Literature

अश्विन वद्य चतुर्दशी

मानव हा बुध्दीजीवी असल्याकारणाने तोच धर्माचा अधिकारी होय. तो आपल्या विचारशक्तीने शाश्वत सुख व क्षणिक सुख यातील भेद समजू शकतो. स्वर्ग, नरक, भूलोक ही क्षणिक विषयोपभोगांना आश्रय देणारी आहेत. इंद्रियाद्वारे बाह्य पदार्थापासून मिळणाऱ्या सुखाला ‘ विषयसुख ‘ म्हटले जाते. हे सुख-दुःख ज्ञानी बुध्दीजीवी असलेल्या मानवालाच समजून येते. पशूंना हा ज्ञानानुभव नाही. ज्ञान हे संस्कारविशेषानेच येत असते.

एके ठिकाणी एक कुत्रे वाळलेले हाडुक चघळीत बसले होते. त्याच्या जवळून हातात अमृतकुंभ घेऊन जाणाऱ्या देवराज इंद्राला पाहुन ते कुत्रे त्याच्यावर गुरूगुरू लागले. कारण हा आपले हाडुक हिसकावून घेईल की काय ? ‘ अशी त्याला भिती वाटली. इंद्राला त्याचा अमृतकलश महत्त्वाचा तर कुत्र्याला त्याचे ते चघळीत असलेले हाडुक महत्त्वाचे वाटते. *’ यंदा यद्रोचते यस्मै तत्तस्य सुन्दरम् ‘* या संस्काराचाच प्रभाव उठून दिसतो. प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या देहसंस्काराप्रमाणेच भावनाही असतात. तशा संस्काराद्वारे प्राप्त होणाऱ्या अशाश्वत विषयसुखाला न भुलतां शाश्वतसुखासाठी मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. कारण परमात्मसुखच शाश्वत सुख ! तेच अतीन्द्रिय असे सुख. सत्य असणारे सुख ! अशा या सुखाच्या प्राप्तीसाठी मानवाने आचरण्यास आणण्याजोगा नियमांचा समूह म्हणजेच धर्म म्हटला जातो व त्या धर्मनियमांचे पालन केले नाहीतर खऱ्या सुखाची आशा दुरावल्याप्रमाणेच होईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img