Literature

अश्विन शुद्ध द्वादशी

शरीर असेपर्यंत जो कामक्रोधादींचा वेग सहन करतो, ज्याला या वेगाची बाधा होत नाही, तोच योग्य मनुष्य होय, तोच सुखी बाकी सर्वांना दुःख चुकत नाही. जे विरक्त असतात तेच धन्य होत; बाकीचे सर्वजण संसारपाशांनी जखडले जाऊन त्यातच दुःख भोगतात.

विरक्त यौवनांतच मुक्त होतो. त्याच्या पुण्यप्रभावाने धरणी प्राणीमात्रांना धारण करते. अशा या आत्मश्रेंयासाठी आपण विचार केला पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची आहे.
श्रीमत् शंकराचार्यांनी प्रेयस व श्रेयस या दोन मार्गांना, प्रेयसास *’ अविद्या ‘* व श्रेयसास *’ विद्या ‘* असे म्हणून हे परस्पर विरूद्ध आहेत असे म्हटले आहे. आता अविद्या म्हणजे काय ? व विद्या म्हणजे काय ? याचा आपण विचार करूया !

अविद्या म्हणजे प्रपंचाचे ज्ञान, संसाराची आसक्ति, देहाभिमान, आपले अस्तित्व नसणारे, आत्मरूप नसतांना, आपणांस देहादीमध्ये आपण म्हणजेच आत्मस्वरूपाचा आरोप करून घेण्याचे जे काही आहे तोच मी, देहच मी, असे जे काही समजले जाते ते समजणेच आत्म्याला, जीवाला बंधनरूप होते व त्याची निवृत्ती म्हणजेच मोक्ष असे म्हटले जाते. देहात्मबुध्दीतून मुक्त व्हावयाचे म्हणजेच मोक्ष. देहाभिमान निर्माण करून विषयाची आसक्ति वाढविणारी जी कोणी आहे, अभिमान निर्माण करणारी आहे तिलाच ‘ अविद्या ‘ असे नांव आहे. आता विद्या म्हणजे काय ? देहादीमध्ये असणारा अभिमान व विषयांची आसक्ती, मी देह आहे असे समजून देहेंद्रियाच्या सुखासाठी भुलणे यासर्वांची निवृत्ती जिच्यापासून होते तीच *’ विद्या ‘* अविनाशीस्वरूपाची प्राप्ती ज्या पासून होते ती *’ विद्या ‘*.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img