Literature

शिवशक्त्यैक

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धिं मे पराम्जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५ ॥ एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥ मत्तः परतरं नान्य त्किंचिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥ ( भ.गी. अ. ७) ज्याच्या योगाने हे जग धारण केलें गेलें आहे अशी जीवभूत माझी एक शक्ति आहे. या शक्तीपासून अथवा प्रकृतीपासूनच सर्व भूतांची उत्पत्ति झाली. तीपासून या दृष्टीने होणाऱ्या सर्व कार्यांना व त्या प्रकृतीला त्यांच्या मूळरूपानें मीच एक उत्पत्तीचे आणि लयाचे स्थान आहे. माझ्यापेक्षां मोठें कांहीहि नाही. सुवर्णमालेतल्या एका सुवर्णाप्रमाणे मी या सर्व भूतांच्या अंतर्बाह्य व्यापून अखंड राहिलो आहे. असा या श्लोकांचा भावार्थ आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । ( भ.गी. १५-७) या जीवलोकांत जीवभूत जो माझा अंश आहे तो अंश अंशीच्या अभेदामुळे सनातन असा मीच आहे.

मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम्। तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् ||१०|| (श्वे. ४-१०) माया हीच प्रकृति आणि या माया रूप असणाऱ्या शक्तीला अथवा प्रकृतीला अधिष्ठान असणारा मायी परमात्मा. या परमात्म्याच्या अवयवभूत असणाऱ्या जीवांनीच हे सर्व जग व्याप्त झाले आहे. देहो देवालयः प्रोक्तः स जीवः केवलः शिवः । त्यजेदज्ञाननिर्माल्यं सोऽहंभावेन पूजयेत् ॥ ( स्कंद. उ. १०) – देहच देवालय आहे व त्यांत असणारा जीवच शिव आहे. अद्वितीय अशा शिवरूप पणसांत दुसरें कांहींच नसतांना अज्ञानाचे निर्माल्य प्रथम टाकून देऊन ‘ सोऽहम् ‘ तोच मी म्हणून, ऐक्यभावानें पूजा करावी. अभेददर्शनं ज्ञानं ज्यागं निर्विषयं मनः । स्नानं मनोमलत्यागः शौचामंद्रियनिग्रहः ॥ अभेद दर्शन हेंच ज्ञान, निर्विषय मन होणेंच ध्यान, मनोमलाचा त्यागच स्नान आणि इंद्रियनिग्रह म्हणजेच शौच (शुद्धि) जीवो ब्रह्मैव नापरः ! जीव ब्रह्मच आहे, परमात्मरूपच आहे. प्रकृतिपुरुषैक्य म्हणणे काय व वरील गीतानुसार जीवब्रह्मैक्य म्हणणे काय दोन्ही एकच. यालाच शिवशक्त्यैक्य असेहि म्हणतात. जीव ही एक प्रकृति अथवा शक्ति असे मानल्यास इला सात ज्ञान भूमिकांतून जाऊन शिवरूपी परब्रह्मांत ऐक्य पावावे लागते.

स एव सबै यद्भूतं यच्च भव्यं सनातनम् । ( कैवल्य.) एकः सन्बहुधा कल्पयन्ति । एकः सन्बहुधा विचारः । एको देवः सर्वभूतेषु गूढः एकोबहूनाम् । एकोह सो भुवनस्यास्य मध्ये । यो योनि योनिमधिति ष्ठत्येको यस्मिन्निदं संचविचैति सर्वम् । यस्मिन्निद संचविचैति सर्व स ओतः प्रोतश्च विभुः प्रज्ञासु ॥ इत्यादि अनेक श्रुतिस्मृतींच्या आधारे सर्वाधि परमात्मा अद्वितीयच असणे युक्तहिं होत असल्यामुळे या युक्तीच्या आधारेंहि एका परत्माम्यानेच आपल्या संकल्पाने ही सर्व रूपे धारण केली हैं सिद्ध होते. एकोऽहं बहु स्याम् । बहु स्यां प्रजायेयमिति स तपोतप्यत । इत्यादि श्रुति याचेच विधान करीत आहेत. स मिथुनः समभवत्एवमेव यदिदं किंच मिथुनमापिपीलिकाभ्यस्तत्सर्वमसृजत । या बृहदारण्याच्या वाक्यावरूनहि एक परमात्माच स्त्रीपुरुषरूप झाला, त्याने आपल्यापासूनच जगांतली सर्व जोडपी निर्माण केली हे सिद्ध होते. प्रजाकामो वै प्रजापतिः स तपो तप्यत । स तपस्तप्त्वा । स भिथुनमुत्पादयते । रथिं च प्राणं चेत्येतौ मे बहुधा प्रजाः करिष्य इति

प्रश्नोपनिषदादिकांची अशी एकाच अर्थाची इतरहि पुष्कळ वाक्य आहेत. एवंच एक परमात्मा भिन्नत्याच्या आणि बहुत्वाच्या संकल्पाने जितके असे हे जगांत दिसून येतें तें सर्च झाला असल्यामुळे हे वैचित्र्य व ही मिलता अपरिहार्य आहे. तारतम्यानेच मित्रत्व आणि बहुत्व टिकून असल्यामुळे, ते च जगाचे रूप असल्यामुळे या इशसृष्टीत कितीहि केले तरी या निसर्गाला अन्यथा कोणी करूं शकत नाहीं. सुवर्णाचे स्त्रीपुरुष, पांच वणांचे, चार आश्रमाचे, भिन्न आकाराचे, नाचोच्च भेदाचे लोक, पशुपक्षी आदि भेद निर्माण केले तर त्यांत व्यापून असणारे सुवर्ण एक म्हणून व एका सुवर्णाच्या दृष्टीने स्त्रीपुरुष, वर्ण, आश्रम, मनुष्य, मनुष्येतर योनी, स्थावरजंगम हा भाव मिथ्या म्हणून जाणतां येईल. पण असे मनांत आल्याबरोबर तिथले ते आकार जसे नाहींसे होत नाहीत त्याप्रमाणेंच या सर्व भेदभिन्न विविध जगांत सर्वरूपानें व्यापून असणारें एक परमात्मरूप म्हणून व एका परमात्म्याच्या दृष्टीने स्त्रीपुरुष, वर्णाश्रम, मनुष्य, मनुष्येतर योनीं, स्थावरजंगम हा भेदभाव मनांत आणणे मिथ्या म्हणून जाणता येईल. असे हें जाणलें तरी ते आकार व गुणधर्म नाहींसे होत नाहींत.

सृष्टीच्या जीवनक्रमांत त्या त्या पदार्थांचा त्या त्या गुणधर्माप्रमाणेंच उपयोग करून घ्यावा लागतो. सुवर्णाचींच नाणी असली तरी त्यांची कमी जास्त प्रमाणांनी किंमत वेगळी असते. एकाच सुवर्णाचीं आभरणें असली तरी ती त्या त्या ठिकाणींच घालतात. एकाच सुवर्णांत कंठा आणि कंठी असा पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्दप्रयोग होतो. ‘कंठा आण’ म्हटल्यानंतर कंठाच आणेल आणि ‘कंठी आण’ म्हटल्यावर कंठी आणेल.

home-last-sec-img