Literature

सत्याची महत्ता

सत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः । 

सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनावाप्यते परम् ७( वा. रा. अ. स. १४)

सत्य हेंच एक मुख्य ब्रह्मपद आहे. या एका सत्यातच सर्व धर्म प्रतिष्ठित आहे. अक्षय्य वेदांचें हें सत्यच एक स्वरूप होय. अविनाशी वेद या एका सत्याचेच प्रतिपादन करीत आहेत. सर्वश्रेष्ठ मोक्षहि पण या सत्यानेंच प्राप्त होतो. हे कैकेयांचे वचन पाहिले तर, ती एक सामान्य स्त्री म्हणून म्हणतां येणार नाहीं. अशा जाणत्या स्त्रीच्या तोंडून पतिविरुद्ध अशीहि वचने निघावीत, याचा अर्थ केवळ दैवी विलासच एक होय.

home-last-sec-img