Literature

अग्नि हा देवतांचे मुख होय

अग्निहिं देवानां मुखम् । (शतपथ ब्रा. ३ ७ )

अग्नीमध्ये आहुति घातल्या असतां देवतांची तृप्ति होते. अग्नि हेंच देवतांचें मुख होय असे वेदांचे सांगणे आहे. क्षुधा, पचन हें सर्वहि अग्नीच्या योगानेंच होतें अर्से असल्यानें बाह्याग्नीत टाकलेली आहुति आधिदैविक दृष्ट्या सर्व देवतांना पोहोंचते. सर्वांचा जठराग्नि या बाह्याग्नीचा अंशच होय. मुळांशी पाणी घातले तर तें सर्व शाखोपशाखांना पोहोंचतें त्याप्रमाणें बाह्यानींत दिलेली आहुति सर्वांच्या जठराग्नीस पोहोंचते. त्या त्या देहाच्या नांवानें अग्नींत समर्पण केलेल्या आहुतीनें त्या त्या देहांत असणाऱ्या जठराग्नीला त्या आहुति तृप्तीकर ठरतात. याशिवाय वायुरूप सूक्ष्म शरीरधारी देवता, पितर हे कुंडगत अग्नीत आविर्भूत होऊन हव्यकव्यांचा स्वीकार करतात.

ये निखाता ये परोप्ता ये दग्धा ये चोद्धिताः । 

सर्वास्तानग्न आवह पितॄन् हविषे अत्तवे ॥(अथर्व. १८-२-३४)

–अनेक कारणांनी पुरलेल्या, दहन केलेल्या, वेड लागून व मारणादि प्रयोगांनीं मृत झालेल्या सर्व पितरांना या कव्यानें तृप्त होण्याकरितां ‘हे अग्ने, तूं त्यांना बोलाव’ असा या मंत्राचा भावार्थ आहे. देवतांच्या प्रीत्यर्थ दिलेल्या हविगाला ‘हव्य’ आणि पितरांप्रीत्यर्थ दिलेल्या हविगाला ‘कव्य’ असें म्हणतात, हें सर्वांना माहीतच आहे. देवतांना आहुति घालावयाची झाल्यास ‘स्वाहाकार’ व पितरांना आहुति द्यावयाची झाल्यास ‘स्वधाकार’ म्हणतात.

मुखादिन्द्रश्चाग्निश्च । परमात्म्याच्या मुखापासून झालेला अग्नि परमात्म्याच्या मुखकमलांतच असल्यामुळे अग्नि हें परमात्म्याचें मुख म्हणून म्हटलें आहे. तसेंच ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् । ब्राह्मण हे देखील परमात्म्याच्या मुखापासून उत्पन्न झाल्यामुळे त्यांनाहि परमात्म्याचे मुख असेंच म्हणतात. त्या त्या देवतापितरांच्या उद्देशानें ब्राह्मणांना जेवू घातलें म्हणजे त्या त्या देवपितरांच्या तृप्तीकरितां आदिभौतिकदृष्ट्या परमात्म्याच्या मुखांत हव्य कव्य अर्पण करणेंच होय, अग्नि, इंद्र, ब्राह्मण हे तिघेहि परमात्म्याचे मुख स्थानीय असल्यामुळे ब्राह्मणभोजनानें परमात्मा, अनि, इंद्र व सर्व देवदेवता तृप्त होतात. अप्रत्यक्षपणें अखिल विश्वच तृप्त होतें यांत संशय नाहीं. वेद संस्कृत विप्रमुखसुद्धां पवित्र अमिच होय. असे झाल्यास या ठिकाणी समर्पष्म केलेलें हव्यकव्य देवपितरांना पोहोंचतेंच.

विद्यातपः समृद्धेषु हुतं विप्रमुखाग्निषु । 

निस्तारयति दुर्गाच्च महतश्चैव किल्विषात् ॥ (मनु. अ. ३-९८)

–विद्या-तपादिकांनी समृद्ध असणाऱ्या ब्राह्मणाच्या मुखामींत समर्पण केलेलें अन्न हव्यकव्यरूप होऊन यजमानास अखिल पाप-तापापासून सोडवून मरणोत्तर प्राप्त होणाऱ्या नरकापासूनहि मुक्त करते. इतकेच नव्हे तर नरकांत पडलेल्या यजमानाच्या पितरांचाहि तें उद्धार करतें. मनुमहाराजांनी सांगितलेले हें वचन आहे. आपल्या स्वार्याकरितां ब्राह्मणांनी केलेलें मनसोक्त विधान तर हें नव्हे ना ?


मनुष्याचा स्थूलदेह अन्नमय असल्यामुळे, देह असेतोपर्यंत त्यास अन्नाच्या आहाराची जरूरी असते. देहपातानंतर हे पार्थिव शरीर राहात नाही. त्यावेळी स्थूल देहाला आवश्यक अशा अन्नाची जरुरी नसते, असे जरी असले तरी, अन्नाची वासना मृतपितरांना असते. इथे वंशजाकडून दिलेले अन्न त्यांना रूपांतरित होऊन म्हणजे त्यांचें अन्न होऊन त्यांना मिळते अशी परमेश्वराच्या राज्यांतील व्यवस्था आहे. ऐहिकं राज्यांत टपालाची जशी व्यवस्था असते त्याचप्रमाणें ही व्यवस्था समजावी. ज्याच्या नांवानें पत्र लिहिलें असेल त्यालाच नेमकें मिळाल्याप्रमाणे ज्याच्या नांवानें इथे पिंड अर्पण केला असेल त्यालाच तो त्यांच्या त्यांच्याकडून मिळतो. टपालाच्या मनुष्याला पैसे दिले म्हणजे कितीहि दूरच्या मनुष्याला पत्र इत्यादि मिळण्याची जशी व्यवस्था राज्यांत असते, त्याचप्रमाणें परमेश्वराच्या राज्यांत ब्राह्मणाला दिलेला शिधा अथवा जेवूं घातलेलें अन्न, नेमकें त्या संकल्पित पितरांना जाऊन


पोहोंचतें. विद्युत संदेशाप्रमाणें ( Telegram), बिनतारी तारायंत्राप्रमाणे (Wireless Telegraphy) मनःसंकल्पित विचार दुसरीकडे जाऊन पोहोंच तात व त्यांच्या त्यांच्या उद्देशाप्रमाणे त्यांना त्यांना कळतात.

स यत्तुरस्मिल्लोके भवति तदेतत्प्रेत्य भवति ।

अथ खलु ऋतुमयः पुरुषः । 

जीवित असतांना झाललें संस्कार, असलेला निश्चय, विशिष्ट देहाच्या ठिकाणी असणारा मीपणाचा अभिमान मृत्युनंतरहि असतो. जीव हा त्याच्या भावनेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे व निश्चया प्रमाणें बनतो. मनोमयः प्राणशरीरनेता । असें जीवाला उद्देशून उपनिषदां वून सांगितलें गेलें आहे. जीव हा मनोमय म्हणजे वासनामय आहे, तो वासने प्रमाणे शरीर धारण करतो व वासनेप्रमाणे शरीराला वागवितो व सर्व क्रिया करतो. देहपातानंतर सूक्ष्य देहाचें प्राधान्य असते. हा सूक्ष्म देह बासनामय असतो. वासनात्मकं मनः । वासना मनोमय असते व मन वासनामय असते. स्थूल देह नष्ट झाल्यानंतर प्राप्त होणारा आतिवाहिक सूक्ष्म देह केवळ मनोमय असतो.

home-last-sec-img