षण असताना आपल्याच देशबांधवामध्ये हिंदूधर्माबद्दल अनादर असणें योग्य नाही. आपणा सर्वांमध्ये हिंदूधर्माविषयी श्रध्दा निर्माण होवो ! वर्णाश्रमधर्म न चुकता परिपालन करण्याचे सामर्थ्य तुमच्यात येवो ! परमात्म्याची कृपा तुमच्यावर होवो परमात्मसाक्षात्कारासाठी योग्य मार्गदर्शी असा सद्गुरू तुम्हास लाभो, असा माझा तुम्हास आशीर्वाद आहे !

श्री प. प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img