Literature

शहाण्णव तत्वे

कार्पासयज्ञोपवीतनिर्माणप्रकारःत्रिवृदूर्ध्ववृतं कार्य तन्तुत्रयमधोवृतम् । त्रिवृत्तच्चोपवीतं स्यात्तस्यैको ग्रंथिरिष्यते ॥ २ ॥ (गोभिल स्पृ.) संहतचतुरंगुलिमूलेषु पण्णवत्या सूत्रमावेष्ट्य तत् त्रिगुणीकृत्योर्ध्ववृत्तं वलितं कृत्वापुनरधोवृत्तरीत्या त्रिगुणीकृतं तत्सूत्रं नवतन्तुकं संपद्यते तत् त्रिरावेष्ट्य दृढग्रथी कुर्यात् स्तनादूर्ध्वमधो नाभेर्न धार्यतत्कथंचन || ( धर्मसिंधु ) – प्रथम चार बोटांना शहाण्णव वेळां सूत गुंडाळावयाचे असते. पुढे नवकृत करून तीन पदरी जानवें होतें. आणि मग त्याला एक ब्रह्मगांठ दिली म्हणजे यज्ञोपवीत तयार झालें. हे थोडक्यांत सांगितले असले तरी यांत सबंध सृष्टीची उभारणी आहे. आतापर्यंत सर्व प्राणिपदार्थ व देवदेवतांसह या आखल सृष्टीचा अंतर्भाव यांत होतो. इथल्या चार संख्येत त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोस्येहाभवत्पुनः । ही श्रुति वसली आहे. हिच्या बरोबर तिनें ब्रह्मांडच काय पण सृष्ट्युत्पत्तीच्या अगदी पहिल्या क्षणाच्या उदयापासून तो आतांपर्यंत ज्या म्हणून झाल्या त्या सर्व घडामोडी घेतल्या आहेत. एकांशेन स्थितो जगत्। हा अनंतकोटि ब्रह्मांडाचा अखिल दृश्यपसारा परमात्म्याच्या अविद्या विभागां तील एक अंश म्हणजे एक चतुर्थांश भाग आहे. तो परमात्मा आणखी एका पेक्षां एक अधिक दिव्य असणाऱ्या आपल्या तीन संविभागांनी वर व्यापून राहिला आहे. विद्यापाद, आनंदपाद, आणि तुर्यपाद अशी ही त्यांची नांवें आहेत. झालेली नामरूपात्मक सृष्टि संबंध या अविद्या विभागांतच पाहावयाला मिळते. स्थूलक्रियेचा अविथापाद, हा स्थूल देहाप्रमाणे आहे. या विविध नाम रूप, धर्म, कर्म, कुल, जातसिंबंध यांनी गजबजलेल्या या दृश्याच्या उत्पत्ती पूर्वील ‘ मी बहु व्हावे’ या संकल्पाचा तेजोमय आभासाचा हा दुसरा विद्यापाद होय. याला परमात्म्याचा सूक्ष्म देह म्हणतां येईल. आनंदपाद हा तिसरा. या ठिकाणी सृष्टीचें, सृष्टीच्या संकल्पाचे कोणतेंहि कार्य दिसून न येतां, कोणत्याहि अन्य विचाराचा आभास दिसून न येतां स्वरूपाच्या अनुभवाचाच एक आभास या ठिकाणी असतो. या ठिकाणची वृत्ति स्वरूपाचा अनुभव थोडीशी वेगळी राहून घेते. स्वरूपाचा आनंदात्रभास भोग या ठिकाणी असतो आणि त्यामुळेच या संविभागाला आनंदपाद म्हणून म्हणतात. हा तिसरा देह आहे. इथे किंचित् स्वरूपाचे आवरण असते. चतुर्थपाद म्हणजे केवळ आपणच एक परमात्मा असतो. आनंदच आपल्या आपण एक इथे असतो. अनुक्रमे यांनाच परमात्म्याचे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण देह म्हणतां येतील. ज्या बोटांना यज्ञोपवीताचे सूत गुंडाळावयाचे असते त्यांच्या चार संख्येत या सर्वांचा अंतर्भाव होतो. या सर्वांचाच त्यांत अंतर्भाव होतो हे दर्शविण्याकरितांच चार बोटांना मात्र सूत गुढाळतात. या चार देहांप्रमाणे या चार देहांच्या विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर व साक्षी या चार अमिमान्यांचाहि त्यांत अंतर्भाव होतो. ब्रह्मांडाच्या देहांचाच अंतर्भाव झाल्यानंतर पिंडाच्या स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण देहांचा व त्यांच्या विश्व, तैजस, प्राज्ञ, क्षेत्रज्ञ या चार अभि मान्यांचाहि अंतर्भाव त्यांत सहज झालाच. याचप्रमार्गे इतर चार संख्येच्या मोजमापांत भरणाऱ्या साऱ्या चौकड्यांचा अंतर्भाव यांत होतो. ते आठवतील तितके तसेच देत जातो. पिंडाच्या जागृदादि अवस्यांची अनुक्रमें नयन ( हृदय ), कंठ, नाभि आणि शिर ( ब्रह्मरंध्र ] अशी ही चार स्थळे आहेत. याच्या अकार, उकार, मकार, अर्धमात्रा ( अमात्रा) अशा मात्रा आहेत. आहवनीय, गार्हपत्य, दक्षिण, सभ्य असे अग्नि आहेत. ब्रह्मा (विश्व) विष्णु ( तैजस ), रुद्र ( प्राज्ञ), अक्षर चिन्मात्रस्वरूप अशा देवता आहेत.

तस्माच्चतुरवस्था चतुरंगुलवेष्ठनमिव । षण्णवतितत्त्वानि तन्त वद्विभज्य | शहाण्णव वेळां जें गुंडाळलेलें असतें तें शहाण्णव तत्त्वत्योतक आहे. ही शहाण्णव तत्त्वें वराह उपनिषदाच्या प्रारंभी दिली आहेत. पांच ज्ञानेंद्रिये ( कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक), पांच कर्मेद्रिये ( वाणी, हात, पाय, मूत्र-मलोत्सर्गाची दोन इंद्रिये), पांच प्राण, ( प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान ), पांच विषय ( शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध), अंतःकरणपंचक (अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार), अशी ही पंचवीस तत्त्वें अथवा अंतःकरण धरलें नाहीं तर चोवीस तत्त्वें होतात. इतक्या तत्त्वांचा हा लिंगदेह होतो. यालाच वासनादेह, आतिवाहिक देह, सूक्ष्म देह अशीहि दुसरी नांवे आहेत. याला अपंचीकृत देह असेहि म्हणतात. ही चोवीस अथवा पंचवीस तत्त्वेंच म्हणजे जग असे काहीं मानतात. कांहीं छत्तीस मानतात. (अशांच्या मतानें या पंचवीस तत्त्वांत आणखी भर पडते.) पंचीकृत स्थूल पंचमहाभूतें ( आकाश, वायु, अग्नि, जल आणि पृथ्वी), देह (स्थूल, सूक्ष्म आणि कारण ), तीन अवस्था (जागृत, स्वप्न आणि सुि पूर्वीचीं पंचवीस आणि ही अकरा मिळून अशी छत्तीस तत्त्वें होतात. आपल्याला शहाण्णव तत्त्वे बघावयाची आहेत.

पुढच्या तत्त्वांचा हिशोब करूं या. षड्भाव विकार हे विकार उत्पन्न झालेल्या सर्व पदार्थांना असतात. (उत्पन्न होण्यापूर्वी सूक्ष्मरूपानें असणें, पुढें स्पष्टपणें जन्माला येणें, दिवसेंदिवस वाढणे, उतरणें (विकार पावणे), क्षीण क्षीण होत जाणे व शेवटी नाश पावणे). पुढें पडूमची गणना केली जाते. भूक, तहान, शोक, मोह, म्हातारपण आणि मरण यांना पडूर्मि म्हणतात. देहधारी सर्वांना या षडूमि असतात. षट्कोश पाहूं. त्वचा, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि प्रतिस्थूलदेहाचे हे षड्कोश आहेत. दुसऱ्या प्रकारानेहि सांगतात तो विचार पाहूं. अन्नमय कोश हा रक्तमांसाचा देह. पूर्वोक्त षट्कोशांत एक रेत मिळविलें, म्हणजे या देहाचे सप्तधातु पूर्ण होतात. प्राणमय, मनोमय, विज्ञानमय’ सूक्ष्मदेहांत या तीन कोशांचा अंतर्भाव होतो. या तनि कोशांचे थोडें विचरण पाहू. प्राणमय कोशांत पंचप्राण व पंचकर्मेद्रियें यांचा अंतर्भाव होतो. मनोमय कोशांत मन आणि पंचज्ञानेंद्रियें यांचा अंतर्भाव होतो. विज्ञानमय कोशांत बुद्धि आणि ज्ञानेंद्रिये यांचा अंतर्भाव होतो. शेवटचा कोश म्हणजे आनंदमय कोश. याचा कारणदेहांत अंतर्भाव होतो. पूर्वोक षट्कोश हे स्थूलदेहापुरतेच असल्यास या कोशांत मात्र तिन्ही देहांचा अंतर्भाव होतो. पूर्वोक्त षट्कोश आहेत. आणि हे पंचकोश आहेत. हे पंचकोश तन्त्र ज्ञानाच्या अभ्यासकांना माहीत असतात. हे पंचकोश प्रसिद्ध आहेत म्हणून ते इथे दिले. मात्र यांचा या शहाण्णव तत्त्वांत अंतर्भाव होत नाही. पुढे अरिषड्वर्गाची गणना यांत होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य यांना अरिषड्वर्ग म्हणतात. यांना प्राणिमात्रांचे शत्रु म्हणून मानले जाते. यांना षड्शत्रु म्हणूनहि म्हणतात. कोणी या शहाण्णवाच्या बेरजेंत हे अरिषद्क घेतात; तर कोणी विश्व, तैजस, प्राज्ञ व सत्व, रज, तम या सहांचा हिशोब करतात. विश्वादि त्रय हैं स्थूलादि तीन देहाचे अभिमानी आहे. दुसऱ्या त्रयीला गुणत्रय म्हणतात

संचित, प्रारब्ध व आगामी असे कर्मत्रय आहे. अनेक जन्मावधि पुरेल अशा अनेक जन्मांच्या अभुक्त कर्मोंच्या सांठ्याला संचित ( सांठविलेले कर्म ) म्हणतात. यांतून चालू देहाला कारण झालेले कर्म प्रारब्ध म्हणवून घेते व या जन्मांत होऊन या जन्मांतच जी भोंगली जात नाहीत व जी अनेक जन्मांना कारणीभूत होतात त्यांना आगामी म्हणतात. वचन ( वाणीने बोलणें ), आदान ( हातांनी घेणें ), गमन ( पायांनी जाणे), विसर्ग (गुर्देद्रियानें मलोत्सर्ग करणे ), आनंद ( जननेंद्रिय द्वारा रतिसुख घेणे) अशी ही वाणी आदि पंचकर्मेंद्रियांची कार्ये होत. यांच्यापुढे अंतःकरण-चतुष्टयांच्या कार्याची परिगणना आहे. संकल्प विकल्प करणें हें मनाचे कार्य आहे. निश्चय करणें हें बुद्धीचें कार्य आहे. चिंतन करणें हें चित्ताचें कार्य आहे. अभिमान बाळगणे हें अहंकाराचे कार्य आहे. (अंतःकरणाचे स्फुरण होणें हें कार्य आहे. ) चार सवासना आहेत. मुदिता, करुणा, मैत्री, उपेक्षा ही यांची नांवें परोत्कर्षानें आनंदित होणे, हिला ‘मुदिता’ म्हणतात. दुःखी कष्टी लोकांच्या ठिकाण दया हीच ‘ करुणा आपला सदुपदेश न ऐकतां मुद्दाम आडमार्गानें जाणाऱ्याबद्दल जी उदासीनता येते तिलाच उपेक्षा म्हणतात. अनेक प्रकारच्या लोकांत बागावें कसे या प्रश्नांचा उलगडा या सद्वासनांनी होतो. आतां यापुढे दशेंद्रियांच्या अभिमानी देवतांची गणना बघितली म्हणजे शहाण्णव तत्त्वांची बेरीज बरोबर होते. श्रोनेंद्रियाची अभिमानी देवता, दिशा अथवा दिग् नांवाची आहे. अशीच त्वचेची वायु, डोळ्याची सूर्य, जिव्हेची वरुण व घ्राणाची अश्विनी. अशा पांच ज्ञानेंद्रियांच्या देवता आहेत. त्या त्या इंद्रियांची तीं तीं कार्ये त्यांच्या त्यांच्या त्या त्या देवतेच्या सत्तेनें होतात. आतां कर्मेंद्रियाच्या अभिमानी देवतांचा परिचय करून घेऊं. वाणीची अभि आहे आणि अशाच रीतीने कर, चरण, उपस्थ, पायु या कर्मेदियांच्या क्रमानें इंद्र, उपेंद्र, प्रजापति व मृत्यु अशा देवता आहेत. ही शहाण्णव तत्त्वांची बेरीज झाली. वराहोपनिषदांत या तत्त्वगणनेच्या नंतर श्लोक आहे तो असा विरादरूपिणं मां ये भजन्ति मयि भक्तितः । विमुक्ता s ज्ञान तत्कार्याज्जीवन्मुक्ता भवन्ति ते ॥ १६ ॥ – माझ्या ठिकाणी भक्ति ठेवून ब्रह्मस्वरूपी अशा माझ्या भजनी जे लागले आहेत, ते अज्ञानापासून व त्याच्या अखिल सांसारिक सुखदुःखादि कार्यापासून पूर्ण होऊन इथेच जीवन्मुक्त होतात. याच्याच पुढच्या श्लोकांत या शहाण्णव तत्त्वांना ज्यानें जाणलें तो

कोणीहि असो (तो) जीवन्मुक्त होतो, अशी याची फलश्रुति सांगितली आहे,

home-last-sec-img