Literature

श्रुतीचे सांगणे

यो वै भूमा तत्सुखं । नाल्पे सुखमस्ति । भूमैव सुखं । भूम्प्र एवं

विजिज्ञासितव्यः ॥ — जें निरतिशिय सर्वाधिक सुख आहे तेच खरे सुख. अल्पांत सुख नाहीं. ते सर्वांत मोठे सुखच एक खरें. त्यालाच जाणण्याची इच्छा धरात्री. ‘ यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति नान्यविजानाति स भू माऽथ यत्रान्यत्पश्यत्यन्यच्छ्रणोत्यन्यद्विजानाति तदल्पं यो वै भूमा तदमृतम् यवल्पं तन्मर्त्य स भगवः कस्मिन्प्रतिष्ठित इति स्वे महिम्नि यदि वा न महिम्नीति || ( छां. ७/२४११)- जेथे पाहावयाला, ऐकावयाला व जाणा वयाला वेगळे म्हणून उरत नाहीं, जें अखंड एकरस सुखरूप असतें तेंच परमात्मरूप. जेथें पाहाणारा व पाहिले जाणारें, ऐकणारा व ऐकले जाणारें, जाणणारा व जाणले जाणारे वेगवेगळे असतें तें हें विश्व अल्प आहे. जें निरवधि सुख अद्वितीय परमात्मरूप आहे तेंच एक नित्य निर्विकार असें अविनाशी तत्त्व होय. आणि याहून जें विलक्षण असतें तें अल्प. विश्व विकारी, विनाशी आहे. तें परमात्मरूप कुठे व कोणत्या आश्रयानें असतें असे विचारल्यास तें सर्वोपाधि विनिर्मुक्त सत्तामात्र स्वरूप आहे. त्याला कशा चाहि आश्रय नाहीं. ते आपल्या प्रभावानें व वैभवानें प्रभावशाली व वैभव शाली आहे. आपल्या महिन्यानेंच तें सुप्रतिष्ठित आहे. त्याचाच आधार सर्वांना आहे. त्याला मात्र कशाचा आधार नाही. तेंच सर्वाधाररूप होय. केवल सुख, केवल आनंद हे त्याचे स्वरूप आहे. दोरीवर सर्पाचा आरोप झाल्याप्रमाणे या अद्वितीय आनंदरूप परमात्म्यावर या जगाचा हा असा केवळ आरोप आहे. गो अश्वमिह महिमेत्याचक्षते । हस्तिहिरण्यं दासमाये क्षेत्राण्या यतनानीति। नाहमेवं ब्रवीमि ब्रवीमीति होवाचान्यो ह्यन्यस्मिन्प्रतिष्ठित इति ।।’ ( छां. ७ । २४ । २ ) -गाई, वृषभ, हत्ती, घोडे, सोनें, चांदी, दासदासी, आयुरारोग्य, विधि, बुद्धि, सुंदर, पत्नी, पुत्र, जमीनजुमला, इष्टमित्र, गजान्त लक्ष्मी असणें म्हणजे मोठें भाग्य व मोठे वैभव म्हणून म्हटले जाते. मी मात्र तसें म्हणत नाहीं. अनंत कोटी ब्रह्मांडांचे अखिल वैभवहि त्या आत्मीय अपार व सारभूत वैभवापुढें, त्या सत्य व सर्वकारण सुखापुढे, त्या कोरीब केवल आनंदापुढे अत्यल्प, विनाशी, विकारी व असत्य आहे. तर मग त्या एवढ्या वैभवाची काय कथा ! त्या परममंगल आत्मीय सुखावर बाह्यसुखाचा केवळ आरोप आहे. खऱ्या सरोवराचे पाणी आणि त्याच्या चित्रांतले पाणी इतकें यांत अंतर आहे. चित्रांतल्या सरोवरांत खरें पाणी नसल्यामुळे तेथे जसें खरें ! पाणी प्यावयाला मिळत नाहीं आणि तहानहि भागत नाही त्याप्रमाणे काल्पनिक प्रपंचांतल्या काल्पनिक सुखांत सुखच नसल्यामुळे यापासून शांति समाधान व खरें सुख लाभत नाही. चित्रांतल्या सरोवरांत खऱ्या सरोवराचा आभास असल्याप्रमाणे या बाह्य वैभवांत खऱ्या सुखाचा आभास आहे. चित्रांतल्या सरोबराबरूनच खऱ्या सरोवराची कल्पना येत असल्यामुळे इतक्याच दृष्टीने या चित्रांतल्या सरोवरांत खरे सरोबर आहे असे जसे म्हणावे तसेच या जागतिक सुखांत आत्मीय सुख आहे म्हणून म्हटले जाते. खोट्यास खऱ्याचा आधार जसा असतो, खऱ्या पुत्राच्या आधारे वंध्यापुत्राचा जसा आरोप होतो त्याप्रमाणे खऱ्या सुखाच्या आधारे बाह्य सुखांत सुखाचा आरोप केला जातो. नकाशांतला रमणीय प्रदेश पाहून जसे त्या आभासाने लक्षित होणाऱ्या खऱ्या प्रदेशालाच मनुष्य जातो व तिथे खुशाल निवास करून राहातो त्याप्रमाणेच या जगांतले भ्रामक रमणीय सुख पाडून त्या सुखाभासानें लक्षित होणाऱ्या खऱ्या सुखरूपी परमात्मपदास तो पोहोचतो.

येन रूपं रसं गंधं शब्दान्स्पर्शा श्र्च मैथुनान । एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यत एतद्वै तत् ॥ ३ ॥ स्वप्नान्तं जागरितान्तं चोभौ येनानुपश्यति । महान्तं विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति ॥ ४ ॥ (कठ. २|१-३-४) वरील भावार्थच या दोन लोकांवरून दिसून येतो. जागृत्स्वप्नांत अनुभविले जाणारे दिसून येणारे व शब्दादि विषय ज्याच्यामुळे अस्तित्वात असल्यासारखे वाटतात तें निर्भेळ सुखच मी असा निश्चय झाला की या विषयानुभवाकडे बुद्धि बनून होणारे दुःख-शोक होत नाहीत. हा या दोन मंत्रांचा भावार्य आहे.

स एवाधस्तात्स उपरिष्टात्स पश्चात्स पुरस्तात्स दक्षिणतः स उत्तरतः स एवेद सर्वमित्यथातोऽहंकारादेश एवाहमेवाधस्तादहमुपरिष्टादहं पश्चादहं पुरस्तादहं दक्षिणतोऽहमुत्तरतोऽहमेवेद् सर्वमिति ॥१॥ अथात आत्मा देश एवात्मैवाधस्तादात्मोपरिटादात्मा पश्चादात्मा पुरस्तादात्मा दक्षिणत आत्मोत्तरत आत्मैवेदं   सर्वमिति ||२|| (छां. ७-२५११)२) ब्रह्मैवेदममृतं पुरस्ताद्ब्रह्म पश्चाद्ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण । अधश्चोध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वामिदं वरिष्ठं ॥ (मुंडक. २-२-११) तो, मी, आत्मा व ब्रह्म हे सारे अद्वितीय तत्त्वनिदर्शक, तें आनंदस्वरूपनिदर्शक संकेत आहेत. या सर्व संकेतांनी लक्षित होणारे आपले एक अद्वितीय आनंदघनरूप या अध्यारोपित, अध्यस्त, प्रपंचाच्या वामदक्षिण, अधोबे, अंतर्बाह्य, याच्या सत्य स्वरुपाने रज्जुसपतिल्या भ्रामक भावनेत सत्य एक रज्जुल्याप्त असल्याप्रमाणे व्य आहे. हा निश्चय असाचा, हे या वरील श्रुतिमंत्रांतून तात्पर्य निघते. वेद निषदांचे तत्त्वज्ञान एवढेच आहे.

home-last-sec-img