Literature

श्रीरामाचे गुणवर्णन अर्थात मानवांचे आदर्श सद्गुण

श्रीराम, सीता आणि लक्ष्मण ही तिघेंहि पायाने वनाला जाण्याकरितां “निघाली तेव्हां त्यांना पाहून नगरलोकांतून नानाप्रकारचे संवाद चालले होते. श्रीरामाच्या गुणाचेच वर्णन त्यांतून दिसून येतें म्हणून ते श्लोक आपण या ठिकाणी पाहूं.

निर्गुणस्यापि, पुत्रस्य कथं स्याद्विप्रवासनम् । 

किं पुनर्यस्य लोकोऽयं जितो वृत्तेन केवलम् ॥११॥ आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः । 

राघवं शोभयंत्येते षड्गुणाः पुरुषर्षभम् ||१२||

(वा. रा. अ. स. ३३)

हे घडले ते दशरथ महाराजांच्या स्वबुद्धाने नव्हे. कितीहि गुणहीन पुत्र जरी असला तरी का पिता त्याला घराबाहेर घालविण्यास तयार होत नाही. मग ज्याने  आपल्या सच्चारित्राने सर्वांना जिंकले, आपल्या मृदु सुशील वर्तनाने सर्व लोकांनाच जो अत्यंत प्रिय झाला सर्व लोकच त्याला वश झाले त्या श्रीरामाला दशरथच काय पण कोणता मूर्ख पिताहि घराबाहेररश काढणार नाही वनवास पत्करण्यास सांगणार नाही. मृदुमधुर स्वभाव दया, दक्षिण्य, विद्वत्ता सुशीलता, इंद्रियनिगह, मनोनिग्रह (चित्तशांती) या सहा गुणांनी श्रीराम संपूर्ण अलंकृत आहे. पुरुषवेध व्हावयाचे झाल्यास गुण प्रत्येक आमसात् केले पाहिजेत. या पड्गुणांनी युक्त असणारा आपल्या शुद्ध चारित्र्याने व प्रेमळ आचरणाने सर्वांनाच वश करतो असे यावरून स्पष्ट होते. श्रीरामाचाच आदर्श पुढे ठेऊन कां वागावे यासंबंधी या पौरजनांच्या तोंडून निघालेला एक लोक पाहू ।

मूर्त होष मनुष्याणां धर्मसारो महाद्युतिः । 

पुष्पं फलं व पत्रं व शाखाथास्येतरे जनाः

(वा. अ. स. ३३-१५)

मुख्य सारभूत असलेल्या धर्मानेंच श्रीरामाचे रूप धारण केलें आहे. फलपुष्पपत्रांनी बहरून विस्तारलेल्या मनुष्य वृक्षाचे मूळच हा धर्मरूपी श्रीराम होय. याच्या मुखावरील तेज अपार आहे. मनुष्य वृक्षाचे मूळ धर्मरूप भगवान श्रीरामचंद्र आणि त्याचे पर्णपुष्पफलादि इतर जन असे झाल्यास साऱ्या वृक्षविस्ताराला मुळाचाच आधार नव्हे का !

home-last-sec-img