Literature

वैशाख शुद्ध षष्ठी

संन्यास हा चतुर्थाश्रम, म्हणजेच शेवटचा आश्रम त्याच्याशिवाय मोक्षप्राप्ती नाहीं, त्या आश्रमात इच्छात्यागच मुख्य आहे. बाकीच्या आश्रमांत इच्छा त्याग नाहीं. गृहस्थाश्रमांतील कोणत्याही कर्मामध्ये ‘श्रुति, स्मृति, पुराणोक्त फलप्रात्यर्थम् ‘ असा संकल्प असतो. संकल्प नाहीं तर कर्महि नाही. गृहास्थाश्रमीयांना कामनात्याग साध्य होत नाहीं व कर्मत्याग योग्य नाही. संन्यासात मात्र त्यागच पाहिजे. भगवद् गीता संन्याशाला प्रशस्तीपत्र देऊन योग्य मार्ग दर्शविते.

‘ स्थितोSस्मि गतसन्देह: | ‘ असे म्हणून अर्जुन मोहनिवृत्त होऊन सुध्दां युध्द करीत असल्यामुळे गीतेंत ‘ कर्मयोगास ‘ प्राधान्य दिले आहे असे कांहींचे म्हणणे आहे. पण वर्णाश्रमधर्मास प्रामुख्य दिलेल्या गीतेंत क्षत्रिय असलेल्या अर्जुनास शास्त्राधारें कर्मत्यागरूप संन्यासास अधिकार नसल्यानें वर्णाश्रित कर्म करावयास भाग पाडलें आहे. वर्णाश्रमधर्म अत्यावश्यक आहे. हेच भगवद् गीतेत प्रतिपादिलें आहे. गुणकर्मश: विभाग पडले आहेत. क्षुद्र कामवासना असणारा ब्राम्हण नव्हे पण ‘ न कांक्षे विजयं कृष्ण | ‘ इत्यादि गोष्टी सांगणारा अर्जुन गुण कर्मावरून पाहिल्यास ब्राह्मणच होणें योग्य होते पण तो ब्राह्मण नव्हता. यावरून असें सिध्द होते की, पूर्वजन्मींचें संस्कार, वासना ह्या सर्वांच्या योगानेच, जन्म, प्राप्त होतो, म्हणून पूर्वजन्माची कर्मेच ह्या जन्मातील जाति, वर्ण यांना कारणीभूत आहेत म्हणूनच जन्मच वर्णाचा आधार होय.

श्री प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img