Literature

अश्विन वद्य नवमी

आपले आत्मरूप शोधणे, ओळखणेच मुख्य आहे आणि याच्या खेरीज या मानवजन्मास येऊन ते शोधण्याचे, समजून घेण्याचे दुसरे काहीही नाही. ते लाभल्यानंतर, त्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, महान असणारा असा लाभ इतर कोठेही असूं शकत नाही, लाभण्यासारखा असत नाही. अशा या आत्मस्वरूपाचे संपूर्ण ज्ञान करून घेऊन आपण स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे.

या सत्य असणाऱ्या आनंदरूपापुढे माया ही खोटीच उत्पन्न झालेली, ठरलेली आहे. त्यामुळे तिच्या मोहात पडून आत्मस्वरूपाची जाणीव न ठेवणे, आत्मस्वरूपच आनंद असतांनाही त्याने तृप्त न होणे, विषयाचा दास बनून दुःखी होणे हे मानवजन्माचे लक्षण नव्हे.

*’ रसो वै सः | हैवायं लब्ध्वा आनन्दी भवति | को हेबान्यात् कः प्राण्यात् यदेष आकाश आनन्दो न स्यात् | ‘* त्या परमात्म्याच्या आनंदानेच आपण जगत आहोत. परमात्म्याचा आनंद नसला तर आपले जीवनच साध्य होणार नाही. परमात्मा केवळ आनंदरूपी आहे, तेथे भोग, भोक्तृ, भोग्य ही त्रिपुटी असत नाही. आनंदात दुसरे आणखी काय असणार ? अशा प्रकारच्या आनंदाच्या अनुभवात विरून जाऊन सत्यरूपी परमात्म्याशी ऐक्य पावणे, मायाजालास नष्ट करून ते मंगलरूप बनणे, आनंदघन परब्रह्म बनून जगणे हेच आपणा सर्वांच्या जीविताचे ध्येय होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img