Literature

संध्या मुक्तिदायक ब्रह्मविद्याच

सा विद्या परमा मुक्तेर्हेतुभूता सनातनी । त्वमेव संध्या सावित्री त्वं देवि जननी वशा || मुक्ति देणारी ब्रह्मविद्याच संध्या आहे. अलीकडच्या तरुणांना गायत्री मंत्र मुंजीच्या वेळी वडिलांनी सांगितला होता याची आठवणहि विसरलेली असते; तर मग गायत्री मंत्राची आठवण कशी राहाणार ? गायत्री मंत्राचीच ही स्थिति तर मग त्या लांबलचक संध्येविषयीं कांहीं बोलावयालाच नको. कित्येकांना संध्या पाठ असते, कराविशीहि वाटते पण बरोबरचे विद्यार्थी हंसतात म्हणूनच केवळ करण्याचे ते टाकून देतात. अहरहः संध्यामुपासीत न सोडतां प्रतिदिवशी संध्या केलीच पाहिजे अशी वेदाज्ञा आहे. यो न संध्यामुपासीत ब्राह्मणो हि विशेषतः । स जीवन्नेव शूद्रस्तु मृतः श्वा चैव जायते ॥ (दक्ष. २।२६) जो संध्योपासना करीत नाहीं तो ब्राह्मण इथे जिवंत असतांना शूद्राप्रमाणे होतो. अगदीच खान पानांत नियम न ठेवतां वागला तर शूद्रच होतो व मेल्यानंतर कुत्र्याच्या जन्माला जातो. असा याचा अर्थ होतो. अशी कोणाची स्थिति होऊं नये व असला जन्महि कोणाला येऊं नये व सर्वांना संध्या करण्याची बुद्धि होवो अशी देवाला प्रार्थना आहे.

संध्याहीनोऽशुचिर्नित्यमनईः सर्वकर्मसु । यदन्यत्कुरुते कर्म न तस्य फलभाग्भवेत ॥ संध्याहीन अपवित्र असतो. संध्या न करतां कांही केले तरी निष्फळ होतें. अकरणान्मंदकरणं श्रेयः । अगदीच कांही न केल्यापेक्षां थोडी तरी करणें श्रेयस्कर होते म्हणून कर्मीत कमी दोनदां आच मन, क्रेशवादि चोवीस नांवें, तीन अर्घ्य, दहा गायत्री एवढे तरी करावे. थोड क्यांत गायत्रीचा विचार करूं. गायत्री छंदसामहं । वेदामध्ये गायत्री रूपाने मचि आहे. गायत्री वा इदं सर्व भूतं यदिदं किंच वाग्वै गायत्री वाग्वा इदं सर्वं भूतं गायति त्रायते च ॥ (छां. ३।१२।१ )- हें जें सर्व कांहीं आहे. ते स्थावरजंगमात्मक सर्व कांहीं जग गायत्रीच आहे. परमा त्म्याची वाणी म्हणजे वेद. ते वेद गायत्रीरूप आहेत. त्या वेदांनींन हे सर्व झाले असल्यामुळे हे सर्व वेदरूप, गायत्रीरूपच आहें. जो इचे गायन करतो म्हणजे जप करतो त्याला या गर्भजननमरणादि संसारापासून गायत्री तारते. गायन्तं त्रायसे यस्माद्गायत्री त्वं ततः स्मृता ।— गाणाऱ्याला, प करणाऱ्याला तूं तारतेस म्हणून तूं गायत्री म्हणवून घेतेस. हा गायत्रीचा जप जरी केला तरी समग्र वेदाध्ययनाचें ब्राह्मणाला फळ मिळतें. गायत्री छंदसां माता । वेदानां माता भुवनस्य नाभिः । गायत्री जगत्कारण वेदाची माता व अखिल चराचर विश्वाचे जीवन, मुख्या धाररूप परब्रह्म होय. ॐ मित्येतदक्षरमिदं सर्व | या मांडुक्योपनिषदाच्या — जें हैं आहे तें सर्व प्रणवरूपच आहे’ या मंत्राची इथे आठवण होते. प्रणवरूषच गायत्री आहे असा यांतून अर्थ निघतो. सर्व ह्येतद्ब्रह्म ।—हें सर्वहि ब्रह्मच आहे. अयमात्मा ब्रह्म – हा आत्माच ब्रह्म होय. परं चापरं च ब्रह्म यदौकारः । —ओंकार म्हणजे प्रणवच, परपार ब्रह्म आहे. प्रणव हा निर्गुण, निराकार रूप व परब्रह्माची एक संज्ञा आहे. ॐ भूः भूवः स्वः। ते ॐकार वाच्य परब्रह्म सच्चिदानंदरूप आहे. ( भवतीति भूः सत् भावयतीति भुवः चित् स्वर्यते स्तूयते इति स्वः आनंदः । ) तत् तें प्रणव वाच्य सच्चिदानंदरूपच. सविता तस्य सवितुः।–हा सविता आहे. त्याच्या रूपाचे आम्ही ध्यान करतो. सूयते अनेनेति सविता ।-ज्याच्याकडून या चराचर विश्वाची उत्पत्ति, स्थिति’ लय हीं कार्ये होतात तोच हा सविता. या ठिकाण यतो वा इमानि भूतानि जायन्ते । येन जातानि जीवन्ति । यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तत्-ब्रह्मेति ॥ या तैत्तिरीय शाखेच्या यजुर्वेद मंत्राची आठवण होते. जगत्कारण सच्चिदानंदरूपी तो सविता असला तर असेना का ? त्याचे कां ध्यान करावे म्हणून आक्षेपिल्यास “ वरेण्यं ” तें या चराचर विश्वाच्या संपूर्ण एकवटलेल्या सुखाहून श्रेष्ठ आहे व श्रेष्ठ असल्यामुळेच “ वरणीयम् ” ” श्राश्रयणीयम्” तें आश्रयणीय आहे. इथे एतावानस्य महिमा अतोज्यायांश्च पूरुषः । या पुरुषसूक्ताच्या ऋचेची आठवण होते. ते सवितुरूप, सच्चिदानंदरूप, परमश्रेष्ट, परम आश्रयणीय म्हणून सांगत, त्याच्या आश्रयानें तें मोठे असले तर त्या पुरतें असणार, आम्हांला त्यापासून काय लाभ, असा प्रश्न केल्यास “भर्गः ” ” मर्जतीति मर्गः ” असे त्याचे उत्तर पुढच्या पदाने दिलें आहे. “ एकमेवाद्वितीयम् ब्रह्म । ” ब्रह्म हे अद्वितीय असल्यामुळे तेच हें तुझ्यासकट या चराचर विश्वाचें सत्यरूप असून देखील तूं “अहं ब्रह्मास्मि” मीच तें बह्म आहे अशी स्वाभाविक भावना न करता ज्या अज्ञानाच्या हेतूनें तूं स्वतःला ” देहोऽहं ” म्हणून मानतोस त्या अज्ञानाला व त्या अज्ञा नाच्या कार्याला तें सवितृरूप परवा जाळून टाकते आणि तुझ्या सत्यरूपा नेच ते उरते. “ तत्त्वमसि ” तेंच तूं आहेस म्हणून तुला श्रुति सांगत आहे. स्वयंप्रकाश स्वरूप अद्वितीयच असते. अद्वितीय वस्तु आपल्याच एक केवल सत्तेनें असते. जो आनंद आपल्या अद्वितीय सत्तेनें व जाणीवेनें स्वमात्र आहे त्यांत अन्य कशालाहि मुळीं वावच मिळत नाही. आम्हांला जर त्या स्वरू पाची प्राप्ति त्याच्या ध्यानाने होत असेल आणि त्यामुळे आमच्या पाठीमागे लागलेला दुःखरूप संसार जर कायमचा नष्ट होत असेल व आम्ही त्या केवल आनंदमात्रतेनें शिल्लक राहात असू तर अवश्य आम्ही त्या ” देवस्य ” देवाचें “ धीमहि ” ध्यान करतो. “ दीव्यते प्रकाशत इति देवः ” स्वयं आपल्या तेजानें जें प्रकाशत असते त्यालाच देव जर म्हणतात तर तें  नः धियः ” आमच्या बुद्धीला “प्रचोदयात्” स्वरूपज्ञानाविषय, स्वरू पाच्या आनंदप्राप्तीविषयीं प्रेरीत, आमच्या या आपल्या ” मी ” या भागांत तें आपल्या सच्चिदानंदरूपानें प्रकट होवो. असा या गायत्रांचा अर्थ आहे. ब्राह्मणाला अशा गायत्रीची मुख्य उपासना ब्रह्मप्राप्तांकरितां कर्तव्य आहे. वैदिक मंत्राचें ब्राह्मणाला व तदर्थक व इतर पौराणिक अन्य मंत्रांचे इतरांना अनुष्ठान सांगितले आहे. सर्व मंत्रांचा ‘ सोऽहं’ पर ‘तेंच मी एक अखंड सच्चिदानंदरूप परमात्मस्वरूप हाच – अर्थ आहे व प्रत्येक प्राणिपदार्थ हा तद्रूप आहे. ब्राह्मणानें अशा अनुसंधानानें गायत्री करावी व इतरांनी इतर मंत्रांचे अनुष्ठान करावें. हजार गांठी असल्या तरी मुद्दा एकच.

home-last-sec-img