Literature

वैशाख शुद्ध सप्तमी

विज्ञानशास्त्रज्ञ प्रयोगशाळेत कोणत्याहि विषयाचे विशेष संशोधन करीत असतां एकाग्रचित्त होऊन जीवाची पर्वा न करतां सारखे प्रयत्न करीत असतात. सर्वसामान्य भौतिक विषयासाठी जर अशा प्रयत्नांची आवश्यकता असते तर परमात्मतत्त्व जाणण्यासाठी सर्वसामान्य प्रयत्न पुरे पडतील काय ? परमात्मतत्त्वचा विचार करण्यास सर्व आयुष्यभर लक्ष्य लावून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जो संध्यावंदनासाठी फक्त दहा मिनीटेही खर्च करूं इच्छित नाही त्याला कधीहि परमात्मसाक्षात्कार होणार नाही. परमात्मतत्त्वावरचमन स्थिर करून तन्मय झाल्यास त्याचा साक्षात्कार होईल.

ब्राम्हणाने स्वत: परमात्म्याचें ध्यान करून साक्षात्कार प्राप्त करून इतरांना उपदेश करण्यासाठी आपलें संपूर्ण जीवन खर्चिले पाहिजे. याचप्रमाणें इतर वर्णियांनींही आपापली कर्तव्यकर्मे पार पाडून जीवन व्यतीत केल्यासच समाजास सुख मिळेल. प्राचीन काली ब्राह्मणांनी आपलीं कर्तव्यकर्मे करून आपले अग्रस्थान टिकविले होते व त्यामुळे त्यांना इतर मार्ग शोधण्याची आवश्यकताच भासली नाही. वेदाध्ययन हेच त्यांचे मुख्य कर्तव्य. वेदाध्ययनास ‘ स्वाध्याय ‘ म्हणतात. या रितीनें स्वत: तत्त्व जाणून ते इतरांना स्पष्ट होते. करून जो उपदेश केला जातो त्यासच ‘ प्रवचन ‘ म्हणतात. हीं स्वाध्याय- प्रवचनेंच ब्राह्मणाची कर्तव्ये होत.

श्री प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img