Literature

सप्तपदी

पतिभक्तिरता नित्यं क्रीडिष्यामि त्वया सह । त्वदन्यन्न नरं मंस्ये तृतीये साब्रवीदियम् ॥ 

यज्ञे होमे च नादौ भविष्यामि त्वया सह । धर्मार्थकामकार्येषु वधू षष्ठे पदे वदेत् ॥ (सप्तपदि )

सप्तपदीच्या वेळी हे श्लोक म्हणण्याची कुठे कुठे पद्धत आहे. कुठे कुठे म्हटलें नाहीं तरी तत्त्व हें अव्यभिचरित असतें या न्यायाने ते श्लोक येथे देतो. मागच्या विषयाच्या ओघानें तिसऱ्या व साहाच्या पाउलांत म्हणावयाचे श्लोक इथे बरोबर लागू पडतात म्हणून ते प्रथय देतो. ‘ प्रतिभक्तिपरायण होऊन तुझ्याबरोबर मी रममाण होईन. तुझ्याशिवाय अन्य पुरुषाची मनांतहि भावना करणार नाही. यज्ञ, होम, दानादिकांतहि धर्मार्थकामादिकांतहि मी तुझी सहधर्मचारिणी राहीन.’ जांवयानें सासऱ्याला वचन दिल्याप्रमाणे वधूनें वराला असें वचन दिलेलें असतें.

एकंदर हे सात श्लोक आहेत. ‘ प्रथमपदे’, द्वितीयपदे’ असा यांचा अनुक्रम आहे. त्यांच्या योगानें आदर्श वधूची लक्षणे व तिचा जीवनक्रम स्पष्ट होतो. सप्तपदींत वधूनें बराला आत्मसमर्पण करण्याचा क्रम आहे.

धन धान्यं च मिष्टान्नं व्यंजनाद्यं च यद्गृहे । मदधीनं च कर्तव्यं वधूराद्ये पदे वदेत् ॥ १ ॥

कुटुंबं रक्षयिष्यामि सदा ते मंजुभाषणी । दुःखे धीरा सुखे दृष्टा द्वितीये साब्रवीद्वचः ॥ २ ॥ 

लालयामि च केशान्तं गंधमाल्यानुलेपनैः । कांचनैर्भूषणैस्तुभ्यं तुरीये सा पदे वदेत् ॥ ४ ॥

आर्ते आर्ता भविष्यामि सुखदुःखविभागिनी | तवाज्ञां पालयिष्यामि पंचमे सा पदे पदेत् ॥ ५ ॥ 

अत्रान्ते साक्षिणो देवाः मनोभावप्रबोधिनः । पचनं ते करिष्यामि सप्तमे सा पदे वदेत् ॥ ७ ॥

१. धनधान्य मिष्टान्न, लोणची आदि व्यंजनपदार्थ घरी असलेले माझ्या आधीन असतील तर ते व्यवस्थित ठेवून वेळोवेळी तुझ्या आज्ञेप्रमाणे त्यांचा योग्य उपयोग भी करीन.

  • जमाखर्च बरोबर ठेवून अत्यति अतिमिति कंजुषपणा किंवा उपोषणा यांपैकी काहीहि न करता प्रसंगानुसार मी शहाणपणाने वागेन असे प्रथम पदी वधू म्हणते.

२. मी केव्हांहि मधुरभाषणी राहून कुटुंबाचे रक्षण करीन. संसारांत येणान्या सुखदुःखप्रसंगी दुःखप्रसंगी दुःखी न होता धैर्यानें राहीन, सुखप्रसंगी संतुष्ट राहीन. अधिकाराची आशा न करतां व गर्वानेने कधी फुगून जाणारा नाही. गृहकृत्यांत दक्षतेने वागेन, असे द्वितीयपदी वधू म्हणते.

४. स्वच्छतेनें वागून वस्त्राभरणानें व गंधमाल्यादिक सुगंध-द्रव्यादिकांनी केश व सर्व देह श्रृंगारून पाहिल्याबरोबर तुला आनंद होईल असें मी बागेन योग्य उपचारांनी तुझ्या देहाचे रक्षण करीन. सर्व प्रकारांनी माझ्या देहाचे रक्षण करून नेहमी तुला अनुकूल असेच मी वागेन, असें चतुर्यपदी वधू म्हणते.

५. तुझ्या संकटकाली मी सुद्धा तितकीच कष्टी होईन. तुझ्या सुख दुःखकाळी तुझ्या सुखदुःखाची समभागिनी होईन. तुझी आज्ञा पालन करीन. असे वधू वराला पंचमपदी म्हणते.

७. मनोभाव उत्पन्न करणारे देवच या माझ्या वचनांना साक्षी आहे आंत एक बाहेर एक असे माझे बोलणें नाहीं, हे यावरून स्पष्ट होईल. केव्हांहि वंचना करणार नाहीं व सदा तुझ्या वचनांत वागेन. असें सप्तम पद वधू वराला वचन देते. याप्रमाणे तिघेंहि विवाहांत वचनबद्ध असतात. विवाहामुळे या तिन्ही माणसांची वचनें नष्ट होतात.

सप्तपदत म्हणावयाचे दुसरे वैदिक मंत्रहि आहेत ते यापुढे देतो.

एकमिषे विष्णुस्त्यान्वेतु ॥ द्वे ऊर्जे विष्णुस्त्वाम्बेतु ॥ श्रीणि व्रताय विष्णुस्त्यान्वेतु || चत्वारि मयोभवाय विष्णुस्त्वान्वेतु || पंच पशुभ्यो विष्णु स्त्वान्येतु ॥ षष्ठाय स्पोषाय विष्णुस्त्वान्वेतु || सप्त सप्तभ्यों होत्राभ्यो विष्णुस्त्वान्वेतु । सप्तमापदमुपसंगृह्य जपति सखायः । सप्तपदा अभूम । सख्यन्ते गमेयम् । सख्यात्ते मायोषं । सख्यास्ते मायोष्ठः ॥

हे वैदिक मंत्र होत. ‘विष्णुस्वान्येतु’ म्हटले जाते, यांतूनहि वधू बराच्या ठिकाणी लक्ष्मीनारायणाची भावना दिसून येते.

home-last-sec-img