Literature

श्रीरामाची आत्मस्थिति

न चास्य महतीं लक्ष्मी राज्यनाशोपकर्षति । 

लोककांतस्य कांतत्वाच्छीतरश्मेरिव क्षपा ३२

न वनं गन्तुकामस्य त्यजतश्च वसुंधराम् । 

सर्वलोकातिगस्यैव लक्ष्यते चित्तविक्रिया ( वा. रा. अ. स. १९)


(वनं गन्तुकामस्य वसुंधरों त्यजतश्च सर्वलोकागिस्य रामस्य चिटविक्रिया नैव लक्ष्यते ॥ )

या लोकावरूनहि श्रीरामाचे निर्विकार हृदय व्यक्त होऊन अंचल आत्मनिष्ठा दिसून येते. राज्यभ्रंशाने श्रीरामाच्या मुखांत पोडा फरक पडला नाही. त्याच्या ठिकाणी असणान्या आत्मनिष्ठेचे निरुपम वैभव चंद्राच्या शांत शीतल किरणांप्रमाणे त्याला अनुसरीतच राहिले. म्हणून श्री वाल्मीक ऋषि आपल्या दिव्य दृष्टीने वाचलेल्याची साक्ष पटवत आहेत. सर्व मनोहर सर्वलोकमंगलकारक अशा विद्यारूप सवलत्कातिशय आनंद धन श्रीरामाचे चित्त कांही केल्या थोडे सुद्धा त्या वेळी विचलित म्हणून झाले नाही असे सांगण्यांत आत्मज्ञान्यांची पूर्णता व्यक्त केली एवढेच. साखरेला मुंग्या चिकटल्याप्रमाणे सर्व लोक रामाभोवती आकृष्ट झाले आणि श्रीरामां बरोबर बनवासास निघाले. समुद्राला बाहेरून कोठून पाण्याचा एक बिंदुई न मिळाला तरी तो जसा परिपूर्ण असतो त्याप्रमाणेच श्रीरामाची मुख राज्यश्रीवंशानें न बदलता परिपूर्णच होती. अशी ही आप संस्कृति आहे. आर्य धर्माचे हे असे वैभव आहे. समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्म काञ्चनः । तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिंदात्मसंस्तुतिः मानापमान योस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारंभपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ गुणातीताचे लक्षण येथे स्पष्टपणे उमटले आहे. न तो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम् । यथा पितरि शुश्रूषा तस्य वा बचनक्रिया ( बा. रा. अ. १९ २२) श्रीरामाची पितृभक्ति या ओकावरून व्य होते. वडिलांची शुश्रूषा करीत त्यांच्या आहेत राहाणे यापेक्षा अधिक धर्माचरण कोणतेहि नाही हें श्रीरामाचे वाक्य धर्माची जनहिताची व समाजस्वास्थ्याची कळकळ दाखविते.

home-last-sec-img