Literature

वैशाख शुद्ध नवमी

राष्ट्रसंरक्षणासाठी चातुर्वर्ण्याची आवश्यकता आहेच. राष्ट्ररक्षणासाठी परमेश्वराचें ध्यान, प्रार्थना इत्यादि करून दैवीशक्ती उत्पन्न करण्याचें सामर्थ्य फक्त ब्राह्मणांतच आहे. शरीर बळाने देशांतील दुष्ट शक्तींचें दमन करून प्रजेचे हित रक्षण करणे हेच क्षत्रियांचे कर्तव्य होय. संपत्ति संपादन करून तिचें संरक्षण करून देशासाठी तिचा व्यय करणें हे वैश्यांचे कर्तव्य होय. कृषि, गोरक्षण इत्यदि कर्तव्ये करून राष्ट्रहित साधणारा एक वर्ग लागतोच. अशाप्रकारे असणारी आपापली कर्तव्ये पार न पाडल्यास कोणीही सुुखी होणार नाही. आपापल्या कार्यास अनुरूप असा आहारहि असणे आवश्यक असते. कारण देह अभ्यासाधीन आहे. वर्णाश्रमाचे महत्व नुसतें बडबडून कळणार नाही तर त्याप्रमाणे योग्य आचरण होणेंहि आवश्यक आहे. केवळ बडबडण्याने विचार करण्याची शक्ती आहे. एवढेच सिध्द होत असले तरी त्याचा काय उपयोग ? काहिहि नाही. वर्णाश्रमाचे रक्षण आचारानें, अभ्यासाने दृढ केले पाहिजे.

हे वर्णभेद जगतांत सर्वत्र आहेत. पाश्चात्यांतहि ते आहेत. तिकडील ब्राह्मणांना ‘ बिशप ‘ म्हटले जाते. या सर्व गोष्टीवरून मानवाच्या रक्षणासाठी वर्णव्यवस्था अनिवार्य आहे हे स्पष्ट होते.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img