Literature

श्रावण वद्य प्रतिपदा

नाभी, ह्रदय, नासिकाग्र व भ्रुमध्य यांत दृष्टी लावून ध्यान करू लागल्यास त्यांत स्थिरता आल्यावर प्रथम
प्रथम अत्यंत मनोल्हादक दृश्य दिसू लागते. निखारा, धुर, सुर्य, अग्नि यांच्या समान तांबडेलाल, काळे, पिवळे,
निळे प्रकाश, काजवे, विजेचे प्रकाश, स्फटिक आणि वज्रसामान विविध प्रकारचे ब्रह्मस्वरूपाचा
साक्षात्कारासारखे होऊ लागते. हे सर्व मनोलयासाठी सहाय्यक आहे, परंतु आत्मप्रकाश हा या सर्व
प्रकाशाहून विलक्षण आहे. तो तेजही नाही व अंधारही नाही पण तो द्रष्टा, दर्शन व दृश्य यामध्ये व्यापलेला

असून अद्वितीय आहे. जे दुसरे पाहू शकते ते अल्प होय. जो दुसरे काही पहात नाही, दुसरे ऐकत नाही व
समजत नाही तोच निरतिशय आत्मप्रकाश होय.

स्वप्नाचा दृष्टांत घेतल्यास त्याबद्दल स्वप्नामध्ये स्वयं ज्ञानाने सृष्टी होते असे श्रुतिमाता सांगते.

जागृतावस्थेतील चंद्र, सुर्य, अग्नि आदि स्वप्नांत असत नाहीत. पण जीव आपल्या मनानेच त्या दृश्य पदार्थाची
कल्पना करून सुर्यचंद्रादी तयार करून त्यांना प्रकाशमान करतो. इच्छा, संकल्प, कामना हे सर्व मनाचे विकार
होत. त्यांच्यामुळे होणाऱ्या कार्यमात्रांचे कारण मनानेच समजून घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे स्वयंप्रकाशी
परमात्म्याच्या मनोमय संकल्पाने बाह्यसृष्टी उत्पन्न होते अगदी त्याचप्रमाणे जीवाची ही स्वप्नसृष्टी आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img