Literature

श्रावण शुद्ध तृतीया

पहाणे, ऐकणे, वास घेणे, विचार करणे, समजून घेणे ही सर्व कार्ये कोणामुळे ? यासाठी बाह्य असे
कोणतेही कारणीभूत असू शकत नाही. बाहेरील सुर्य-चंद्राचा प्रकाश, दिव्याचा झगमगाट हे काहीही शरीरात
नसतांना वरील सर्व क्रिया समजण्यासाठी कोणता प्रकाश उपयोगी पडतो ? त्या प्रकाशास जो प्रकाश
कारणीभूत आहे तो प्रकाश म्हणजेच परमात्मा. ती शक्ती म्हणजेच परमात्मशक्ती. त्यालाच आपण ' भगवंत
' म्हणतो. त्या भगवंताची आराधना म्हणजेच भगवद् आराधना होय.

त्या परमात्म्यामुळेच सुरवातीस मीपणाची जाणीव होते. त्यामुळे मन प्रगट होते व त्या मनामुळे
इंद्रियांच्याद्वारे बाह्यजगाची कल्पना येते. अंतःप्रकाश नसल्यास बाह्य झगमगाटाने पदार्थाची जाणीव होणे
अशक्यच. अंतःप्रकाश नसलेल्या आंधळ्यास बाह्य वस्तु दिसत नाहीत एवढेच. अंतर्मनःशक्ति नसलेल्या
मूर्खास बाह्यपदार्थाची जाणीव असणे शक्य आहे काय ? तेही सोडून द्या ! आपल्या मनाने कोणतीही अपेक्षा
न केल्यास बाह्य वस्तुंचे ज्ञान होईल काय ?

*' अन्यत्र मनः अभूवं नापश्यम् | '* असे सांगण्याचा अर्थ तोच माझे मन दुसरीकडे गेल्यामुळे तू जे काही
सांगितलेस ते मला समजले नाही व तू आल्याची जाणीवही झाली नाही असे सांगण्याचे तात्पर्य काय ?
डोळ्यालासुध्दा अंतःशक्तिची आवश्यकता आहे त्यामुळेच पदार्थ पहाणे, समजून घेणे शक्य होते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img