Literature

अवतारी पुरुषाचा उदय

ह्या भारतीय पुण्यभूमीत सर्वच जन्मास येतात. अवतारी व सामान्य जन हे सर्व या पवित्र भूमीत जन्मली तरी प्रत्येकाच्या जीवनात फरक असतोच. सामान्यांच्या आचरणात पूर्वकर्म दृग्गोचर होत असते. मागील जन्मी देहसुखासाठी केलेल्या कर्माचे फळ म्हणूनच ते हा जन्म घेतात. महात्म्यांचा जन्म सर्व सामान्या प्रमाणे होत नाही म्हणजेच देहसुखासाठी त्यांचा जन्म नसतो. सर्वसामान्यात दृग्गोचर होणारी विषय वासना त्यांच्या ठिकाणी नसते. सामान्यांना विषयवासनेमुळे प्राप्त होणारी दुःखे पाहून ती दुःखे नाहीशी करून त्यांचा उद्धार करण्यासाठीच अवतारी पुरुषांचा जन्म असतो. संसाराच्या मोहापासून मुक्तता प्राप्त करून देऊन सामान्यजनांना अपाय भवसागर तरून जाण्यासाठी अवतारी महात्मे कटिबद्ध असतात. सामान्यजनांची कृत्ये नेहमी स्वार्था करताच असतात. पण अवतारी महात्म्यांचे तसे नसते.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागति संयमी । यस्यां जाग्रति भुतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ‘( भ.गी. २ ६९ )

संसारीजनांना प्रकाशमान दिसणारे जग अवतारी जनास अंध:कारमय वाटते, तर संसारीजनांना बंध:कारमय वाटणारे जग अवतारीजनांना प्रकाशमान वाटते. त्यांची गाढ निद्रा जागृतावस्थे प्रमाणे त्यांना दिसते. जनसामन्यास न कळणारे विषय अवतारी वा ज्ञानी मनुष्यांच्या सहज ध्यानात येतात. सामान्य जन संसार सुखासाठीच जन्म घेत असतात. ज्ञावी सामान्य जनांस परमानंद वैभव-साम्राज्य मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. सामान्य लोक संसारसुखात गर्क झालेले पाहून अवतारी महात्म्यास बत्यंत दुःख होते व सामान्यास त्यातून मुक्त करण्याचा ते करीत असतात. इतरांच्या हितासाठीच संतमहंताचा जन्म होय. या जगात खरे सुख गुप्त स्वरूपात आहे. परमात्म्याच्या दिव्या नंदाल चुकविण्यासाठी मिथ्या सुखाचा लखलखाट दिसत असतो. परमात्मा सत्यरूपी व आनंदी आहे. सामान्यांच्या ठिकाणी असलेला अधिकार घालवून ज्ञानरूपी प्रकाश प्राप्त करून देण्यासाठीच अवतारी जनांचा जन्म असतो. अन्यथा अवतारी या शब्दाला काहीच अर्थ राहणार नाही. त्यांच्या काही तरी वैशिष्ट्य असते म्हणून त्यांना अवतारी म्हटले जाते.

अवतारी नित्यमुक्त

अवतारी महात्म्यांना निरनिराळी साधने करून, ज्ञान मिळवून मुक्त होण्याचा प्रश्नच उतो. कारण ते नित्यमुक्त असतात. नित्यानंदवनतेनेयुक्त, अत्यंत शांतियुक्त अशी त्यांची स्थिती असते. सामान्यजनांना व संसारात घोटाळलेल्या लोकांचा सत्यानंदस्वरूप दाखविण्यासाठी, भवसागर तरून जाण्यासाठी व त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी हे अवतारी महात्मे आपल्या महावैभवाचा त्याग करून सामान्य जनांमध्ये वावरत असतात. हा त्यांचा स्वार्थत्याच नव्हे काय ? अनंत स्थितीतील आपला आनंद सोडून अशा रीतीने सहन करणे हे निस्वार्थीपणाचे लक्षण नाही काय ?

श्रीसमर्थांचा जन्म मागील प्रवचनात श्रीसमर्थांचा जन्म होण्याच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केले होते. त्यावरून जगदोद्धारासाठीच त्यांची जन्म घेतला हे स्पष्ट होते. स्त्रिया गर्भवती झाल्यानंतर त्यांना डोहाळे लागतातच. काहींना अंगठी, सोन्याच्या बांगड्या, जरीचे पातळ, असे काहीतरी लागत असते. परंतु समर्थांच्या मातोश्रीस अशा कोणत्याच प्रकारचे डोहाळे लागले नाहीत. गर्भातील शिशु ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे डोहाळे लागत असतात. तसेच गर्भवती स्त्रियावर होणाच्या संस्काराचा परिणाम गर्भातील शिशुवरही होत असतो. राणूबाईच्या गर्भात असणान्या समर्थाना रामायण ऐकावे, सत्संग घडावा, ध्यानसमाधीचा अभ्यास करावा अशी बलवत्तर इच्छा होत असे. रामायणातील राक्षस संहाराचा विषय निघाला असता त्यांचा संहार करून भूभार कमी केला पाहिजे. मी तर मारुतिरायच आहे. मारुतिरायांनी रामायणात जसा पराक्रम गाजविला तसा पराक्रम मीही गाजवीन, जनहितासाठी मी कटिबद्ध आहे. मारुतीप्रमाणे ज्ञानवैराग्य संपन्न होऊन उज्वल किर्ती मिळवीन अत्यंत तेजस्वी वनून येणारी सर्व संकटे नाहीशी करून जगाच्या कल्याणासाठी झटत राहीन. असे राणूबाई म्हणत नसत. पोटातील गर्भाच्या योग्यतेनुसार मातेस डोहाळे होत असतात, म्हणूनच त्या त्याप्रमाणे बोलत होत्या. अशा प्रकारे नंतर चैत्र शुद्ध नवमी, श्रीरामनवमीच्या वेळी शुभ मुहूर्तावर श्रीराम प्रभूच्या धर्मपालनासाठी, घमंरक्षणासाठी, दुर्जनांचा संहार व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, धर्ममूर्ती श्रीरामप्रभूंच्या जन्माप्रमाणे श्रीमारुतिराय श्रीसमर्थ या नावाने अवतार धारण करते झाले. रामनवमीस जन्म घेतल्यामुळे भक्त व भगवंतात भेद नसतो असाही ह्या घटनेचा अर्थ आपण करू शकतो आणि म्हणूनच मारुतीराय व समर्थ भिन्न नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानी व अवतारी जनांचे जीवन आश्चर्य व वैचित्र्य यांची नटलेले आणि

असामान्य सद्गुणांनी युक्त असते. त्यांच्या मुखावर अलौकिक तेज असते. श्रीरामप्रभू व श्रीकृष्ण जन्मताच त्यांनी आपापल्या मातांना श्रीविष्णु स्वरूपात दर्शन दिल्याचे आपण ऐकले आहेच.

बाललीला

श्री समर्थ बोबडघा बोलाने व बालपणातील क्रिडेने सर्वांना संतुष्ट करीत. दिवसातून एकवेळ तरी समर्थदर्शन घडावे असे त्या गावातील प्रत्येकास वाटे. दिवसातून एकदा तरी श्रीसमर्थांशी गप्पा करून आनंदित होऊन जाण्याचा प्रत्येकाचा परिपाठ होता. अशी २-३ वर्षे जातात न जातात तोच थोडेसे लिहणे-वाचणे सुरू झाले. त्यांनी अनेक स्तोत्रे मुखोद्गत केली. अमरकोशादि पाठ्य ग्रंथांचा अभ्यास पुरा केला. जमाखर्च गणितादि अभ्यास पाच वर्षातच संपविला. पाचव्या वर्षी मौजीबंधन झाले. त्यानंतर विद्याभ्यासासाठी पाठशाळेत पाठविण्यात जाले व एक वर्षातच गुरुजीजवळ असलेली विद्या संपूर्णपणे हस्तगत केली.

श्रीसमर्थांच्या बाललीला मारुतिरायाप्रमाणेच विचित्र होत्या. अरण्यातत ज्याप्रमाणे वानरे या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारीत असतात, त्याप्रमाणे समर्थही उड्या मारीत असत. आपला खेळ व कृती यांची ते आपण मारुती आहोत असे दाखवून देत. त्यांचे हे वागणे ज्यांना आवडत नसे ते त्यांना तू अभ्यास का करीत नाहीस ? शाळेत का जात नाहीस ?” असा प्रश्न करोत. गुरुजी काही शिकवित नाहीत. मग तेथे बसून रहाण्यात का अर्थ आहे ? दुसरे कोणी शिकवित असल्यास मी शिकण्यास जाईन. असे उत्तर देत.

धान्य संग्रह

श्रीसमयांचे खेळ व या विचित्र व अघटित होते. एकदिवस घरात धान्य नसल्यामुळे राणूबाई त्यांना म्हणाल्या नारायणा ! तुझे घरात अजिबात नाही. तू नेहमी खेळात दंग असतोस. घरातील पुरुषांना घरात काय आहे, काय नाही या परिस्थितीची कल्पना असली पाहिजेयावर मग काय पाहिजे ?” असे समर्थांनी विचारताच मातोश्रींनी धान्य पाहिजे असे सांगितले. बरे आहे. उजाडण्यापूर्वी हे घर धान्याने भरून टाकतो. असे समर्थ सहजरीत्या म्हणाले, मुखाच्या बोलण्यावर दाणूबाई संतुष्ट झाल्या. पण हे आपोआप कसे होणार याचा त्यांना प्रश्न पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उजाडण्यापूर्वी समर्थांचे घर खरोखरच धान्याने भरलेले आढळून आले. पहा हा मारुतीरायाचा  अवतार !!

ज्वर, भीती, बाधापीडित लोक समर्थाना आपली दुःखे सांगत व समर्थांनी ऐकताच त्या बाधा नाहीशा होत. निपुत्रिकांनी नारायणाची प्रार्थना करताच त्यांना पुत्र प्राप्ती होई. ताप दुःख यांनी युक्त असणारासच समर्थ आपल्या पायाची धूळ देत असत. बाल्यावस्थेत हे अनंत चमत्कार पाहिल्यानंतर हा अवतारच होता हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल. झाडावर उंच चढून शेंडया पर्यंत जाणे. या सांदीवरून फांदीवर उडी मारणे हे त्यांचे नित्याचे खेळ होते. पोहण्यात त्यांचा हातखंडा होता. पाण्यात पडल्यावर ते तीन तीन दिवस बाहेर पडत नसत असे त्यांचे वागणे होते. बुद्धिमान व तेजस्वी मुलांचे मौजीबंधन त्याच्या पाचव्या वर्षी करण्याची चाल आहे व त्यानुसार समयची मौज झाली होती. ही गोष्ट फारशी आश्चर्यकारक नसली तरी सातव्या वर्षी लग्न करणे हे मात्र आश्चर्यकारकच. समर्थांचा मोठा भाऊ गंगाधर. त्यांचे लग्न सातव्या वर्षीच झाले होते. मराठवाडयत गोदावरी तीरावर ही पद्धत विशेष करून आहे

विवाह विचार

श्रीसमर्थांना नुकतीच सहा वर्षे पूर्ण झाली होती व त्यांच्या मातोश्री त्यांचे लग्न करण्याची योजना आलू चावल्या. हा शब्द ऐकताच समर्थ रागावून पळून सामान्यजनाप्रमाणे लग्न करून जात आणि मो एका लहानशा फुटुंबाची जबाबदारी न घेता जगाची काळजी वाहणार आहे. माझे  वसुधैव कुटुंबकम् हे ध्येय आहे.असे ते म्हणत. सामान्य जनांना आपला मुलगा अध्यात्मिक मार्गाकडे जातो हे पाहून भीती वाटत असते. त्याने संसाराकडे प्रवृत्त व्हावे म्हणुन ते प्रयत्नशील असतात. आपणासारिखे करिती तत्काळया म्हणीप्रमाणे आपल्याच मार्गाकडे त्यास नेण्याचा प्रयत्न करतात. या उलट ज्ञानी लोक विश्वास पाहून मानेच तुझ्या कुलाचा उद्धार होईल असे म्हणून त्यास शाबासकी देतात. पण त्यांच्यापैकी एखाद्याने संसारमा अनुसरला तर त्यास चिता, भ्रांति, दुःख, शोक या सर्वांचा त्रास होऊन वे दुःखी बनतात. ही संसारिकांची लक्षणे होत. संसारात कितीही दुःखे येवोत वा न येवोत पण विश्वतमार्गी मनुष्यास तो मार्ग नकोसाच वाटतो.

बाह्य चमत्कार

राणूबाईना आपल्या मुलाची विशेष चिंताता बाटू लागली. कसेही करून त्याचे लग्न झाले पाहिजे अशी त्यांची उत्कट इच्छा होती. श्रीसमर्थ राणूबाईच्या तावडीत केव्हाच सापडत नसत. समर्थांना ताब्यात घेण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. एके दिवशी त्या गावचा अधिकारी गंगाधरपंसास भेटावयास माला असता घरात बैठक वगैरे काहीच नसलेले पाहून उपरोधिकपणे तो म्हणाला की या घरात सर्व वेदान्तीय राहताव. ते सर्व साधू व अवतारी आहेत. त्यामुळे एखाद्या पाहुण्यास बसावयाला देण्याचे त्यांच्या कसे लक्षात परमार्थी हे आळशीच. त्यांना येईल ? सामान्यपणे पाहुण्यांचा घरी आलेल्या सत्कार करण्याची बुद्धी कशी होणार ? !!’ समर्थांनी त्याने उच्चारलेले शब्द ऐकले व आपले सर्व मित्र जमवून एक मोठे h झाड तोडून आपल्या मित्रापैकी सुतार मित्राकडून झाडाच्या फळधा पाडून पाट तयार करविले व ते ओसरीवर मांडले.

विश्वाची चिंता

एके दिवशी राणूबाई नारायणास म्हणाल्या, ‘नारायणा, तुला संसाराची मुळीच काळजी नाही. खेळाशिवाय तुला काहीच सुचत नाही. वाळा असे वागणे ठीक नाही. संसाराची काळजी केलीच पाहिजे. हा थोडासा तरी विचार कर यावर समर्थानी ठीक आहेअसे उत्तर दिले. मी निश्चितपणे संसाराची चिंता करीनअसे म्हणून ते घराच्या तळवराव जाऊन बसले. बराच वेळ झाला तरी बाहेर आले नाहीत. एक दिवस झाला तरी ते बाहेर आले 1 नाहीत. सर्वत्र शोध करूनही शोध लागेना. गंगाधर श्रेष्ठांची पत्नी काही जिन्नस आणण्यासाठी तळघरात गेली असता तिळा तेथे समर्थ ध्यानस्थ बसल्याचे आढळले आणि ती तशीच बाहेर येऊन तिने आपल्या सासूबाईस ती बातमी सांगितली. राणूबाई धावतच तळघरात गेल्या व बाळ, हे काय ? तू येथे बसून काय करतोस ?” असे विचारले. त्यावर समर्थांनी आई, चिता करतो विश्वाची असे उत्तर देऊन तूच मला संसाराची काळजी वहावयास सांगितले होतेस. त्यामुळे मी विश्वाची काळजी वाहत आहे. असेही म्हणाले. अज्ञानी जनांचा उद्धार कसा होईल ? भ्रष्ट केलेल्या क्षेत्राची अभिवृद्धी कशी होईल ? शून्य देवाळये कल्याणपूर्ण कशी होतील ? लोकात धर्मभावना कशी बुद्धिगत होईल ? असे निरनिराळे विचार करीत मी बसलो होतो. म्लेंछानी देवालये भ्रष्ट केली आहेत, धार्मिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. हे सुरळीत कसे होईल ? अशा चितेत मी आहे. यात माझा काय दोष ? असे म्हणताच राणूबाई हसल्या व त्यांनी समर्थांना मिठी मारली बाळ, विश्वोद्धारासाठीच तू जन्मास आळा आहेस. ठीक आता चल बघू.असे म्हणून त्या समर्थांना घेऊन आल्या.

विहिरीत उडी

एके दिवशी नारायणास आपल्यास पाहण्यास वधुपक्षाची मंडळी आली आहेत असे समजताच ते विहिरीच्या काठी असलेल्या उंच झाडावर जाऊन बसले. घरच्या मंडळींनी खूप शोध केला. आपला शोध चालला बाहे असे समजताच त्यांनी विहिरीत उडी मारली. तेव्हा विहिरीठीय एक खडक त्यांच्या कपाळास लागला. व त्यायोगे कपाळावर टेंगूळ वाले संत तुकाराम महाराजांनी पीतवर्ण कांती, तेज अघटित आवाळू शोभत भृकुटीमाजी ॥असे वर्णन केले आहे. समर्थ विहिरीतून तीन दिवस बाहेर आलेच नाहीत. राणूबाई व गंगाधर श्रेष्ठ त्यांचा सगळीकडे शोध करीत व नारायण एकदा तरी भेट रे!” असे म्हणत हिंडत होते. त्यांचे बोलणे ऐकून नारायण विहिरीतून बाहेर येऊन माझे लग्न करणार बाहात ना ? लग्न करणार नसाल तरच मी घरी येईन असे म्हणाला. नाही करणार ! नाही करणार !!असे त्या दोघांनी कबूल केल्यावरच समर्थ घरी आले. लग्नाची गोष्ट काढली म्हणजे हा घरातून पळून जातो हे पाहून राणूबाईस फारच दुःख झाले. गंगाधर श्रेष्ठांनी आपल्या आईची खूप समजूत घातलो व तो लग्न करणार नाही. तो ब्रह्मचारी राहूनच विश्वाचे कल्याण करणार आहे. तू जर छग्नाचा हट्ट बेतलास तर तो घरात राहणार नाही. त्याच्या इच्छे विरुद्ध वागून त्याला घर सोडावयास लावू नकोस. लग्नाची गोष्ट काढली नाहीस तरच तो काही दिवस घरात राहील ! असेही त्यांनी आपल्या आईस नानाप्रकारे सांगितले, तरीपण त्यांच्या मातृमनावर काहीच परिणाम झाला नाही.

आईची युक्ती

किती झाले तरी ते मातृहृदय व स्त्रीबुदधीच मनात नेहमी एकच विचार. एके दिवशी नारायणास युक्तीने आपलासा करून घेण्यासाठी त्याच्या अंगावरून हात फिरवून बाळ | माझी एक गोष्ट ऐकशील काय? मातृदेवो भव, पितृदेवो भव अशी श्रुतिवाक्य मी तुझ्याच तोंडून ऐकली आहेत. तुझे आईवद खरे प्रेम असेल तर आईचे ऐकले पाहिजे, या भावनेने माझी एक गोष्ट ऐक.असे म्हणाल्या. आईची बाज्ञा उल्लंघू नये ह्या भावनेने परंतु दोन्हीकडून पेचात पडल्यासारखे होऊन बरे बाहे तुझे काय म्हणणे आहे ते सांग ? ‘ असे समर्थ म्हणाले. तू वचन दिल्यासच मी ते सांगेन. तसेच तू त्याप्रमाणे वागणार असल्यास खरच मी ते सांगणार आहे आई म्हणाली. परमेश्वरी लीला विचित्र आहे. आईला दिलेल्या वचनाचे पालन केलेच पाहिजे असा विचार करून पाहू याअसे मनात म्हणून मन घट्ट फडन ठीक आहे मी वचन देतो. तुझे म्हणणे सांगअसे समर्थ म्हणाले, ” तसे काही नाही, लग्नमंडपातील अंतर्पटापावेतो माझे म्हणणे तू ऐकअसे आईने सांगितले. राणूबाईची अशी समजूत होती अंतर्पटापावेतो हा राहिला म्हणजे पुढे सगळे सुरळीत पार पडेल, त्यांना विवाहशास्त्राची माहिती नव्हती. सप्तपदी, डाजाहोम हे सर्व झाल्यावर पति-पत्नीचा संबंध कायम होतो हे त्यांना माहित नव्हते, पण यांना ते माहित होते. पंचस्वापत्सू नारीणाम् असे एक वाक्य आहे. सप्तपदी, खाजाहोम होण्यापूर्वी, आंधळा, पांगळा इत्यादि व्यंगयुक्त असलेला पर तो विवाहास अयोग्य ठरून तो विवाह मोडता येतो असे शास्त्रवचन बाहे. पाराशर स्मृतीने नष्टं मूर्तअसेही म्हटले हो गोष्ट समर्थांना माहित असल्याने त्यांनी निर्भयपणे वचन दिले.

विवाह मंडपातून पलायन

लग्नाची सर्व तयारी झाली. ही सिद्धता होत असता गंगाधर श्रेष्ठांना मात्र शंका वाटत होती. परंतु आईचे म्हणणे ऐकले पाहिजे एवढा गोष्टी करताच ते लग्नाची सर्व तयारी करीत होते. वागी गोसावी या नावाच्या गृहस्थाची मुलगी पत्रिका बरोबर जमते असे पाहून निश्चित केली होती. ती समयींची मामे वहीणच होती. साखरपुडा वगैरे होऊन सर्व सिद्धता झाली. गोसावी यांचे घर जांबेपासून दोन मैलावर होते. ज्यावेळी मी जांबक्षेत्री गेलो होतो त्यावेळी गोसावी यांच्या घरोही जाऊन आलो होतो, ही पुण्यभूमी आहे. आज ज्वारीचे शेत असून इतर शेतापेक्षा तिप्पट पीक येते असो.

शुभमुहूर्त निश्चित करून त्याप्रमाणे सर्व सिद्धता होत होती. अंतर्पोट धरल्यावर सुमुहूर्त सावधान । सुलग्न सावधान घोष समर्थांनी ऐकला. त्याजवळच असलेल्या पुरोहितास याचा अर्थ कायअसे समर्थांनी विचारले बाळआजपावेतो तुला तापत्रयाचा त्रास नव्हता. ही कन्या त्या रूपाने येत असल्याने हे सर्व लोक तुला सावध करीत आहेत. असे पुरोहिताने सांगता क्षणीच समर्थ अशक्ती व देवी प्रभावाने तेथून पसार झाले. पळून जाणाऱ्या समर्थांना अडविण्याची कल्पनाही कोणाला आली नाही. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन स्तब्ध होते. समर्थ बरेच दूरवर गेल्यानंतर मात्र तो कोठे गेला ? पकडा ! धावा ! पळा |” असा एकच गलका झाला. व गडबड सुरू झाली मनास अगोचर शब्दांनी अवर्णनीय असे श्रीसमर्थ सामान्यजनांच्या तावडीत सापडतील काय ? ते कोठे तरी अदृश्य झाले. मनात एक विचार असतो पण घटना मात्र निराळीच घडते. समर्थताप ह्या पुस्तकात चरित्रकार लिहितात की, अनेक अवतार झाले परंतु लग्नमंडपातून अशा प्रकारे पळून जाणारा अवतारी आजपर्यंत पहावयास मिळाला नाही. हेच त्यांचे वैशिष्टप. मायादेवी पत्नी रूपाने मोहजाळात अडकवीत असता एकदम त्या क्षणीच उडी मारून पळून जाणारा पुरुष विरळाच. कविवर्य मोरोपंतांनी असे म्हटले आहे की,

द्विज ! सावधानऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती । ते एक रामदासें आयकिले त्या असो सदा प्रणती ॥

पुरोहित लग्नमंडपात सर्वांना सावधानकरीत असले तरी कोणीही सावध होत नाही. पुरोहिताच्या वचनाचा अर्थ लक्षात घेऊन, सावधान होऊन, जागृत झालेले श्रीसमर्थ हे एकमेव होते असा याचा भावार्थ बाहे.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

home-last-sec-img