Literature

अश्विन वद्य अमावस्या

आज आपल्या देशात वैदिकधर्म तर अत्यंत हीनस्थितीला पोहोचला आहे. भटजींना, पुरोहितांना थोडीशी दक्षिणा दिल्याबरोबर आपल्या वैदिक कर्माची पूर्तता झाली असे समजणारे पुष्कळजण आहेत. वैदिक धर्माचा संपूर्ण अधिकार दक्षिणेबरोबरच पुरोहितांना देऊन स्वतः ऑफिस किंवा कचेरीस जाणारे ऑफिसरच जास्त झाले आहेत. वैदिक धर्माबद्दल आपल्याला असणारी श्रध्दा ही अशा प्रकारची आहे ! पुरोहितांना आपण ज्या दृष्टीकोनातून बघतो ती अत्यंत शोचनीयच आहे. परसातील झाडाला पुरोहितापेक्षा, भटजीपेक्षा जास्त महत्त्व आहे हेच नाही का आमचे धर्माचरण !!

आपल्या देशातील काहींची ख्रिश्चन किंवा मुस्लीमधर्माकडे जास्त आसक्ती होऊ लागली आहे. आपल्या धार्मिक अवनतीला हेही एक कारण आहे. प्राचीन धर्मतत्त्वच त्यानंतर आलेल्या धर्माचे वैशिष्ठ्य. प्राचीन धर्माच्या पायाभरणीवरच नंतरचे धर्म उभे राहिले आहेत. त्यामुळे सनातन धर्मच श्रेष्ठ होय. आपल्या धर्माचे मुळ *’ वेद ‘* व वेद ही परमात्म्याची कृपाच !
ब्रह्मज्ञानाचे सार म्हणजे वेद. यावरूनच आपल्या धर्माच्या श्रेष्ठतेची जाणीव होणार, नाही कां ?

या भारतीय पुण्यप्रदेशामध्ये असणाऱ्यांकडून संपूर्ण भूमीत असणाऱ्या सर्व मानवांनी आपला श्रेयसाचा मार्ग शिकून घेतला पाहिजे. या मनूच्या उक्तीने धर्माचे वैशिष्ठ्य व्यक्त होत नाही कां ? त्याप्रमाणे सर्वच्या सर्व मानवकुळास मार्गदर्शक अशा सनातन धर्माचा आश्रय घेऊन, त्याप्रमाणे आचरण करून सद्यपरिस्थितीवर मात करणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img