Literature

अश्विन वद्य द्वादशी

जन्म म्हणजे विषयानुभवासाठी देहधारणा, वासनापूर्तीच्यासाठी केलेल्या कर्माची फलरूपस्थितीच जन्म. प्रापंचिक विषयसुखप्राप्तीसाठी केलेल्या निरनिराळ्या कर्माचे फलस्वरूप म्हणूनच जीव जन्म घेतात असे म्हटल्यावर आपल्या वासनापूर्तीसाठी केलेल्या कर्माचे फलरूप म्हणूनच जीवांना पुनर्जन्म प्राप्त होतो. तात्पर्य काय ? या जन्मी विषयसुखप्राप्तीसाठी केलेल्या कर्माच्या फळामुळेच पुढे वारंवार जन्म येतो. मागील जन्मी वासनापूर्तीसाठी केलेल्या कर्मफलाने हा जन्म प्राप्त झाला आहे. मागच्या जन्माला त्याच्या मागच्या जन्माचे कारण अशा प्रकारे वासनांच्या पूर्ततेमध्येच आसक्त झालेला मनुष्य जन्ममरणाच्या जाळ्यात हातपाय खोडीत तडफडत असतो. मग अशा या जन्मबंधनातून मुक्ती आहे काय ? अर्थात आहे. देहधारण केल्यानंतर विषयसुखाच्या वासनांना दूर केल्यास, तोडून टाकल्यास तो पुन्हा जन्म घेणार नाही. ज्या एका कोणत्यातरी जन्मात त्यास हे साध्य होईल. तेव्हाच त्याला पुनर्जन्म मिळत नाही हेच जन्म मरणाचे रहस्य होय.

ऐहिक सुखें ही विषयसुखे नव्हेत काय ? स्वर्ग, नरक यातील भोगही विषयभोगच होत. त्यामुळे स्वर्गप्राप्तीच्या इच्छापूर्तीसाठी केलेली कर्मेही पुनर्जन्माला कारण होतात. देहापासून बाह्य अनुभवच प्रमुख. कर्माच्या फलरूपाने जन्म देऊन ग्रहण केल्यावर दैहिक काळजी, चिंता न करता तद़्बाह्य अनुभव करून घेतला तरच तो जन्म सार्थक ! तोच पारमार्थिक अनुभव व तोच परमात्मानुभव.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img