Literature

वैशाख शुद्ध द्वितीया

नष्ट होणा-या वस्तुंच्या प्राप्तीकरतां प्रयत्न करून काही उपयोग आहे काय ? अविनाशी सुख ओळखून त्याचा अनुभव घेऊन आपण तत्सुखरूप होणें म्हणजेच दुःखनिवृत्ती होय. ज्यांत दुःख नाही असे सुख म्हणजे खरे शाश्वत सुखच. त्यात विकार नसतो. अविकारीस्थिती प्राप्त करून घेणें हे मानवजन्माचें सार्थक व इहलोकांतील कर्तव्य होय.

वर्णाश्रमधर्माचें योग्य प्रकारे पालन केल्यानें वैराग्य प्राप्त होते. मानव आपल्या वर्ण व आश्रम ह्यांना अनुरूप असलेल्या आचरणांनी साधनचतुष्ट्यांनी वैराग्य प्राप्त करून घेऊन नित्यानित्यवस्तुविवेकी होऊन, शाश्वत सुख हेच लक्ष्य मानून शमदमादि षड्संपत्ति आणि मुमक्षुत्व करून घेऊन मोक्षाचा अधिकारी होतो.

वर्णाश्रमधर्म पालनास एवढे महत्व कां ? परमार्थसाधना हे वर्णश्रमधर्माचें साध्य असले पाहिजे, असें श्रुतिमातां म्हणते. श्रुतिस्मृति ह्या भगवंताच्या आज्ञा होत. त्यांचे उल्लंघन करणें अयोग्यच. परमात्मा हा या जगताचा राजा आहे. तो अनंतकोटीब्रम्हांड नायक आहे. आपण त्यालाच ईश्वर म्हणतो.

श्रुतिस्मृति हे परमात्म्याचे कायदे होत. ह्या कायद्यामध्ये वर्णाश्रमाचे प्रतिपादन सांगितले असून ते त्या धर्माची प्रशंसाहि करतात.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img