Literature

श्रावण वद्य द्वादशी

आज सर्वत्र अशांती व असमाधानच आढळते. द्रव्याचा मोह व त्याचे दुष्परिणाम यांचे निरीक्षण करणारे
काही उत्तरप्रदेशीय साधु मला भेटले होते. त्यांच्या तोंडी नेहमी उद्वेगाची भाषा असावयाची. मी त्यांना ' असे
का ? ' म्हणून विचारले असता त्यांनी ' स्वामीजी ' अन्नाप्रमाणे मनुष्याची बुध्दी होत असते. कारण आमच्या
छत्रासाठी जो पैसा येतो तो सर्व मारवाडी शेटजींकडून येतो. हे शेटजी पैशाच्या थैल्या उरावर घेऊन प्राण
सोडतात व त्यांच्या पैशानींच आमची छत्रे चालतात. त्या छत्रामधील अन्न आम्ही खात असल्यामुळे आमची
मनेही अशांत आहेत. ' असे उत्तर दिले.

पैशाचा मोह मरणापर्यंत आवरतां येत नाही. मरणाच्यावेळीही पैशाकडे पाहण्याचा मोह होतोच, पण ' हा
पैसा आपल्याबरोबर येऊ शकत नाही. ' असा विचारमात्र त्यावेळी येत नाही. अशा स्थितीत कोणतेही तप
साधणे अशक्य आहे. अनुष्ठानासाठी योग्य व परिपुर्ण असा वेळ जीवनांत मिळूं शकतो काय ? थोडेसे
स्वास्थ्य मिळतांच कोर्ट, कचेरी, व्यवहार इत्यादींचे विचार मनांत येतात. जिवनसमस्याच ज्यावेळी बिकट होते
त्यावेळी संसारत्याग कसा शक्य होणार ? असा प्रश्न निर्माण झाला असता शास्त्र ' दान ' हा मार्ग सुचविते.
दानामुळे भगवत् कृपा होऊ शकते. देवपुजेसाठी द्रव्य खर्च करणे, गरजुंना दानधर्म करणे हे सर्व
भगवत्कृपेसाठीच. एकंदरीत कोणत्यातरी प्रकारे त्यागानेच सुखप्राप्ती होऊ शकते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img