Literature

अश्विन वद्य सप्तमी

स्वपरहित साधणे म्हणजेच सत्य. म्हणून सत्य न सोडता स्वपरहित साधून सर्वभूतमात्रांच्या ठिकाणी अनुकंपा म्हणजेच दया असली पाहिजे.’ *सत्यवंद | धर्मचर | स्वाध्यायान्माप्रमद: ‘* देवऋषी-पितृ तर्पण इत्यादि आराधना करण्याची वृत्ती ठेवून ती आचारित राहिली पाहिजे. *’ सर्वभूतानुकम्पनम् | ‘* सर्व भूतमात्रांच्या ठायी प्रेम, दया ठेवून वागणे हे गृहस्थाश्रमाचे एक मुख्य लक्षण आहे. गृहस्थाश्रमाचा देवता आश्रय घेताना; पितृगण आश्रय घेतात; प्राणी आश्रय घेतात. मनुष्ये, अतिथी, अभ्यागत आश्रय घेतात, गृहस्थाश्रमापासून इतरांना उपयोग झाला पाहिजे या दृष्टीकोनांतून वागिले पाहिजे व तसेच आपले आचरणही असावे आणि त्यादृष्टीने कोणतेही कार्य समप्रमाणतेने, शास्त्रसिध्दतेनुसार करीत राहिले पाहिजे, वागले पाहिजे व जगले पाहिजे. आशास्त्रीरित्या, कामाने प्रेरित होऊन काही तरी कसे तरी वागले, कार्य केले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण *’ अविधिकृत् नरकमश्रुते | ‘* म्हणूनच विधीला अत्यंत महत्त्व आहे.

*’ शमो दानं यथाशक्ति गार्हस्थो धर्म उच्यते | ‘* आपण आपल्या इंद्रियावर जय मिळवला पाहिजे. ‘ दान ‘ हे गृहस्थासाठी महत्त्वाचे असून ते यथाशक्ति करीत असावे, हाच गृहस्थांचा मुख्य धर्म होय.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img