Literature

सतीपति आणि संतति यांविषयीं आर्याची दृष्टि

अंगादंगात्संभवसि हृदयादधि जायसे । आत्मा वै पुत्रनामासि स जीव शरदः शतम् ॥ (एकाग्निकांड)

– आपल्या अंगप्रत्यंगापासून, हृदयापासून, सच्चिदानंद रूपाच्या अशा या ” मी ” स्मृतिपासून उत्पन्न झालेला तूं माझे ते सच्चिदानंद स्वरूपच आहेस. तूं स्वपर हितकर आणि उद्धारक असणारी उच्च सत्कर्मे करीत आनंदरूपानें शेंकडों वर्षे राहा. या ठिकाणी कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत॰समाः । या ईशावास्याच्या मंत्राची आठवण होते व आर्यांना आपल्या पुत्राच्या ठिकाणी कोणती व कशी दृष्टि असते, ते यामुळे कळून येतें. अशा तऱ्हेची उच्च संस्कृति जगद्वंथ कां होणार नाही ? अशा तऱ्हेची संस्कृति कोणत्याहि रूपाने नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे लोक विश्वद्रोही आहेत असे कोणी म्हटले तरी ते हे कसें खोडून काढतील सद्धर्मपरायण अशा एका सच्छील मातापितरांच्या मातृभक्त, पितृभक्त मुलामुलींतून व यांच्या तशाच सत्संततींतून पण परब्रह्मरूपी परमेश्वराच्या स्वरूपभूत शक्ती पासून झालेला तदंशाचा हा विस्तार आहे असे आयांच्या दृष्टीने असते.

यस्मिन्नृणं सन्नयति येन चानंत्यमश्नुते।

स एव धर्मजः पुत्रः कामजानितरान्विदुः ॥ (मनु, ९|१०७) 

ज्येष्ठेन जातमात्रेण पुत्रीभवति मानवः ।

पितॄणामणचैव स तस्मात्सर्वमर्हति ।। (९|१०६)

ज्यांच्यामुळे मनुष्य विमुक्त होऊन धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थद्वारा पुढे शानाने मोक्ष मिळवितो, अनंत सुख प्राप्त करून घेतो तो पहिला पुत्र म्हणजेच गृहस्थधणीप्रमाणे खरा पुत्र. त्यामुळे प्रजोत्पादनाच्या दृष्टीने गृहस्थधर्म पूर्ण होतो. इतरांची पुढे जी उत्पत्ति होते, आवश्यक नस तांना ती कामामुळेच झाली असे होऊन, अशा पुत्रांना ‘कामज’ म्हणजे निर्माण झालेले असे म्हणतात. ज्येष्ठ मुलगा उत्पन्न झाल्यानेच तो गृहस्थ पुत्रवान होतो. गृहस्थाश्रम पूर्ण होतो. तो ज्येष्ठ पुत्र पुढच्या वंश वृद्धीला कारणीभूत होत असल्यामुळे तोच त्याचा उत्तराधिकारी होतो. त्याच्या जिंदगीचा तोच अधिकारी असतो. या प्रमाणावरून एकाखेरीज झालेले अधिक पुत्र कामज होत असे सांगून कामवशतेचा निषेध केला आहे. प्रजातंतुं मा व्यवच्छेत्सीः || प्रजातंतूचा उच्छेद करूं नये एवढेच श्रुतीचे सांगणे आहे.

श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविद्याच्छोश्रमानं महीयते ।

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥

या वैदिक आशीर्वाद पद्धतीत बहुपुत्रलाभः’ असे एक पद आहे. मनूच्या बचनाचा व या आशीर्वादाचा मध्यबिंदु साधावयाचा म्हणजे कामात्मता खल्वपि न प्रशस्ता ” या वाक्याची आठवण होते. इथे स्त्रीवश व कामवश होऊन वागू नये, असा पाहिजे तर अर्थ काढावा. कामज पुत्रांच्या उल्लेखाच्या पुढच्या श्लोकांतच बहुपुत्रांचा उल्लेख आला आहे.

पितेव पालयेत्पुत्राञ्ज्येष्ठो भ्रातृन्यवीयसः । पुत्रवथापि धर्तेरज्ज्येष्ठे भ्रातरि धर्मतः ॥ (९।१०८)

—पित्याप्रमाणे आपल्या भावंडांचे वडील भावानें पोषण करावें व पुत्राप्रमाणे त्या भावंडांनी त्याच्याशी वागावें. या श्लोकांत बांटा यावा असे सांगितले नाही. पुढच्या १११ व्या श्लोकांत याचा कांदी उल्लेख सापडतो.

एवं सह वसेयुर्वा पृथग्वा धर्मकाम्यया । पृथग्विवर्धते धर्मस्तस्माद्धयि पृथक्रिया || ( ९-१११ )

मोठा भाऊ जर चांगला असला, भावजयहि जर चांगली असली तर सर्वांनींहि एकत्र राहावें हें उत्तम. तसें नसल्यास धर्माच्या सदुद्देशानें बाटलें तर वेगळेहि व्हावें. वेगळे राहून धर्मानुष्ठान तशा प्रसंगी वाढतें. वेगळे झाले म्हणजे कुलधर्म कुलाचार वेगवेगळे करावेत. पृथक् पृथक् पंचमहायज्ञादिकांचे अनुष्ठान करावें.

एकपाकेन वसतां पितृदेवद्विजार्चनम् । एकं भवेद्विभक्तानां तदेव स्याद्गृहे गृहे ॥ (बृहस्पतिः ) 

वाटणी न होतां, एकच स्वयंपाक असतांना ‘पितृदेवद्विजार्चन ‘ एकट्या वडील भावानेंच करावें. पण चांटणी झाली म्हणजे मात्र प्रत्येकानें तेंआपापल्या घरीं वेगवेगळे करावें.

नान्योत्पन्ना प्रजास्तीह न चाप्यन्यपरिग्रहे । न द्वितीयश्च साध्वीनां क्वचिद्भुतपदिश्यते ॥ (मनु. ५|१६२)

–विधिनियमाला अनुसरून शास्त्रोक्त विवाहित अशा एका पती शिवाय परपुरुषापासून झालेली कोणतीहि प्रजा त्या स्त्रीची प्रजा होत नाहीं. तशाचप्रमाणे उक्त नियमानुसार शास्त्रोक्त विवाहित अशा एका स्वपत्नी शिवाय परस्त्रीपासून झालेली कोणतीहि प्रजा त्या पुरुषाची प्रजा होत नाही. पुनर्विवाहाने वंशान्वय कसा राहील ? या श्लोकांतल्या उत्तरार्धानें पुनर्विवाहाचा निषेध केलेलाहि आढळतो. कोणत्याहि दृष्टीनें, कोणत्याहि ग्रंथांतून कधीहि साध्वी स्त्रीला अन्य पतिपरिग्रह, अन्य भर्ता सांगितलेला नाही. कोणतीहि स्त्री व्याभिचारानें जशी तशीच पुनर्विवाहानें साध्वी ठरत नाही, असा या श्लोकांत मनुनें स्पष्ट अभिप्राय दिला आहे, हें ‘साध्वी’ या शब्दावरून स्पष्ट होतें. घटस्फोटाचा कायदा करून स्त्रियांना स्वैर केल्यासारखे होतें व पुनर्विवाहाचा कायदा करून स्त्रियांना व्यभिचारिणी बनविल्यासारखे होते. ब्राह्मणांतून च काय पण कोणत्याहि जातींतून असे होणें अनिष्ट आहे, समाजघातक आहे. याने समाज पशुवृत्तीचा बनतो, नीतिभ्रष्ट होतो. अशा पुरुषांचे प्रेमहि स्थायी आणि खरें नसते. त्यांच्यात अनन्यता नसते. चवचाल स्त्रीबरोबर केलेला संसार कोणाला सुखावह होऊ शकतो ! ती मुले कोणाची म्हणून मानली जातलि ! बाप म्हणून कोणाला त्यांनी पिंडपाणी द्यावें ? कोणाच्या उत्पन्नाचे ते अधिकारी होतील ! त्या मुलांत कोणाला प्रीति उरेल ? थोडक्यांत जबरीचा असा एक कायदा झाला तर प्रतिकुटुंबाचे शीलच नष्ट करणे होय व भावी पिढीला नीतिभ्रष्ट बनविणें होय. असेच झाले तर पुढे ब्राह्मणाचीच काय कोणतीच शुद्ध जात राहणार नाही. अशा नीतिभ्रष्ट प्रजेला ना इह ना पर; साऱ्यांचीच इहपराची बोळवण होते. या संदर्भानें ‘दो दिवसांची जाइल सत्ता अपेश मायां घेउ नको’ असे प्रेमाच्या चळवळीने सांगण्यापलीकडे आतांच्या कायदेकारी मंडळांना आणि मंत्र्यांना अधिक कोणते सांगण्यास काही सुचतच नाही !

home-last-sec-img