Literature

अश्विन शुद्ध षष्ठी

*'श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ संपरित्य विविनक्ति धीरः |*

*श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते |*

तारूण्यात पदार्पण केलेल्या मनुष्यापुढे *' श्रेय व प्रेय '* हे दोन मार्ग असतात व आपल्या मोहाने ते त्याला
घेरतात. श्रेय व प्रेय म्हणजे निवृत्ती व प्रवृत्ती, परमार्थ व प्रपंच, मोक्ष व भोग. यामध्ये कोणते महत्त्वाचे आहे याचा
आपण स्वतः विचार करून जो आपल्या हितासाठी ' श्रेयाला ' पसंत करतो, साधतो, त्याचे सर्वप्रकारे कल्याण
होते व अनंत आनंद साम्राज्यच त्याच्या हाती येते.

परमार्थ प्रथम दुःखरूप दिसतो. प्रथम तो विषासारखा वाटुन तो ' नको ' असे वाटते, पण त्याचा परिणाम
मात्र अमृतासारखा असतो. सुरवातीस तो सर्वांनाच आवडत नाही. तो कोणालाही आकर्षून घेत नाही.
निवृत्तीमार्गाचा अवलंब करणारा मोठा बुध्दिमान असतो. हा मार्ग सामान्य बुद्धी असलेल्यांच्या हाती येत
नाही. जो प्रेयसाच्या रस्त्याने जाऊन प्रपंचाकडे, विषयाकडे, भोगाकडे लक्ष्य केंद्रीत करतो तो अनंत
सुखापासून वंचित होतो त्याच्या हाती अनंत सुख येऊ शकत नाही, त्या सुखाचा त्याला कधीही लाभ होत
नाही.

देहेद्रियांचे सुख सुरवातीस चांगले वाटते, हितावह वाटते. पण परिणामी मात्र विषाप्रमाणे जीव घेते असेच
ते आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img