Literature

व्यसने राष्ट्रहानिकारक

गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः । एकानें केलें म्हणून दुसराहि करतो. त्यांतूनहि चांगल्याचे अनुकरण फार श्रमाचे असते म्हणून तिकडे मन वळत नाही. वाईटाचे अनुकरण सोपें म्हणून वाईट फार लवकर चिकटतें. वाईट फार लवकर चिकटतें व तें चांगल्यापेक्षां अधिक दृढभूत होतें हैं व्यसनाच्या उदाहरणाने जाणतां येईल. जेवण नसेल तरी हरकत नाहीं, पण एक पेलाभर चहा असावा असे सांगणारी मंडळी कितीतरी आढळतील. ब्राह्मणे तरांच्या उपहारगृहांतील चहा पिऊं नये म्हणून मनांत वाटत असले तरी चहाची तळफ सहन न झाल्यामुळे इकडे तिकडे बघून ही मंडळी चटकन चहा पिऊन येतील. व्यसन हैं असें करतें. व्यसनाधीन जीवनाचे हे असे असते. “Where is the reformer’s moral courage and I answer drowned in the tee-cup. ‘‘— सुधारकांचे व सुशिक्षितांचे नैतिक धैर्य कोठें नाहींसें झालें’ म्हणून मला कोणी विचारल्यास ‘तें चहाच्या कपांत बुडून मेलें, म्हणून मी उत्तर देईन, असें डॉ. ए. ओ. ह्यूमनें म्हटले आहे. हे बारीकसें व्यसन इतकें असें करवतें तर याहून मोठमोठी व्यसनें किती पापाकडे ओढत असतील, अधर्म शिकत असतील याची कल्पना करावी. या दृष्टीनें व्यसना धीन मनुष्य केव्हां काय करील याचा पत्ता लागणार नाही असे वाटतें. तो विश्वसनीय ठरत नाही. अलीकडे राष्ट्रांतून चहा, कॉफी, बिडी, सिगारेट ही सामान्य व्यसनें तर इतकी बोकाळली आहेत की, सात-आठ वर्षांचे पोरसुद्धां यांपैकी कोणत्याना कोणत्या व्यसनानें पछाडलेलेच असतें. गांजा-दारूंनीसुद्धां इतका नसला तरी राष्ट्रावर बराच पगडा बसविल्यासारख्या दिसतो. दारूबंदी जरी सरकारने केली असली तरी चोरून मारून मागच्याहिपेक्षां आतां खेडो पाडी याचे व्यसन अधिकच होत चालले आहे, असे सांगतात. चोरबाजार फार वाढल्याची ओरड तर सर्वत्र आहे. फारच हें अनिष्ट आहे. सुरापान तर सप्तमहापातकांपैकी एक मोठें पातक मानले गेलें आहे. खेडोपाड्याच्या कांहीं ब्राह्मणांतूनहि हें पसरत चाललेले पाहून मनाला फारच वाईट वाटतें. इतर समाजाला सुधारणाऱ्या या जातीतूनहि अशा व्यसनांचा व अकृत्यांचा प्रवेश होत असलेला पाहून पुढच्या अनिष्ट भविष्याची कारणे आतांच एकदम नष्ट व्हावीत म्हणून देवाची अनन्यतेनें प्रार्थना करावी असे वाटतें. येथे एका हिंदी कवीचें वाक्य आठवते. “ मद्य, मांस, चाय, धूम्र, आफीम जो जो प्राणी खाय । नेमधर्म यद्यपि किये सबै रसातळ जाय ॥ “

ज्याच्यामुळे मनुष्याची शारीरिक, बौद्धिक व आर्थिक हानी होते, इहपर प्रगति खुंटते, समाजांत असलेलाहि गौरव नष्ट होतो, अशा जीवनाला आवश्यक असणाऱ्या मादक, चटकदार व मोहक पदार्थांची घातुक संवय त्या त्या व्यसनी माणसांच्या सहवासानें मुद्दाम जडवून घेऊन हालअपेष्टा सोसणें व विनाकारण दुःख भोगणे म्हणजे व्यसन. इथे ओघानें कबिराचे वाक्य आठवतें. “ गांजादारू मत पीयारो अक्कल गुंग होती है। अपना पदरका दाम खरचकर शिरपे जूती आती है ॥ ” व्यसनाच्या अनिस्टतेवर हि वाक्ये प्रकाश पाडल्याशिवाय राहाणार नाहीत. व्यसन वाईट म्हणून अनुभवानें पटलें तरी तें पटकन् सोडणेंहि अगदीं जड जातें इतका त्याचा पगडा बसतो.

“Bad habit is first a caller than a guest and at last a master.” वाईट संवय प्रथम प्रथम निमंत्रण देऊन गौरव करून मोठ्या शिता आपल्याकडे ओढते. नंतर घरी आलेल्या पाहुण्याप्रमाणे मोठ्या मान्यतेचा पाहुणचार स्वीकारते व हळू हळू आपल्याला वश करून शेवर्टी घरच्या मालकाप्रमाणे आपला अधिकार गाजवू लागते.

या व्यसनाच्या बाबतींतहि राष्ट्राच्या हिताकरितां विचार करणे अति अवश्य झालें आहे. फायद्याचा धंदा म्हणून चहा-कॉफीचीं दुकानें व विडीचे कारखाने आतां झपाट्यानें अधिकाधिक वाढत आहेत, त्याच्या प्रचाराचे अधिकाधिक प्रयत्न होत आहेत. त्यामुळे राष्ट्राचे किती नुकसान होतें याचा त्यांनी विचार करावा. आपल्या एका कुटुंबाकरितां राष्ट्राला त्यांनी व्यसनांत घालू नये.

home-last-sec-img