Literature

सतीपतींतील मूलग्राही तात्त्विक दृष्टी

प्रपंचाच्या विस्ताराकरितां गृहस्थाश्रमाच्या वाससेनें परमात्म्यानेंच आपल्या प्रकृतिपुरुषात्मक, स्त्रीपुरुषांचें रूप धारण केलें. शतरूपा आणि मनु यांची जोडी प्रथम निर्माण झाली असल्यामुळे तिचींच पुढे भावी पतिपत्नींचौँ अनेक युग्मरूपें झाली. अखंड असलेलेंच दोन भाग होऊन त्या दोन भागांच्या एकत्रीकरणानेंच पुन्हां एक पूर्ण भाग होण्याच्या या नियमानुसार अखंड एक असलेलें परमात्मस्वरूप पतिपत्नींच्या रूपानें दोन भाग होऊन, त्या दोन भागांच्या एकीकरणानेंच एक त्यांचें संपूर्ण रूप होते. पतिपत्नी हे एका देहाच्या वामदक्षिण भागाप्रमाणे अन्योन्य आहेत. या मूलग्राही तात्त्विक दृष्टीचा विचार करूनच प्रवृत्तिमार्ग हा आंखला गेला. परमात्म्याच्या ऐक्यज्ञानानें सतीपतींना प्रवृत्तिमार्ग हा त्यांच्या मोक्षाला कारण व्हावा म्हणून त्यांत सतीपतींतून एकात्मता निर्माण केली, एकदेहन्याय सांगितला. स्त्रीला ‘बामा’, ‘द्वितीया ‘ अशी नावे आहेत. या दोन नांवांच्या उच्चारावरूनच पूर्वीचे सर्व विवरण लक्षांत येईल. अर्धो वा एष आत्मनो यत्पत्नी | पतीचा वामभाग सती होते. प्रतीपदर्शिनी वामा वनिता महिला तथा । पत्नी पाणिग्रहीती च द्वितीया सहधर्मिणी ।। (अ. द्वि. कां.) या दृष्टीनेंच अन्योन्यस्याव्यभीचारो भवेदा मरणान्तिकः । एष धर्मः समासेन ज्ञेयः स्त्रीपुंसयोः परः ॥ (मनु. ९/१०)

गृहस्थाश्रमांत पतिपत्नींची अनन्यता आमरणांत असली पाहिजे व हाच संक्षेपतः स्त्रीपुरुषांचा मुख्य धर्म म्हणून मनूचे सांगणे आहे. तात्विक दृष्टीनेहि मनूच्या आज्ञेप्रमाणेहि पतिपत्नींचा अन्योन्यसंबंध एका देहाच्या दक्षिणवाम भागाप्रमाणें अविभाज्य आहे, हे समजून आलें असतां कोणता विचारी मनुष्य पुनर्विवाहाला संमति देईल; शास्त्रविरुद्ध विजातीय विवाहाला अथवा असवर्ण विवाहाला तयार होईल व तशा प्रकारचे कायदे करील ! • एका देहाचे दक्षिणवाम भाग दुसऱ्या एका देहाचे दक्षिणवाम भाग जसे होणार नाहीत त्याचप्रमाणे एका स्त्रीपुरुषदेहाच्या दक्षिणवाम भागाचे पुरुष-पत्नी दुसऱ्या एका पुरुष-स्त्रीदेहाचे दक्षिणवाम भाग म्हणजे पतिपत्नी होणार नाहीत. हा मनुष्यप्राण्यांचा संबंध दाखविणारा तात्त्विक विचार आहे.

अशनापिपासे एवाभिविज्ञानम् । या उपनिषद – वाक्यानुसार भोगयोनी असलेल्या मनुष्येतर प्राण्यांना हा नियम नाहीं. मोक्षप्राप्तीला कारण असणारा विचार त्यांना नसल्यामुळे मनुष्यच विवेक विचारद्वारा मोक्षाला पात्र होत असल्यामुळे या तात्त्विक विचाराचे आचरण सर्व मनुष्यांनाच अत्यावश्यक आहे. हा मानवधर्म म्हणून म्हटला जातो.

अयं द्विजैर्हि विद्वद्भिः पशुधर्मो विगर्हितः । मनुष्याणामपि प्रोक्तो वेने राज्यं प्रशासति ॥ (मनु. ९|६६)

या श्लोकांत एका स्त्रीला दुसरा पति होणे हा मनुष्यधर्म नसून पशुधर्म आहे असे मनूचे सांगणे आहे. पूर्वी हा प्रकार नव्हता. अधार्मिक वेन राजाच्या कालापासून हा पशुधर्म मनुष्यांत प्रविष्ट झाला. याला अनीतीमान, अधार्मिक वेन राजाच कारण होय. विवेकविचारयुक्त मनुष्य अशा तऱ्हेचा पशुधर्म आचरूं लागला तर तो पशुतुल्यच होतो असें वरील श्लोकावरून स्पष्ट होतें. मनुष्यामध्ये या पशुधर्माचा म्हणजे पुनर्विवाहाचा प्रचार व आचार कायद्यानें करण्याची प्रवृत्ति म्हणजे मनुष्यांना पशुतुल्य करण्याचा खटाटोपच होय, मनूच्या लोकावरून व विचारावरून लक्षांत येईल. त्या त्या ऋषींची संतत त्या त्या गोत्रावरून ध्यानांत येते. भारतवर्षांत त्या त्या गोत्रद्वारां एकेक अविच्छिन्न परंपरा चालत आली आहे. पुनर्विवाहानें, असवर्ण विवाहानें ब्राह्मणांतील ही ऋषि परंपरा नष्ट होते. हा वर्णसंकर संकरो नरकायैव । म्हटल्याप्रमाणें नरकाला कारण आहे. नरकापेक्षां याच्यापासून दुसरा कोणताहि लाभ एरवीं दिसून येणार नाही. नाही म्हणावयाला यापासून दुष्ट प्रजेचा एक दुसरा भरपूर लाभ मात्र होईल !

इतरेषु तु शिष्टेषु नृशंसानृतवादिनः । जायन्ते दुर्विवाहेषु ब्रह्मधर्मद्विषः सुताः ॥ (मनु. ३|४१)

– शास्त्रोक्त विवाहाचा त्याग करून बाकीच्या निंद्य विवाहानें क्रूर, अनृतवादी, वेदविद्वेषशील, धर्मद्वेषी प्रजा होते. अनिंदितैः स्त्रीविवादैरनिंद्या भवति प्रजा । निंदितैनिंदिता नॄणां तस्मानिंद्याविवर्जयेत् ॥ (३-४२ )

–अनिंदा कुमारिकेशीं विध्युक्त झालेल्या विवाहानें सर्व दृष्टीनेह अनिंद्य प्रजा निर्माण होते. निंद्य कुमारिकेशीं अविधियुक्त झालेल्या वा निंद्यच प्रजा निर्माण होते. या कारणानें निंद्य कुमारिकेशीं अविधीनें कहि विवाह होऊं नये. समाजशास्त्रज्ञ, प्रजाहितदक्ष मंत्री, पुढारी इत्यादि या श्लोकाचा अवश्य विचार करतीलच.

गुरुणानुमतः स्नात्वा समावृत्तो यथाविधि । उद्वहेत द्विजो भार्या सवर्णी लक्षणान्विताम् ॥ (३-४) 

सांग वेदाध्ययनानंतर गृहस्थाश्रमाकरितां आचार्यांची अनुज्ञा घेऊन सवर्णाच्या सुलक्षण कन्येशी विवाह करावा.

असपिंडा च या मातुरसगोत्रा च या पितुः । सा प्रशस्ता द्विजातीनां दारकर्मणि मैथुने ॥ (३-५) 

–मातृकुलोत्पन्न, पितृगोत्रोत्पन्न वधु निषिद्ध होय. सगोत्र निषेधाचा हा श्लोक आहे.

हीनजातिस्त्रियं मोहादुद्वहंतो द्विजातयः । कुलान्येव नयन्त्याशु ससन्तानानि शूद्रताम् ॥ ( ३ | १५ )

— मोहानें हीन जातीच्या मुलींशीं ब्राह्मणानें विवाह केला तर तें सर्व कुल, संतति शूद्रत्वाला प्राप्त होते. 

शूद्रां शयनमारोप्य ब्राह्मणो यात्यधोगतिम् ।जनयित्वा सुतं तस्यां ब्राह्मण्यादेव हीयते ॥ (३।१७ ) 

दैवपित्र्यातिथेयानि तत्प्रधानानि यस्य तु । नाश्र्नन्ति पितृदेवास्तन्न च स्वर्ग स गच्छति ॥ (३।१८) 

—सवर्ण वधूशीं विवाह न करतां शूद्रिणीशी विवाह करून तिच्याशी रमूं लागला तर तो ब्राह्मण अधोगतीस पोहोचतो, म्हणजे त्याला नरक प्राप्त होतो. तिच्यापासून पुत्र झाला तर ब्राह्मण्यापासूनच तो च्येवतो. त्याचें ब्राह्मणत्व नष्ट होतें. हीन जातीच्या स्त्रीशी विवाह केला तर ती अर्धांगी म्हणून देवापतृ कायाँत बरोबर बसूं शकत नाही, ब्राह्मण अतिथीस वाढू शकतहि नाही. (तिच्या हातच्या) हव्यकव्यांचा देवापतर स्वीकार करीत नाहींत. पुढें श्राद्धहि बंद पडतें. पितरांना पिंड लाभत नाही. अतिथि, इष्टमित्रसुद्धा त्याचें घर वर्ज्य करतात. अशा रीतीनें सर्व सक्रियांचा लोप होतो. तोहि पण हीन व निंदित होतो. पातित्यामुळे त्याला व त्याच्या पितरांना स्वर्ग मिळत नाही. पितरांसह स्वतःहि

असला मनुष्य नरकांत पडतो. याने काय साधले! ना इह ना पर. संकरो .नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिडादकक्रियाः ॥ ( भ.गी. १ ४२) प्रजेच्या दृष्टीनेहि संकराची प्रजा आपलें गोत्र कोणते •म्हणून सांगेल ? कोणत्या पितरांना पिंड देईल ? कोणत्या कुलाचा अभिमान घरलि ? बहुतेक अशी प्रजाहि भ्रष्ट आचरणाचीच असते. ‘बाप से बेटा सवाई ही म्हण अशांच्या बाबतीत अधिक लागू पडते !

home-last-sec-img