Literature

अवतार

आपण सर्वजण आजपावेतो ज्या महात्म्याची सेवा करत आलो आहोत व ती सेवा अत्यंत भक्तिभावाने करीत आलो आहोत त्या महात्म्याचे नाव श्रीसमर्थ व रामदास असे अन्वर्थकच आहे हे आपणाला माहीत आहे. या नावातील गंभीर अर्थ व त्यामध्ये असलेले वेदांतसार हे कसे व्यक्त होते है जाता आपण पाहू.

श्रीसमर्थ श्रीमारुतीचे अवतार आहेत हे आपण सप्रमाण निश्चित केले आहे. अवतार म्हणजे पृथ्वीतलावर येणे; हाच अवतार ह्या शब्दाचा अर्थ आहे. अवतार म्हणजे खाली उतरणे. ज्या ज्या देवता मनुष्यरूपात आपला प्रगट करतात ते ते त्या देवतांचे अवतार असे आपण म्हणतो. ह्या दृष्टीनेच विष्णु, शिव,शक्ती, गणपती व दत्तात्रेय हे सर्व अवतारीच होत.

कृष्णेची व्याकुळता व उपशमन

मागील प्रवचनातून श्रीसमर्थांच्या अवताराबाबत काही प्रमाणे दर्शविली होती. अद्याप एका प्रमाणाचा विचार करणे बाकी आहे त्याचे विवेचन करू या.

महाराष्ट्रात बाहेहे एक क्षेत्र आहे. तेथील ही गोष्ट, श्रीप्रभु रामचंद्र पुष्पक विमानाने लंकेहून अयोध्येस परत जात असता संध्यावंदन समयाची ही कथा आहे. या कथेचा श्रीसमर्थांच्या चरित्राशी संबंध आहे. हे गाव व स्थळ आजही बाहे.

श्रीप्रभुरामचंद्र कृष्णानदीत संध्यावंदन करीत असता अंतर्मुख होऊन, देहभान विसरून समाधिस्थितीत गेले. कृष्णा नदीसही आपण श्रीरामप्रभूंच्या चरणकमळास स्पर्श करावा अशी इच्छा झाली. कृष्णानदी ही विष्णुस्वरूपच आहे अशी भावना आहे. कृष्णा विष्णुतनुः साक्षात् असे म्हणतात. असो. तो प्रभुरामचंद्रांच्या चरणकमलास स्पर्श करण्यास येत आहे हे मारुतीरायाने पाहिले. मारुतीराय कृष्णानदीचे महात्म्य जाणत असले तरीसुद्धा आपल्या प्रभूच्या समाधिस्थितीचा भंग होऊ नये म्हणून वे कृष्णानदीस आडविण्याचा विचार करू लागले, सामान्यपणे निद्रा भंग होऊ नये याकरिता कोणीही कोणास विनाकारण जागे करीत नाही. ही तर समाधीच होती. श्रीप्रभ रामचंद्र पूर्णपणे समाधीसुखात तल्लीन झाले असता माझ्या देखत तिचा भंग होणे ही माझीच कर्तव्यच्युती होय असा विचार करून मारुतीरायाने आता मी कृष्णा नदीस आडविल्याने श्रीरामप्रभु माझ्यावर रागावले तरी हरकत नाही किंवा त्यांनी शाप दिला तरी ते मी सहन करीन. काहीही होवो, मी माझे कर्तव्य पार पाडणार!असा निश्चय करून अतिवेगाने येणान्या कृष्णा नदीस आपल्या दोन्ही बाजूंनी आडविले. बाहूंनी आडविल्यामुळे त्या स्थानास बाहुअसे नाव पडले. त्याचाच अपभ्रंश बाहेअसा होऊन तेच आज रूढ झाले आहे.

इतक्यात कृष्णेच्या पाण्याचा खडखडाट व गडगडाट, प्रतिबंध केल्याने झालेला आवाज हे सगळे ऐकल्यामुळे श्री रामचंद्रांची समाधी उतरली व ते समोर पहातात तो अतिवेगाने येणान्या कृष्णानदीस श्री मारुतीराय आडवित आहेत. हे पाहून ते म्हणाले बाळ, तिला आडवू नकोस. ती माझ्या देहाप्रमाणेच असून मी व ती यात भिन्नता नाही.ही स्वामींची आज्ञा ऐकताच श्री मारुतीरायाने आपले हात ताबडतोब बाजूस केले. आपणास आडविले याचे कृष्णा नदीस फारच दुःख झाले होते. हे सर्व श्रीरामप्रभूंच्या लक्षात आल्यामुळे ते श्री मारुतीस म्हणाले मारूते, ज्याप्रमाणे कृष्णा नदी माझी देहरूप आहे तसाच तुही माझा देहरूप आहेस. तू कर्तव्य म्हणून हे केलेस पण तिला मात्र तो अपमान वाटला. कारण तिला माझे पदसेवन करण्याची इच्छा होती पण ती तू पूर्ण होऊ दिली नाहीस. कोणतेही काम तत्क्षणी झाल्यास त्यामुळे प्राप्त होणारा आनंद आगळाच असतो, ती वेळ गेल्यावर मग त्यास महत्त्व रहात नाही. भूक लागताच जेवण केले पाहिजे. त्याप्रमाणे कृष्णेचा उत्साह तू घालविल्यामुळे तिच्या इच्छेप्रमाणे तिला सेवा घडविण्यासाठी तिच्यावर अनुग्रह करणे प्राप्त झाले आहे, यापुढे मी दक्षिणेत अवतार घेणार नाही. तू दक्षिणेत गोदातटाकी जन्म घेऊन कृष्णावटी रहा आणि कृष्णेस माझा पदस्पर्श सतत होऊ दे. यानंतर श्रीरामप्रभूंनी कृष्णा नदीवर अनुग्रह केल्यामुळेच आम्हा सर्वावर महत् अनुग्रह झाला आहे असे मानण्यास काहीच हरकत नाही. श्रीसमर्थ तेथे जाऊन, पूर्वीचा पौराणिक प्रसंग आठवून त्या काली कृष्णा नदीच्या समाधानासाठी स्थापन केलेली- श्रीमारुती याची मूर्ती उचलून पूर्व चरित्राची आठवण कायम केली. ही मूर्ती सोन्याची होती. या अतिप्रचंड मूर्तीस पूजा, नैवेद्यादि व्यवस्था झाल्यास ठीक अन्यथा अनर्थ कोसळेल असा विचार करून ती मूर्ती पुन्हा पूर्वीच्या ठिकाणीच ठेवून दिली या गोष्टी वरून गोदातटाकी जन्म घेऊन श्रीसमर्थ कृष्णावटाकी कशासाठी आले होते हे सहज ध्यानात येईल.

अवतारी जातिस्मर

अवतारी पुरुषांना जातिस्मरअसेही एक नाव आहे. आपण कोणाचे अवतार आहोत हे निश्चितपणे त्यांच्या ध्यानात असते. जसे श्रीकृष्ण व श्रीरामप्रभु हे विष्णूचे अवतार होत तसेच श्रीसमर्थ हे श्रीमारुतीरायाचे अवतार होत असे म्हणण्यास हरकत नाही.

तुकारामांची उन्नत पदवी

संत तुकाराम कोणास माहित नाहीत ? संत तुकाराम या चित्रपटामुळे तर ते सर्वांना परिचित झाले आहेतच. एके दिवशी ते श्रीसमर्थांच्या भेटीस आले होते. परस्परांच्या गप्पा गोष्टी चालल्या असता श्रीसमर्थांनी संत तुकारामांना जिज्ञासू दृष्टीने प्रश्न केला तुम्हाला ही उन्नत अवस्था प्राप्त होण्याचे कारण काय ? ही अवस्था कोणत्या साधनामुळे कशी प्राप्त झाली ? आपली गुरुपरंपरा कोणती ?” या प्रश्नांस विठ्ठलदास्यहा माझा दिननित्याचा मंत्र चैतन्य हा माझा संप्रदाय. मी जे साधन केले ते फक्त मनोनिग्रहासाठीच. मी जे जेथे कीर्तन करतो तेथे तेथे माझे दोष मीच उमजून घेऊन लोकांना सांगत असतो. स्वतःचा दोष समजून घेणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण सर्वजण संत तुकाराम महाराजाप्रमाणे नसून आपण आपले दोष झाकण्याचा प्रयत्न करीत असतो. इतकेच नव्हे तर खोटेही सांगत असतो. आपल्यामधील दोष कोणी दाखविले त आपल्याला त्याचा राग येतो. ही लक्षणे मुमुक्षूंची सचितव नाहीत आपण असेच बागलो तर वज्रलेपो भविष्यति । होईल. स्वाज्ञानज्ञानिनी विरलाःआपण स्वतः कसे होत हे समजणारे लोक क्वचितच काही तरी खोटे नाटे सांगून आपला मोठेपणा दाखविण्याचा जो तो प्रयत्न करीत असतो हो कृती म्हणजे मांजराने डोळे झाकून घेऊन दूध पिण्यासारखेच आहे. जगाला डोळे नाहीत काय ? आपण आपल्या चुका झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी निसर्गशक्ती ही तुमच्या योग्यतेचे यथार्थ मूल्यमापन करून त्याप्रमाणे फल देते. कदाचित लोक तोंडाने बोलत नसले तरी आपल्या वागणुकीने ते उघड होत असते. त्यामुळे पुण्यक्षय होतो आणि दांभिकपणा, खोटे नाटे हे सर्व उपडकीस येते. तेज, उपःसिद्धी असल्यास तीही नष्ट होते. म्हणूनच मन ताळघावर आणण्यासाठी आपले दोष आपण जाणून घेऊन दुसन्यास सांगणे ही मोठीच साधना होय. आपलो कोणतीही चूक चारचौघात सांगितल्याने पाप नष्ट होते असे हटले जाते.

सत्यपरिस्थिती दर्शन

स्त्रियांनी सर्व प्रकारच्या प्रायश्चित्ताच्या वेळी आपण केलेले सर्व अपराध सांगितले पाहिजेत. त्यामुळे त्यांचे पाप नष्ट होते. ही गोष्ट खोटी नाही. मी माझ्या लहानपणी असेच एक उदाहरण पाहिले आहे. एका यज्ञाच्यावेळी कितीही प्रयत्न करूनही अग्नि प्रज्वलित होईना. त्यावेळी यजमान पत्नीकडून काही चूक झाली की काय ? याबद्दल विचारणा करून, तेथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांनी या गोष्टीचा छडा लावल्यावर तिने आपली चूक कबूल केली. चूक कबूल करताच अरणीत अग्नी उत्पन्न झाला. म्हणूनच मन जिंकण्यासाठी आपल्या मनाची खरी परिस्थिती सांगितली पाहिजे.

मोठ्यासारखे वागण्याचे फळ

एखादेवेळी आपण पूर्ण भक्ती करीत नसलो तरी त्याप्रमाणे वागत गेल्यास क्रमाक्रमाने आपल्या जीवनात पूर्ण भक्ती स्थिर होऊ शकते. संत तुकाराम सिनेमामध्ये तुकारामाचा वेष धारण करणाराची शेवटी अशीच परिस्थिती झाली होती. ज्ञानेश्वरांचा वेष धारण करणारा बाटलेला ख्रिश्चन गृहस्थ हल्ली नेहमी ध्यान धारणेत मग्न असतो. ह्यासारखी एक गोष्ट आहे.

एक कोळी एका राजाच्या सुंदरवनातील सरोवरामधील मासे पकडण्यासाठी आपले जाळे त्यात टाकीत असे. अशाच एके वेळी त्याच रस्त्याने तेथील महाराज घोड्यावर बसून येत आहेतअसे ओरडणे त्याने ऐकिले. हे ऐकताच तो कोळी घावरून जाऊन आता आपल्यास शिक्षा होणार असा विचार करून त्याने साधूवेष धारण केला. थोड्याच वेळात राजा तेथे आला व साधु वस्त्रधारी कोळयास बघून, हा कोणीतरी मोठा

उपस्वी असावा, अशी कल्पना करून त्याने त्यास नमस्कार केला. त्यावेळी त्या कपटवेषधारी कोळ्याच्या मनात नाना विचारांनी काहूर केले. खरोखर विचार केला तर मी साधू तर नाहीच. पण या राजाच्या ताब्यातील प्रदेशामधील सरोवरातले मासे चोरून पकडण्याचा मी गुन्हाच करीत होतो. राजाला चकवण्यासाठी मी हा साधुवेष धारण केला होता. हेही पापकर्मच होय. अशा प्रकारे फसविणाऱ्या मला साधुवेषात असा मान मिळाला तर खरेच साधू झाल्यावर मला किती मान दिला जाईल असा विचार करता करताच तो खरोखरच साधु झाला. याकरिता नेहमी चांगली गोष्ट करीत राहून ते वळण शरीरास बिबविले पाहिजे. आपला वेष नीट नेटका असावा. भजन-कीर्तन करीत असता देहभान विसरून, भक्तिपरवश होऊन नाचले पाहिजे. असे करता करताच क्रमा कमाने मन एकाग्र होईल. समर्थांनी स्वतःचा परिचय दिला- संत तुकारामांनी अशारीतीने माझे अनुभव सांगिल्यामुळेच मला ही स्थिती प्राप्त झाली असेच सांगितले. त्यांच्या गप्पागोष्टी तथाच चालू असता आपले चरित्र ऐकून मला धन्यता वाटेल असे संत तुकोबारायांनी श्रीसमर्थांना म्हटले, त्यावेळी कोणताही विषय जसा आहे तसा सांगणे म्हणजे काही चूक नव्हे. मी मारुतीरायाचा अवतार असून श्रीरामप्रभूंच्या कृपेनेच जन्मलो तरीही मी बारा वर्षे पुरश्चरण केले. त्यापूर्वीच मला साक्षात्कार झाला होता. श्री मारुतीराय हे माझे लहानपणापासूनच स्नेही. माझ्या वडिलांचे नाव सुर्याजीपंत असून ते सूर्योपासक होते. त्यांना श्रीसूर्यनारायण व श्रीरामचंद्र प्रभु यांचा वर मिळाला होता. अशाप्रकारे श्रीसमर्थांनी आपला पूर्व परिचय करून दिला. या संभाषणामुळे श्रीसमर्थ हे श्रीमारुतीरायांचेच अवतार होते हे स्पष्ट होते. अवतारी म्हणजे जातिस्मरअसे जे शास्त्रवचन आहे त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ॥

home-last-sec-img