Literature

स्त्रीपुरुषांचा एकदेह्न्याय

दक्षिणवामांगाच्या अन्वयाप्रमाणें श्रीपुरुषांचा अन्वय एकदेहन्यायवत् सदा अष्ट असतो. त्रियुक्त विवाहाने प्राप्त झालेली अर्धांगीच त्याची पत्नी म्हणून म्हटली जाते. गृहस्थाश्रमांत संतति हाच प्रधान हेतु असतो. धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ गृहस्थाश्रमाचे मुख्य घटकावयव आहेत. अर्धांगवायूच्या योगानें अधे अंगच कामांतून जाते, त्याच्याकडून कोणतेंहि काम करून घेण्यास होत नाही. त्याचप्रमाणे अर्धांगवायूमुळे स्त्री-पुरुषात्मक कोणतेंहि अंग नाहीसे झाले तरी प्रवृत्तिधर्म तिथेच संपून उरलेल्या अधोगाप्रमाणे एक मोक्षमार्गच अनुसरणीय होतो. पतिनिधनानंतर सती, सतीनिधनानंतर पति यांनी प्रवृत्तिमार्ग सोडून, निवृत्तिमार्गाचें अवलंबन करून, मोक्षाकरितां प्रयत्न केला पाहिजे म्हणून शास्त्र सांगते. वंशाला कोणी पुढें नाहीं असें झाल्यास वंशवृद्धीकरितां ( वंश पुरुषापासूनच चालत असल्यामुळे) पुरुषाला दुसऱ्या लग्नाची अनिर्वाह प्रसंगी परवानगी आहे. पूर्ण ज्ञान-चैराग्याच्या माणसाला तोहि निर्बंध बंधक नाहीं.

home-last-sec-img