Literature

अश्विन वद्य त्रयोदशी

आपण जन्माला आलो आहोत यावरून आपल्याला परमात्म प्राप्ती झाली नाही असेच समजले पाहिजे. त्याची प्राप्ती ना झाल्यास विषयसुखप्राप्तीच्या क्षेत्रातून आपला पाय ढळणार नाही. परमात्म्याची प्राप्ती होते तेव्हा सुखसागराची प्राप्ती. त्याच्या स्वरूपात दुःख, चिंता नाही, तेथे दुःखशोकादिंना जागा नाही, पण अशा परमात्मप्राप्तीसाठी आपण थोडे कष्ट करू इच्छित नाही. संसाराकरता परमात्मप्राप्तीसाठी आपण थोडे कष्ट करू इच्छित नाही. संसाराकरता गाढवासारखे कष्ट धडपड करीत असणाऱ्या आपल्या प्रयत्नांच्या एकशतांशही प्रयत्न परमात्मप्राप्तीसाठी केले जात नाहीत. मानवामध्ये परमात्म्याची आसक्ति अल्प आहे तर जगाची आसक्ती अधिक आहे.

‘ जगामध्ये सर्व पदार्थापासून प्राप्त होणारे सुख एकत्र केले तरी परमात्म्याच्या दिव्य सुखाच्या लेशमात्रादींची ते बरोबरी करू शकत नाही इतके ते दिव्य सुख आहे. या जगातील सर्व सुखसाधने एकत्र करून मानवास दिली तरी त्याची तृप्ती होणार नाही ‘ असे मनूने आपल्या संतांना, मानवांना आदेश दिला आहे. जगातील सुख खरे सुख नव्हे. त्याला उत्पत्ति नाश आहे, जे नष्ट होते ते सुख नव्हेच. प्रापंचिक वस्तू नाश पावतात. त्याचे अस्तित्व अस्थिर असते. म्हणून नष्ट होणाऱ्या सुखासाठी धडपड करू नये. परात्पर अशा परमात्म्यास नाश नाही म्हणूनच त्या शाश्वतसुखप्राप्तीचा मार्ग धर्मच व धर्म पालन करणे हेच खरे सुख !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img