Literature

श्रीरामनामाचे वैशिष्ट्य

श्रीरामरहस्योपनिषदाच्या पांचच्या अध्यायात श्रीमारुतीरायास श्रीसनकादि मुनीनी श्रीराममंत्राचा अर्थ सांगण्यास विनंती केल्याची मला आतां आठवण झाली आहे. ह्या अध्यायात श्रीराममंत्राचे महात्म्य संपूर्णपणे वणिले आहे. त्यातील काही गोष्टी मी सांगणार आहे. आपणांस सवड मिळाल्यास आपण तें उपनिषद वाचून पहावें.

‘नारायणाष्टाक्षरे च शिवपश्चाक्षरे तथा।

सार्थकार्णद्वियं रामो रमन्ते यत्र योगिनः॥ ‘ॐ नमो नारायणाय’ ह्या नारायणाष्टाक्षरी मंत्रातून रा’ अक्षर घेऊन व ‘नमः शिवाय’ ह्या शिवपंचाक्षरी मंत्रातील ‘म’ घेऊन | ती दोन्ही अक्षरे एकत्र आणल्यास, ज्या शब्दात ज्ञानयोगी अहर्निश रममाण होतात अशा ब्रह्मस्वरुपांस शोभेल असें नांव तयार झाल्याचे आढळेल तेंच ‘राम’ नाम होय. ह्या नावांत हरिहरांचे ऐक्य आहे. आणखो एक महत्वाची गोष्ट अशी आहे की, ‘र’ हे अग्निबीज असून ‘म’ हे मायाबीज आहे. ही दोन्ही एकत्र मिळून ‘राम’ हा शब्द झाला आहे. हा शब्द म्हणजे प्रकृति-पुरुषांचे, जीवेश्वर ऐक्यरुपच असे ब्रह्मस्वरुप आणि माया नष्ट करणारे स्वप्रकाशी आत्मरुप असें निवृत्तिमार्गीयांचे म्हणणे आहे.

प्रवत्ती मार्गाचे अनुकरण करणारे लोक आपल्या भावनेनुसार जोग्य असा भोग व मोक्ष देणाऱ्या मायोपाधिक परमेश्वरस्वरूपाची उपासना करतात. ‘तं यथोपासते तथैव भवति।’ असे असल्यामुळे ज्याच्या त्याच्या उपासना आपापल्या भावनेवर अवलंबून असतात. रामनामाची ‘तत्त्वमसि’ ह्या सामवेदातील एका महान वाक्याची तुलना करून त्याचे आणखी एक वैशिष्ठ्य तेथे दर्शविले आहे.

आद्यो रा तत्पदार्थः स्यान्मकारस्त्वम्पदार्थवान् । तयोः संयोजनमसीत्यर्थे तत्वविदो विदुः ॥’

पहिले रा’ हे अक्षर मायोपाधिक असून शुद्ध सत्य स्वरूप असणारा सगुण ब्रह्मांश, निर्दिष्ट करणारे असून दुसरे ‘म’कार है अविद्योपाधिक म्हणजे मलिन सत्व पदार्थरूपी जीवनास निर्दिष्ट करणारे आहे.’ त्वं’ पदातील दोन्ही अक्षरापैकी त्वं’ उच्चारतांच तोंड बंद करावे लागते ते ह्या ईशजीवाच्या भेदाला कारण झालेल्या मायोपाधीमा बाजूस सारून त्या दोघापेक्षां शुद्ध, निर्विकल्प आणि आनंदघनरूप असणाऱ्या चिन्मात्र ब्रह्माला दर्शविणारे ‘असि’ पद होय. जशा प्रकारे ‘राम’ हे नाम तू परब्रह्मस्वरूप आहेस असे दर्शविणाया ‘तत्त्वमसि’ ह्या वाक्यानुरूपहि आहे असे सांगितले आहे. हे झाले तत्त्वज्ञांचे मत.

‘प्रणदत्वात्सदा ध्येयो यतीनां च विशेषतः। राममन्त्रार्थ विज्ञानी जीवन्मुक्तो न संशयः॥

रामनाम हे प्रणवस्वरूप असल्यामुळे यतींनासुद्धा प्रणवाप्रमाणेच रामनाम सदासर्वदा आत्मस्वरूपाचे ध्यान करण्यासाठी योग्य आहे. तसेच राममंत्राचा अर्थ जाणणारा निःसंशय जीवनमुक्तच होय, असे येथे स्पष्टपणे म्हटले आहे. ‘मनुष्वेतेषु सर्वेषामाधिकारोऽस्ति देहिनाम् ॥’

राममंत्र म्हणण्यास अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वानाच सारखा अधिकार आहे. हेच ह्या मंत्राचे एक वैशिष्ठय होय. कबीरासारखे यवनसुद्धा ह्या राममंत्रामुळे पावन झाले असे इतिहास सांगतो. श्रीरामोपासनेचे मुख्य लक्षण कोणते? ह्या प्रश्नाचा आता आपण विचार करू या! श्रीराम रहस्योपनिषदाच्या प्रथमोध्यायात श्रीरामाच्या अंगदेवतांचा उल्लेख करून त्याच्या समवेत श्रीराममंत्र जप करावा असे सांगितले आहे. ह्या विधानाला अनुसरून वागणारास | ‘स रामो भवति । ‘ असे म्हटले आहे. दुसऱ्या अध्यायात श्रीरामाच्या सर्व प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख करून शेवटी श्रीसीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारूति यांचाहि एक मंत्र दिला आहे. सर्व मंत्राना ऋषि, छंदस्, देवता इत्यादींचाहि उल्लेख आहे. तृतीयाध्यायात मंत्रांचा क्रम वणिला आहे. चतुर्थाध्यायांत पुनश्चरणविधीचा विचार केला आहे. पाचव्या अध्यायात श्रीराम मंत्राचे | विवरण दिले आहे आणि सरते शेवटी ‘तदेतदृचाभ्युक्तस् ‘ असे म्हणून ‘सदा रामोऽहमस्मीति तत्त्वतः प्रवदन्ति य।न ते संसारिणो नूनं राम एव न संशयः॥’ असा श्लोक आहे. श्रीराम उपासनेचा मुख्य | क्रम हाच आहे असे मला वाटते व हा जर कोणी स्पष्ट केला असेल तर तो श्रीमारुतीरायानेच होय. ‘कपिपतिर्दास्य। ‘ श्रीमारुती हेच दास्यभक्तीचे आचार्य होत. त्यांना असे म्हणण्यात काही विशेष अर्थ आहे. आर्यतत्त्वज्ञानच असे आहे. आर्यतत्त्वज्ञानाला भेद मुळीच ठाऊक नाही. तत्त्व जाणून म्हणजेच अधिष्ठान जाणून घेऊन जसे सोन्याने घडविलेल्या सर्व दागिन्यातील सत्यस्वरूप केवळ सोनेच असते त्याप्रमाणे सर्वांचे सत्यस्वरूप, आनंदरूप असे एकमेव ब्रह्यच आहे असे समजून अखंडित ‘मी अद्वितीय परब्रह्मस्वरूप श्रीरामच’ अशा भावनेनें, अनुभवाने, निश्चयाने कोण प्रगट करील? म्हणजेच सर्वांच्या ‘मी’ ह्या अनुभवाचे यथार्थरूप एकमेव आनंदधन परब्रह्मच आहे असे कोण ठामपणे सांगेल ? ‘ तो परब्रह्मस्वरूप मला श्रीरामाप्रमाणेच आहे’ असे मारुतिरायाने ‘ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति ।’ हा सिद्धांतच जणू काही सर्वासमोर ठेवल्यासारखे नाही का?

आतां श्रीरामाच्या स्वरूपाचे वर्णन कसे आहे ? याचा विचार करूया! रामहस्योपनिषदाच्या प्रारंभी श्रीसनकादि मुनी, ऋषी, प्रल्हादादि विष्णुभक्त ह्या सर्वांनी मिळून श्री हनुमंतास ‘सर्व वेद, शास्त्रे, पुराणे, अध्यात्मिक विद्या, सर्व प्रकारचे विद्याज्ञान, ईश, गणपती, सूर्य, शक्ति ह्यासर्वामध्ये मुख्य असे एकमेव कोणते तत्त्व आहे ?’ अशा विचारलेल्या प्रश्नास श्रीमारुतिरायानी ‘येतेषु चैव सर्वेष तत्त्वं च ब्रह्मतारकम् ।’ ह्या सर्वात तारक असे एक ‘ब्रह्म’ च मुख्य तत्त्व आहे, असे सांगितले आहे.

‘राम एव परं ब्रह्म राम एव परं तपः। राम एव पर तत्त्वं श्रीरामो ब्रह्म तारकम् ॥’

त्या परब्रह्म श्रीरामास आत्मरूप समजणे हेच श्रेष्ठ तप होय. श्रीरामच परतत्त्व होय व श्रीरामच तारक ब्रह्मरूपी प्रणव होय, असे उत्तर दिले.

‘रमन्ते योगिनोऽनन्ते नित्यानन्दे चिदात्मनि । इति रामपदेनासौ परं ब्रह्मांभिधीयन्ते ॥

ज्या निजानंदरूपी चिदात्म्यांत योगीजन अहर्निश रममाण होतात ते परब्रह्मरूपच ‘राम’ ह्या नांवाने ओळखले जाते, अशा अर्थाचा हा श्लोक श्रीराम पूर्वतापनीयोपनिषदामध्ये आहे. या श्रीरामोत्तरतापनीयोपनिषदामध्ये –

‘अकराक्षरसम्भूतः सौमित्रिविश्वभावनः । उकाराक्षरसम्भूतः शत्रुघ्नस्तैजसात्मकः ॥

प्राज्ञात्मकस्तु भरतो मकारक्षरसम्भवः।अर्धमात्रात्मको रामो ब्रह्मानन्दकविग्रहः ॥

श्रीरामसान्निध्यवशाज्जगदानन्दहायिनी। उत्पत्तिस्थितिसंहारकारिणी सर्वदेहिनाम्। सा सीता भवति ज्ञेया मूलप्रकृतिसंज्ञिका ॥

असे श्लोक आले आहेत. प्रणवाचे ‘अकार’ उकार ‘भकार’ आणि अर्धमात्रा अशा साडेतीन मात्रांत स्पष्ट विवरण केले गेले आहे. पिंडब्रह्मांडाचे जागृताभिमानी विश्व वैश्वानर हे होत. त्यांचा ‘अकार’ मात्रेत समावेश होत असून लक्ष्मणरूपी, पिंडब्रह्मांड स्वप्नाभिमानी देवता तैजस हिरण्यगर्भ होत. हे ‘ उकार’ मात्रेत समाधिष्ठीत असून शत्रुघ्नरूपी; तसेच पिंडब्रह्मांडसुषुप्त्याभमानी देवता प्राज्ञ-परमेश्वर होत. यांचा ‘मकारांत ‘ समावेश होत असून सरतरूपी होत. विशेषतः ह्या त्रिगुणात्मक ‘माया’ कार्यासाठी अधिष्ठानात्मक असे जे ‘निर्गुण ब्रह्म’ अर्धमात्रेने सांगण्यात येते ते | ते सच्चिदानंद विग्रह धीरामरूप होय, असे सांगून ब्रह्मरूप असलेल्या श्रीरामाच्या सान्निध्यवशात असलेली जगदानंददायिनी, सकल देहांची उत्पत्ति-स्थिति-सहकारिणी अशी मूळ माया श्रीसीता श्रीराम | स्वरूपानंच आहे असे विषद केले आहे.

तारसारोपनिषदामध्ये प्रणवाचे आठ विभाग कल्पून आठव्या विभागात शोभणान्या श्रीरामाला ऐक्य रूपाने नमन करणारा मंत्र अशाप्रकारे दिला आहे. कर ‘ॐ यो हवै श्रीपरमात्मानारायणः स भगवास्तत्परः (प्रकृतेपरः) परमपुरुषः पुराणपुरुषोत्तमः नित्यशुद्धबुद्धयुक्त सत्य परमानंदाद्वय परिपूर्ण परमात्मा ब्रह्मैव, वाहं रामोस्मि भूर्भुवः सुवस्तस्मै वै नमो नमः ।’

मुक्तिकोपनिषदांमध्ये श्रीमारूतिरायास श्रीरामानीं सांगितले आहे की ‘तेदान्ते सुप्रतिष्ठोऽहं वेदान्ते समुपाश्चय’ ‘मी उपनिषदामध्ये सुप्रतिष्ठित आहे. माझ्यांत एकरुप व्हावयाचे असल्यास त्या श्रुति शिरोभागी असलेल्या उपनिषदांचा अभ्यास कर.‘ श्रीमामानी मक्तिकोपनिषदांत ‘गुरुपीठ’ सुशोभित करून श्रीमारुतीस १०८ उपनिषदांचा उपदेश केला आहे ते त्यांच्या

मयोपदिष्टं शिष्याय तुभ्य पवननत्दन । इदं शास्त्रं मयाऽऽ दिष्टं गुह्यष्मटोत्तरं शतम् ॥

ह्या उक्तीवरुन स्पष्ट होते. तुम्हाला मी हीच गोष्ट जास्त संक्षेपाले समजावून दिली आहे. तुम्ही ही उपनिषदे वाचून पाहिल्यास कदाचित याहूनहि अधिक प्रकाश तुमच्या मनावर पडेल.

home-last-sec-img