Literature

श्री शारदा स्तोत्रम्‌

पूर्वपीठिका—— शीगेहळ्‌ळी येथील वेदपाठशाळेच्या प्रारंभाच्या सुमुहूर्तावर म्हणण्यासाठी हे स्तोत्र तयार केले होते.

विबुध्ावंदिते । बुधजनाश्रिते ।।
जननि शारदे। भवतु ते कृपा … ।।1।।
देवादिकांनी वंदिलेल्या, विद्वानांनी आश्रय घेतलेल्या, माते शारदे! (आमच्यावर) तुझी कृपा असो. ।।1।।

मतिविकासिके। मतिविशोधिके ।।
मतिवरार्चिते । कुरु कृपां शिवे ।।2।।
बुद्धि विकास करणार्‌या, बुद्धीला शुद्ध करणार्‌या चांगले विचार (असलेल्या लोकांनी) पूजा केलेल्या हें कल्याणकारक देवी (आमच्यावर) कृपा कर. ।।2।।

विमलबोधिके । निजसुखात्मिके।
यदि तु ते कृपा । स तु सुखी भवेत्‌ ।।3।।
शुद्ध ज्ञान देणार्‌या, आत्मसुखांत रंगणार्‌या (देवी) जर (एखादद्ययावर) तुझी कृपा असेल तर तो सुखी होईल. ।।3।।

जननि ते पदं । जडविभासकम्‌।।
स्फरतु सर्वदा । स्फुटतरं हृदि ।।4।।
हे माता! अज्ञानी मनुष्यास (ज्ञानाने) प्रकाशित करणारे तुझे चरण (आमच्या) हृदयांत नंहमी में अत्यंत स्पष्टपणे स्फुरोत । ।।4।।

चिदवलंब्यहे। जननि मन इदम्‌।
अतिसुशोभनं । विशतु तव पदम्‌ ।।5।।
हे आई ! चैतन्याचा आश्रय घेऊन माझ े मन अत्यतं संदु र, अशा तुझ्‌या पदांकडे वळों ।।5।।

तव सुशोभनं । विमलरुपकम्‌।
जगति विस्तृतं । कुरु दयान्विते ।।6।।
हे दयाळू (माते) ! तुझे अत्यंत सुन्दर असे शुद्ध रुप जगा मध्ये विस्तृत कर। ।।6।।

तव कृपान्विता । जगति नैकशाः ।।
तमिरहारकाः । सन्तु बुधजनाः ।।7।।
तुझी कृपा झालेले (अज्ञानरुपी) अंधःकाराचा नाश करणारे अनेक विद्वान लोक ह्‌या जगात असो। ।।7।।

मलहरात्मके । विमलजनपुरे।।
जननि त्वं सदा। निवस ज्ञानदे।।8।।
हे पाप हरण करण्या चा स्वभाव असणार्‌या व ज्ञान देणार्‌या माते! तूं नेहमी शुद्ध लोकाच्या घरातं वास्तव्य कर। ।।8।।

जयतु जयतु नित्यं शारदा वेदमाता ।
जयतु जयतु देवी ज्ञानदा मोक्षदा च ।।
जयतु जयतु या श्रीः सर्वदेवैरुपास्या।
जयतु जयतु नित्या भारती चित्स्वरुपा ।।9।।
वेदमाता शारदेचा नेहमीं विजय असो। ज्ञान व मोक्ष देणार्‌या देवीचा विजय असों। सर्व देव जिची उपासना करतात हैं, तीशारदा विजयी असो। चित्‌स्वरुप व नित्य अशा भारतीचा (शारदेचा) विजय असो।

इति श्रीमत्‌ परमहंस परिव्राजकाचार्य सद्‌गुरु भगवता श्रीधरस्वामी रचित्‌ शारदा स्तोत्र संपूर्णम्‌।।

रचनास्थलेम्‌—शिग्‌गेहळळी मराठी अनुवादक—
रचनाकालः—शके—1864 सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img