Literature

अन्य सापत्न मातांनी श्रीरामाबद्दलचे काढलेले उद्वार

श्रीराम  वनाला जाणार असे समजल्यानंतर आर्तशब्दो महाअज्ञे सर्व सापत्न मातांमध्ये हाहाकार उडाला. त्या समयी त्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दांचा विचार केला तर श्रीरामांची सहनशक्ति विवेक आणि समत्व या गोष्टी या सापत्न मातांच्या अनुभवास किती आल्या होत्या ते कळून येतें.

कौसल्यायां यथा युक्तो जनन्यां वर्तते सदा ।

तथैव वर्ततेऽस्मासु जन्मप्रभृति राघवः ॥ ३ ॥

न क्रुध्यत्यभिशप्तोऽपि क्रोधनीयानि वर्जयन् । 

क्रुद्धान् प्रसादयन् सर्वान् स इतोऽद्य प्रवत्स्यति ॥४ ॥

 ( वा. रा. अ. स. २० ) 

श्रीराम कौसल्येशी जसा सदा वागत असे त्याप्रमाणेच वाल्यादारभ्य आम्हां सर्वांशीहि तो वागत असे. सापत्न मातांच्या दृष्टीने तारतम्यभाव मुळी त्याच्यांत आजपर्यंत कधीं दिसून आला नाही. कोणी कठोर भाषण केलें तरी तो रागवत नाहीं. क्रोधाला कारण होणारी कोणतीहि वागणूक स्वतः न करतां अन्य कोणत्याहि कारणानें अथवा मुद्दाम कोणी रागावल्यासहि तो आपल्या मृदुमधुर भाषणाने त्यांचे सांत्वन करी. त्याचे ते अमृतोपम बोल ऐकून कोणाचा राग शांत झाला नाही असे अजून एकहि उदाहरण आम्हांला आठवत नाहीं.

home-last-sec-img