Literature

हिंदू संस्कृती

प्रचलित असलेल्या व नामशेष झालेल्या सर्व संस्कृतीपेक्षांहि ही हिन्दु संस्कृति अति प्राचीन आहे. केवळ आपल्या एका सत्त्वबलानेच आजपर्यंत तिन आपले अस्तित्व टिकविले आहे. कांहीं आंधळे हत्तीची माहिती मिळविण्यास गेले असतां, त्यांच्या हाताला लागलेला एकेक अवयव हाच हत्ती म्हणून भांडू लागल्याप्रमाणे या आर्य संस्कृतीचा एकेक सिद्धांत उचलून धरून, भिन्नाभिन्न संप्रदायप्रवर्तक हीच मुख्य आर्य संस्कृति म्हणून भांडूं लागले व त्यांनी आप आपले संप्रदाय वेगवेगळे केले. पुढे पुढे यांच्यांतहि फाटाफूट होऊन पुष्कळ मतें-मतांतरें निर्माण झाली. अनेक फाटे फुटले. अशा या अनेक शाखोपशाखांनी एकच एक आर्य अथवा हिन्दु संस्कृतीचा हा विशाल वृक्ष बाढून चोहीकडे फोफावला आहे ही यथार्थ भावना या पक्षोपक्षांत नसल्या मुळे ते विनाकारण आपापल्यांत द्वेषमत्सर वाढवून उगीचच अशांतता निर्माण करतात, कढतात आणि कुढतात. अंतःकलहामुळे व तसेच परकीयांच्या अनेक आघातांमुळे, पाहिजे तितकी ही संस्कृति जगभर जरी पसरली नसली तरी आपल्या विभूतिमत्वानें व माहात्म्याने ती आजहि विश्वमान्य आहे व सुदृढ आहे.

home-last-sec-img