Literature

अश्विन शुद्ध चतुर्थी

जन्ममरण नसलेला परमात्माच खरा आनंद होय. त्याची प्राप्ती करून घेतल्यावर सहजच त्या आनंदाची
इच्छा पूर्ण झाली पाहिजे, खरा आनंद प्राप्त करून त्यामुळे निरंकुश तृप्ती झाल्यानंतरच पुन्हा आनंदासाठी
वांच्छाही न रहतां, दुःखाचा अनुभव न होता, अनंतानंत अानंदाची प्राप्ती झाली असता खऱ्या आनंदामध्ये
ऐक्य झाले असता मग कशासाठी पुन्हा जन्म येईल ? कां म्हणून ? कोणती व कशाची इच्छा धरून ? कोणत्या
इच्छेच्या पूर्ततेसाठी तो जन्म घेईल ? तेथे जन्ममरणाची परंपराच नष्ट होते. संसारातील सर्व दु:खे नाहिशी
होतात. आपणच कारणरूप होतो व जन्म घेण्याचा उद्देश पूर्ण होतो.

अशाश्वत व सुख नसणाऱ्या अशा मर्त्यलोकात जन्म घेतल्यावर सुखप्राप्तीसाठी काय करावयाचे ? असा
प्रश्न पुढे आल्यास तुम्ही माझी आराधना करा, सुखद अशा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील व्हा, तुम्ही ज्या
फलाची आशा धरून प्रयत्न कराल त्या प्रयत्नास त्या फलाची प्राप्ती हे फळ हे मिळेलच मिळेल. माझ्या
प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न केल्यास माझी सुखद प्राप्ती तुम्हांस होईलच होईल. ही इच्छा धरून जे प्रयत्न करतात
त्यांना माझी प्राप्ती होते. व ते माझ्यांत सामावतात असे श्रीभगवंताने सांगितले आहे.
सुखासाठी प्रयत्न म्हणजेच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावयाचा हाच त्याचा अर्थ नाही का ?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img