Literature

अभयदान

(मागे संन्यासाश्रम स्वीकाराचा उल्लेख आहे. त्याला अनुसरून असणारे ‘अभयदान’ हि पुढेंं देत आहोंं. संन्यास स्वीकाराच्यावेळींं अभयदानाचा एक विधि असतो. यात ‘अभयं सर्वभूतेभ्यो मतः सर्वं प्रवर्तते।’ सर्व भूतमात्रांना माझेंं अभय आहे, म्हणून सर्वांना अभयदान द्यावे लागते. त्यावेळींं श्रींच्या मुखातून हे अभयदानाचे श्लोक बाहेर पडले. श्रीसमर्थ संप्रदायाच्या मंत्राक्षरांइतकेच अभयदानाचे श्लोक आहेत.)

यं नत्वा मुनयश्चिरेप्सितपदं गच्छन्ति निर्विघ्नतः।
यो वै सर्वगणाधिपः प्रभुरिति ख्यातः स्वयं निर्गुणः।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।१।।
ज्याला नमस्कार करून फार दिवसांपासून इच्छिलेल्या परमपदास मुनी निर्विघ्नतेने पोहोंंचतात, जो सगुणरूपाने सर्व मायीक कार्य-समुदायांचा शास्ता आणि मायेचा महेश्वर असूनही स्वभावतः जो निर्गुण म्हणूनच प्रसिद्ध आहे, तेंं सनातन विभूरुप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आलेंं असल्यामुळे व मदभिन्न असणारेंं तेंं ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरुप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

विद्याख्या परमेश्वरी भवति या मुख्या च भूमाप्तये।
ब्रह्मैक्यं निजमूलमन्वयति यच्छिष्टं पदं प्राणिनाम्।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।२।।
ज्या आत्यंतिक भूमासुखाच्या प्राप्तीकरितांं विद्यारुपी परमेश्वरी अत्यावश्यक आहे व हिच्यामुळेंं जेंं ‘नेति नेति’ म्हणून सर्व कार्यजाताच्या निराकरणानेंं शेवटींं उरणारेंं ब्रह्मैक्यरुपी निजमूळ प्राणीमात्राला प्राप्त होतेंं तेंं सनातन विभूरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरुप असे निरंकुश अभय हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

नाम्ना श्रीधर चिन्मयो धरति यो नित्यं च मोक्षश्रियम्।
जीवानां तरणाय सद्गुरुरिति ख्यातः स्वयं शाश्वतः।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।३।।
नित्य मोक्षश्री धारण करणारा म्हणून ज्या चिन्मात्राला श्रीधर हेंं नाव प्राप्त झालेंं जो स्वतां, शाश्‍वत म्हणजे सदाच निर्विकार असून जीवांच्या उद्धाराकरिंंता म्हणून जो सद्गुरू या नावाने प्रसिद्ध झाला ते सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयाने मला समजून आले असल्यामुळेंं व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरुप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

यत्प्राप्तं सनकादिभिर्मुनिबरैः प्राप्तं शुकेनापि यत्।
यन्नित्यं ह्युररीकृतं च खलु वे ब्रह्मादिभिर्दैवतैः।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।४।।
जे सनकादि मुनिश्रेष्ठांनी मिळविलें, श्री शुकानेंंहि जे आत्मसात केले, ब्रह्मादि सर्व देवश्रेष्ठहि जेंं अगदींं उराशींं बाळगून असतात, ते सनातन विभूरूप ब्रह्मच मी असे निश्चयाने मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूपाने असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

ॐकार व्यभजच्छ्रुतिर्बहुविधा ब्रूते चतुर्धाष्टधा।
तुर्यं शुद्धमिति स्फुटं च परमं श्रीरामभद्रश्च यत्।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।५।।
श्रुतीनेंं ॐकाराचे चार, आठ इत्यादी बहुविध प्रकारानेंं, विभाग पाडून, शेवटचेंं श्रेष्ठ शुद्ध स्वरूप जेंं श्रीरामभद्र म्हणून स्पष्ट केलेंं, ते सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारेंं तेंं ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

न स्त्री नैव पुमानकाय इति यो ह्यात्मा च सर्वांतरः।
गोत्रं यस्य न लिंग मस्ति न तथा वर्णो न वा ह्याश्रमः।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।६।।
जेंं सर्वांतर आत्मस्वरुप अशरीर असल्यामुळेंं स्त्रीहि नव्हे व पुरुषहि पण नव्हे, ज्याला गोत्र, जाती, लिंगभेद, आश्रम इत्यादी मुळींंच नाहींंत, तेंं सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आलेंं असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरूप निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणीमात्रांना देत आहे.

सर्वात्मा श्रुतिरप्यहो वदति यज्ज्ञात्वा न शोकः पुनः।
सर्वोपाधिविवर्जितं भवति यच्छांतं पदं निर्गुणम्।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।७।।
ज्याला सर्वात्या म्हणून श्रुति सांगते, व ज्याचेंं ज्ञान झालेंं असता पुन्हा शोक होत नाहींं म्हणून म्हणते, सर्वोपाधिविवर्जित असून जेंं नितांत शांत व निर्गुणपद आहे, ते सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारेंं तेंं ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरुप असेंं निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

भेदाभेदविभेदशून्यमिति यन्नास्ति द्वयं यस्य वै।
सूक्ष्मात्सूक्ष्मतरं ह्यणुर्न महतो यद्वै महद्विश्रुतम्।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।८।।
ज्याला वेगळेंं असेंं काहींंच नसल्यामुळे जे द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत या भावनेंंने रहित आहे, जे सूक्ष्माहून अती सूक्ष्म असूनहि पण अणु होत नाहींं, जेंं ‘महतो महीयान’ म्हणून प्रसिद्ध आहे, ते सनातन विभूरूप ब्रह्म च मी असें निश्चयानेंं मला समजून आले असल्यामुळे व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरुप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

अज्ञानेन विभाति दुःखमिति तन्नाशाय भोगभ्रमः।
आनंदोSसि न भोगकर्म तव भो वाक्यैर्महद्भिः स्फुटम्।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।९।।
अज्ञानाने वासना उत्पन्न होऊन ती असह्य झाली असतांं होणारेंं तेंं दुःख त्या विषयाच्या भोगानेंं तरी नाहीसेंं होईल म्हणून विषयोपभोगाचा भ्रम उत्पन्न होतो. बाबा, तूंंच आनंदरूप आहेस, तुला हेंं भोगकर्म नाहींं, इत्यादि महावाक्यांनी जागेंं झालेंं असतांं जेंं आपण आहोंं म्हणून प्राणिमात्राला वाटतेंं, तेंं सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आले असल्यामुळेंं व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं निरतिशय कल्याणरुप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणीमात्रांना देत आहे.

पक्षीवापि पशुः पिशाच मनुजा, गंधर्वयक्षाः सुराः।
आब्रह्मादिपिपीलिकान्तनृषु नो नारीषु भेदः क्वचित्।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।१०।।
पशु, पक्षी, पिशाच्च, मनुष्य, गण, गंधर्व, देवांंतूनहि इतकेच नव्हे तर आब्रह्मादि पिपीलिकान्त सर्वप्राणिमात्रांंतून व अभ्यस्त अशा सर्व स्त्रीपुरुषभेदांंतूनहि ज्यामुळे वेगळेपणा म्हणून कोठेंंहि उरत नाहींं, ते सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आलेंं असल्यामुळेंं व मदभिन्न असणारेंं तेंं ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

भीरस्तु द्वितयान्न सा खलु वसेज्ज्ञानैकमात्रे शिवे।
स्वानंदे विततेSद्वये सुविमले सर्वात्मकेSरुपतः।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।११।।
भिन्नतेनेंं भीति उत्पन्न होत असल्यास खुशाल होवो! ज्या अद्वितीय, सुविमल, सर्वात्मक, ज्ञानैकमात्र, परमकल्याणरुप अशा स्वानन्दाचे ठिकाणींं त्याच्या अरूपत्वामुळें ती भीति कधींंहि उत्पन्न होणेंं शक्य नाहींं, ते सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आलेंं असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरुप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

यत्पूर्व सकलस्य भिन्नमपि नो यस्मिन्विकारः क्वचित्।
माया नास्ति न चेश जीवकलनाSविद्या न यस्मिन्मिषत्।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।१२।।
जो सर्वाद्य, ज्या ठिकाणींं भिन्नत्व आणि विकार कोठेंंहि पण आढळत नाहींंत ज्यांंत माया, अविद्या, जिवेशकलना इत्यादि रूपानेंं असणारेंं कोणतेच चलन म्हणून मुळींंच नाहींं, तेंं सनातन विभूरूप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आलेंं असल्यामुळेंं, व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरुप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

आनंदोSद्वय एक एव सततं ज्ञानैकमात्रोस्म्यहम्।
कार्यं नाSपि च कारणं किमपि वा ब्रह्मांडपिंडावपि।।
तद्ब्रह्मैव सनातनं विभुरहं ज्ञातं च यस्मादतः।
सर्वेभ्योSप्यभयं तनोमि कुशलं ब्रह्माभयं वै यतः।।१३।।
ज्ञानैकमात्र असणारा आनंदरुपी मी सदाचाच हा असा अद्वितीय आहे. ज्यांंत कार्य, कारण व पिंड, ब्रह्मांड, असे काहींंच नाहींं, तेंं सनातन विभूरुप ब्रह्मच मी असेंं निश्चयानेंं मला समजून आलेंं असल्यामुळेंं व मदभिन्न असणारे ते ब्रह्म अभयरूप असल्यामुळेंं, निरतिशय कल्याणरूप असे निरंकुश अभय, हा मी सर्व प्राणिमात्रांना देत आहे.

लेखनकाळ दिनांक : २९-१०-१९४२

home-last-sec-img