Literature

श्रावण वद्य पंचमी

हिंदु कधीही दुष्ट व दुर्जन असू शकत नाही, कधीही अविश्वसनीय असत नाही व कधीही हीन बनत नाही,
सज्जनांची निंदाही करीत नाही, नेहमी सध्दर्मपालकच असतो. तो स्वत: विवेकविचारपुर्ण असा विद्वान
असतो. वेदांनी दर्शविलेल्या आपल्या धर्मकर्मामध्ये तो नित्य रममाण होतो. तो परमसहिष्णु व आश्रितांचा
पालक असतो. धर्माविरुध्द आक्रमण होतांच धर्मरक्षणार्थ प्राणांची क्षिती बाळगीत नाही. संकटात
सापडलेल्यांना शक्यतो सहाय्य करण्यास तो नेहमी तत्पर असतो. आपल्या व दुसऱ्यांच्या अंत:करणात
सद्वृत्तीचे बीज पेरुन सर्व दुर्वृत्तींना समुळ नष्ट करणे हे त्यांचे एक कर्तव्यच होय.

हिंदुलोक अखिल मानवजातीच्या अत्युन्नत हिताची इच्छा करतात व त्यानुसार आचरणही करतात. त्यांच्या
अंत:करणांत सर्वांच्यासाठी दया असते. ते विश्वबंधु आहेत, वास्तवत: त्यांचे कोणाशीही वैर असत
नाही. असे असूनही ते नेहमी सध्दर्मपालनाचाच आग्रह धरतात. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र हे चार हिंदु
संस्कृतीरुपी शरीराचे क्रमश: मुख, हात, मांड्या व पाय होत हे विसरु नये. शिल हे हिंदुच्या नसानसातून
वाहणारा मुख्य धर्मप्रवाह आहे. हिंदु-सभ्यता अखिल विश्वांत विख्यात उच्चाटन करु शकणार नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img