मनुष्यांचे अनिष्ट संस्कार व अनिष्ट गुण जाऊन सर्वतोपरी त्याला व इतरांना त्याची उपयुक्तता अधिक होण्यासाठी त्यावर संस्कार करावयाचे असतात. संस्काराचा उद्देश हाच आहे. ऐहिक तशा पारमार्थिक उन्नतीकरितांच हे संस्कार करावयाचे असतात. आर्य संस्कृतीत याच दृष्टीनें सोळा संस्कार सांगितले आहेत. गर्भाधानापासून प्रारंभ होऊन अंत्येष्टीपर्यंत या सोळा ‘संस्कारांची व्याप्ति आहे. सोळा संस्कार कोणते ते आपण पाहूं.
( १ ) गर्भाधान, (२) पुंसवन, ( ३ ) सीमन्तोन्नयन, ( ४ ) जात कर्म, ( ५ ) नामकरण, ( ६ ) विक्रमण, (७) अन्नप्राशन, ( ८) चूडाकर्म आणि कर्णवेध, (९) उपनयन, (१०) मेधाजनन, (११) महानाम्नी, ( १२ ) महाव्रत, ( १३) उपनिपत्त्रत, (१४) समावर्तन, (१५) विवाह, ( १६ ) अंतेष्टि. सकळ वैगुण्य दूर करून अखिल उपयुक्तता जविांतून उत्पन्न करण्याकरितां त्याचा इहपरमार्ग अत्यंत पवित्र व अतिशय सोज्वळ करण्या करितां, भोवतालच्या वातावरणाच्या शुद्धीकरितां, जीवाला दैवी साहाय्य मिळण्याकरितां जीवाचें देहमन पवित्र होण्याकरितांच हे संस्कार आहेत, हें प्रत्येकानें लक्षांत ठेवावें. अलीकडे इकडे समाजाचें फारच दुर्लक्ष होत आहे.
देहाची शुद्धि होऊन त्याचा मनाच्या पवित्रतेकरितांहि उपयोग होईल व देवतांची कृपाहि होईल, अशा द्रव्याचा या संस्कारांत उपयोग केला जातो. याच दृष्टीनें बाह्य नियमांची यांत योजना केलेली असते. सर्वांत मुख्य म्हणजे वेदमंत्रांचा यांत उपयोग केला जातो. या दिव्य बेदमंत्रांच्या स्वरसहित उच्चाराने वातावरण दिव्य होतें, पचित्र होतें, मंगलमय होतें.
पुंसवन संकल्पच पाहाना. यांत किती उदात्त हेतु दिसून येतो. “देश कालादिकीर्तनान्ते ममास्यां भार्यायामुत्पत्स्यमा नगर्भस्य गार्भिकवैजिक दोषपरिहारपुंरुपतासिद्धिज्ञानोदयप्रतिरोधपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थे पुंसवनमनवलोभनं ममास्यां भार्यायां गर्भाभिवृद्धिपरिपंथिपिशित रुधिरप्रिय ऽ लक्ष्मीभूतराक्षसीगणदूरनिरसनक्षेमसकलसौभाग्यनिदानमहा लक्ष्मीसमावेशनद्वारा…” इत्यादि यांत काय आलें नाहीं ? बीजगत गर्भगत दोषांची निवृत्ति, ज्ञानोदयाच्या प्रतिबंधांची निवृत्ति, परमेश्वरप्रीति, दुष्ट ग्रहांची व शक्तींची निवृत्ति, सकल सौभाग्यनिदान, महालक्ष्मीची इतके सर्व उद्देश यांत आहेत. [१] गर्भाधान – गर्भाधानं द्विजः कुयाइतौ प्रथम एव हि । चतुर्थ दिवसा दूर्ध्व पुत्रार्थी दिवसे समे ॥ (लघु आश्वलायन ३|१). [२] पुंसवन– कुर्यात्पुंसवनं मासि तृतीयेऽनवलोभनम् । सीमन्तोन्नयनं चैव चतुर्थे मासि तद्भवेत् ।। (४।१ ). [३] जातकर्म-जाते सुते पिता स्नायान्नांदीश्राद्धं विधानतः । जातकर्म ततः कुर्यादैहिकामुष्मिकप्रदम् ॥ (५१). [४] नामकरण — अहन्येकादशे कुर्यान्नामकर्म विधानतः । कृत्वाभ्युयिकं श्राद्धं द्वादशे षोडशेऽपि वा || (६।१ ). [५] निष्क्रमण मासे चैवं चतुर्थे तु कुर्या निष्क्रमणं शिशोः । कृत्वाऽऽभ्युदधिकं श्राद्धमादायाङ्के शिशुं पिता || (७१). [६] अन्नप्राशन- षष्ठेन्नप्राशनं कुर्यान्मासे पुंस्यष्टमेऽथवा । दशमे द्वादशे मास केचिदेवं वदन्ति हि || (८११). [७] चौलकर्म–तृतीये वत्सरे चौलं बालकस्य विधीयते । शुभे चैव दिने मासि विहितं चोत्त रायणे ॥ (९।१ ). [ ८ ] उपनयन ब्राह्मणस्याष्टमे वर्षे विहितं चोपनाय नम् । सप्तमेन्वाथवा कुर्यात्सर्वाचार्यमतं भवेत् ॥ (१०|१). [९] महा नाम्न्यादि व्रतत्रय –महानाम्नीव्रतं कुर्यात्पूर्णाब्दे चोत्तरायणे । शुक्लपक्षे शुभेह्नि स्यादुपनायनवच्च हि ।। महाव्रतं द्वितीये तु भवेत्तत्पूर्ववञ्च हि। संपूर्णे च तृतीयेऽद्वे तथा चोपनिषद्वतम् ॥ (११११-२). [१०] उपाकर्म
श्रवणे स्यादुपाकर्म हस्ते वा श्रावणस्य तु । नो चेद्भाद्रपदे वाऽपि कुर्याच्छिष्यैः गुरुः सह ॥ (१२]१). [११] उत्सर्जन उत्सर्ग च द्विजः कुर्यात्षण्मास इदमादितः। दाढयर्थं च हितं चैतदधीतानां च छंदसाम् ॥ (१३।१). [१२] गोदान–गोदानं षोडशे वर्षे कुर्यात्तदुदगायने । केचिद्विवाहकाले च शुभे मासि वदन्ति हि ॥ (१४|१). [१३] विवाह — वेदानधीत्य वेदौ वा वेदं वापि यथाक्रमम् । अविप्लुतब्रह्मचर्यो गृहस्थाश्रममावसेत् ॥ (मनु. ३२). गुरुणानुमतः स्नात्वा समावृत्तो… कुलजां सुमुखीं स्वाड:गीं सुवासां च मनोहराम् । सुनेमां सुभगां कन्यां निरीक्ष्य वरयेद्बुधः।। (लघु आश्व. १५/२). स्नातकाय सुशीलाय कुलोत्तमभवाय च । दद्याद्वेदविदे कन्यामुचिताय वराय च ( १५/३).
अशुद्ध मनाच्या योगें दिसून येणारी अनीति व अनर्थ कुठेहि दिसून येऊं नयेत व असू नयेत म्हणून जन्मदात्या मातापित्यांना त्यांच्याहि जन्मा पूर्वीपासून शुद्ध करीत. त्याच्या मुलाच्या जन्मापूर्वीच पुन्हां त्यांना गर्भादान, पुंसवन इत्यादि संस्कारांनी पवित्र करून जन्माला येणाऱ्याला संस्कारानें अकृत्यापासून, अनीतिपासून, अधर्मापासून व अनर्थापासून वारण्याचा आर्य संस्कृति किती पूर्वीपासूनच प्रयत्न करते हैं यावरून स्पष्ट होईल.